पोरांना आतून रिकामं करणारं Emptiness

Emptiness : गजेंद्र वर्मावर इंडस्ट्रीनं आणि श्रोत्यांनी अन्याय केला, असं माझं स्पष्ट मत आहे. प्रचंड टॅलेंट असतानाही त्याला अपेक्षित यश किंवा Recognition मिळालं नाही. अवघ्या एकवीसाव्या वर्षी Emptiness सारखं जालीम गाणं देणाऱ्या गजेंद्रचं क्रेडिटही लोकांच्या कल्पनेतला रोहन राठोड घेऊन गेला.
ब्लुटूथ काळातल्या गाण्यांचा बादशाह

माझ्या पिढीला तरूण होण्यात हातभार लावला, तो यो यो हनी सिंग (Yo yo Honey Singh) नावाच्या माणसानं. आमचं बालभारती कुमारभारती झालं, तेव्हा आमच्यासोबत हनी सिंग होता आणि त्याची गाणी होती. ‘डोप शोप’ तर एक उदाहरण आहे. या गाण्यावर तर पोरं पागल झाली होती. आजही आहेत. ‘लव्ह डोस’, ‘अंगरेजी बीट’, ‘ब्राऊन रंग’सारखी गाणी परत कधी झालीच नाहीत.