फेक रिव्ह्यूपासून सावध रहा !

Fake reviews : ऑनलाइन खरेदी करताना फेक रिव्ह्यू म्हणजेच खोटे रिव्ह्यूज ओळखणे हे खूप महत्त्वाचे असते. फेक रिव्ह्यू ग्राहकांची दिशाभूल करू शकतात आणि त्यातून चुकीची खरेदी होऊ शकते. त्यामुळे या फेक रिव्ह्यूंपासून सावधान राहणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
[gspeech type=button]

आज प्रत्येकजण लहान मोठ्या वस्तूंसाठी ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडतो. अगदी किराणा मालापासून रोजच्या वापराच्या वस्तू आणि कपड्यांपासून घरगुती वापराच्या उपकरणांपर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाईन खरेदी केल्या जातात. सहजपणे घरबसल्या वस्तू खरेदी करण्याची ही सोय अनेकांना आकर्षित करते. विशेषतः कोरोना नंतर अनेकांना हे सोयीचे वाटू लागले आहे. मात्र, ऑनलाइन खरेदी करताना फेक रिव्ह्यू म्हणजेच खोटे रिव्ह्यूज ओळखणे हे खूप महत्त्वाचे असते. फेक रिव्ह्यू ग्राहकांची दिशाभूल करू शकतात आणि त्यातून चुकीची खरेदी होऊ शकते. त्यामुळे या फेक रिव्ह्यूंपासून सावधान राहणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

फेक रिव्ह्यू म्हणजे काय?

फेक रिव्ह्यू म्हणजे एखा‌द्या उत्पादनाविषयी चुकीची, फसवणूक करणारी किंवा अतिशयोक्तीपूर्ण माहिती देणारे पुनरावलोकन. या रिव्ह्यूजचा उद्देश उत्पादनाची प्रतिमा सुधारणे किंवा स्पर्धकांच्या उत्पादनाला नकारात्मक दाखवणे हा असू शकतो. हे रिव्ह्यू बऱ्याचदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने तयार केले जातात किंवा पैसे देऊन लिहून घेतले जातात.

फेक रिव्ह्यू ओळखण्याचे कसे?

1. अतिशयोक्तीपूर्ण भाषा तपासाः एखा‌द्या रिव्ह्यूमध्ये उत्पादनाचे वर्णन खूपच अतिशयोक्तीपूर्ण असेल, जसे की “हे उत्पादन माझ्या आयुष्याला वळण देणारे ठरले” किंवा “या उत्पादनाने माझे सगळे प्रश्न सुटले”, तर सावध राहा. अशी भाषा बऱ्याचदा फेक रिव्ह्यूमध्ये वापरली जाते.

2. रिव्ह्यूचा नमुना पहाः जर एका उत्पादनासाठी खूप रिव्ह्यू पॉझिटिव्हच असतील आणि ते एकाच प्रकारची भाषा वापरत असतील, तर ते खोटे असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, “उत्कृष्ट”, “खूप चांगले”, “अप्रतिम” अशा एकसारख्या शब्दांचा वापर संशयास्पद ठरतो. बऱ्याचदा चांगले रिव्यू सुरुवातीला आणि टीका करणारे रिव्ह्यू खाली असतात. त्यामुळे रिव्ह्यू बघताना स्क्रोल करत खाली जाऊन तपासणे आवश्यक असते.

3. संपूर्ण तपशील नसणेः फेक रिव्ह्यू बहुधा अर्धवट किंवा अस्पष्ट माहिती देतात. उदाहरणार्थ, “खूप छान उत्पादन” असे लिहिलेले असेल, पण नेमके काय चांगले वाटले, हे स्पष्ट केलेले नसेल.

4. अत्यंत कमी किंवा जास्त रेटिंग्सः एखा‌द्या उत्पादनाला फक्त 1 किंवा 5 स्टार रेटिंगच दिले गेले असेल, तर तेही फेक रिव्ह्यूचे लक्षण असू शकते. योग्य रिव्ह्यू मध्ये बऱ्याचदा मध्यम रेटिंगसह सविस्तर वर्णन करते.

5. रिव्ह्यू लिहिणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाइल तपासाः रिव्ह्यू लिहिणाऱ्याचे प्रोफाइल बघा. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकाला स्वतःला व्हेरिफाय करावे लागते. अशा व्हेरिफाय खात्याने दिलेला रिव्ह्यू तपासा. ग्राहकाचा इतिहास पाहा. जर त्या व्यक्तीने एकाच वेळी खूप सगळ्या उत्पादनांसाठी रिव्ह्यू लिहिले असतील, किंवा त्यांचे प्रोफाइल अतिशय नवीन असेल, तर तो रिव्ह्यू फेक असण्याची शक्यता जास्त आहे.

6. ग्राहक फोटो आणि व्हिडिओ शोधाः अनेकदा ग्राहक रिव्ह्यूबरोबर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करतात. फेक रिव्ह्यूमध्ये हे घटक नसतात किंवा फोटो असला तरी तो स्टॉक इमेजेससारखा असतो.

7. दुसऱ्या वेबसाइट्सवर शोध घ्याः एखा‌द्या उत्पादनाचे रिव्ह्यू ते उत्पादन विकणाऱ्या वेबसाईट बरोबरच दुसऱ्या एखा‌द्या वेबसाइट्सवर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर वाचा. तपासा.

ऑनलाइन शॉपिंग करताना घ्यावयाची काळजी

1. विश्वासार्ह वेबसाइट्स निवडाः नेहमी प्रसिद्ध आणि विश्वासार्ह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करा. नवीन किंवा अपरिचित वेबसाइट्सवरून खरेदी करणं टाळा. खरेदी करणारच असाल तर थोडी जास्त काळजी घ्या. अलर्ट राहा.

2. customer support तपासाः खरेदी करण्यापूर्वी वेबसाइटवरचे customer support कसे आहे, हे तपासा. फेक वेबसाइट्सवर ग्राहक सेवा सहसा निकृष्ट दर्जाची असते.

3. रिटर्न आणि रिफंड धोरण वाचाः खरेदी करण्यापूर्वी त्या वेबसाइटचे रिटर्न आणि रिफंड धोरण (return and refund policy) वाचा. अस्पष्ट किंवा कठीण अटी असलेल्या वेबसाइट्स टाळा.

4. पेमेंटसाठी सुरक्षित पर्याय निवडाः नेहमी क्रेडिट कार्ड किंवा विश्वासार्ह ऑनलाइन वॉलेट्स वापरा. डेबिट कार्ड किंवा थेट बँक ट्रान्सफर टाळा, कारण यामुळे फसवणूक झाल्यास पैसे परत मिळवणे कठीण होऊ शकते.

5. डिस्काउंट्सचा विचार कराः अतिशय कमी किंमतीत उत्पादन देणाऱ्या ऑफर फसव्या असण्याची शक्यता जास्त असते. जास्त मोठ्या सूट ऑफर्स पाहून लगेच खरेदी करू नका.

6. तांत्रिक सुरक्षितता राखाः शॉपिंगसाठी नेहमी सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट कनेक्शनचा वापर करा. सार्वजनिक Wi-Fi, कॅफे, इंटरनेट कॅफे अशा ठिकाणी असलेले सार्वजनिक इंटरनेट किंवा डिवाईजेस वापरू नका.

7. रिव्ह्यू फोरम्समध्ये सहभागी व्हाः प्रोडक्ट्सबद्दलचे खरे अनुभव जाणून घेण्यासाठी ऑनलाइन फोरम्स, चर्चासत्रे किंवा सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सहभागी व्हा. तेथील लोकांचे अनुभव अधिक प्रामाणिक असतात.

फेक रिव्ह्यू ओळखणे आणि त्यापासून सावधान राहणे हा ऑनलाइन शॉपिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासाठी बारकाईने निरीक्षण, सतर्कता आणि अभ्यास आवश्यक आहे. खरेदी करताना योग्य माहिती गोळा करून विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. फेक रिव्ह्यूजवर विसंबून न राहता स्वतःच्या निरीक्षणांवर आधारित खरेदी केली पाहिजे. जेणेकरून आपण आपला वेळ आणि पैसा वाचतो आणि फसवणूक झाल्यानंतर होणाऱ्या मनस्तापापासून दूर राहू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ