स्विस बँकेत खाते उघडायचंय? जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया आणि अटी!

Swiss Bank : अनेक मोठे नेते, उद्योगपती, किंवा श्रीमंत व्यक्ती आपले पैसे स्विस बँकेत ठेवत असल्याची चर्चा असते. परंतु, स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि कोणत्या अटी लागू होतात? चला, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.  
[gspeech type=button]

तुम्ही स्विस बँकेबद्दल नेहमीच काही ना काही ऐकता. अनेक मोठे नेते, उद्योगपती, किंवा श्रीमंत व्यक्ती आपले पैसे स्विस बँकेत ठेवत असल्याची चर्चा असते. परंतु, स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि कोणत्या अटी लागू होतात? चला, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी अटी

स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे.

खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे किमान 1 लाख डॉलर्स (जवळपास 84 लाख रुपये) असणे आवश्यक आहे.

खाते सुरू केल्यानंतर त्याचे देखभाल शुल्क म्हणून वर्षाला सुमारे 300 डॉलर्स (25,000 रुपये) भरावे लागतात.

खाते उघडायची प्रक्रिया कशी आहे?

स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष त्या बँक मध्ये जाऊन खाते उघडू शकता. किंवा एखाद्या प्रतिनिधीद्वारेही तुम्ही खाते सुरू करू शकता. तुम्ही स्विस बँकेत इंटरनेटच्या माध्यमातूनही खाते उघडू शकता.

स्विस बँक का आहे विशेष?

स्विस बँक म्हणजे स्वित्झर्लंडमधील बँका या त्यांच्या गोपनीयता धोरणासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. स्विस बँका ग्राहकांची माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करत नाहीत. 1934 च्या बँकिंग कायद्यानुसार ग्राहकाची ओळख उघड करणे हा गुन्हा मानला जातो. या बँकेमध्ये खातेधारकाच्या नावाऐवजी फक्त खाते क्रमांकाच्या आधारे व्यवहार केले जातात. तसचं,  खातेदाराकडून जमा झालेल्या पैशांबद्दल, ते कोठून आले याची चौकशी या बँक मध्ये केली जात नाही.

स्विस बँकेत खाते का उघडतात?

स्विस बँका स्वित्झर्लंडच्या स्थिर अर्थव्यवस्थेमुळे आणि विश्वासार्हतेमुळे लोकप्रिय आहेत. इथे ग्राहकांच्या पैशांची संपूर्ण गोपनीयता राखली जाते. यामुळेच जगभरातील श्रीमंत लोक आपले पैसे या बँकेत ठेवतात.

स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही सुविधा शक्य नसते. मात्र, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे, त्यांच्यासाठी स्विस बँक विश्वासार्ह पर्याय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर
Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी
Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ