पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बायडेन यांना दिलं सर्वात महागडं बक्षिस 

India's gift to biden family : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सन 2023 सालामध्ये सर्वात महागडं बक्षिस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
[gspeech type=button]

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सन 2023 सालामध्ये सर्वात महागडं बक्षिस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने यासंदर्भातली माहिती प्रसिद्ध केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांची पत्नी म्हणजे अमेरिकेची फर्स लेडी जिल बायडेन यांना 20 हजार अमेरिकन डॉलर्स किंमतीचा हिरा बक्षिस म्हणून दिला होता. हा हिरा 7.5 कॅरेटचा आहे. 

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयानुसार, बायडेन कुटुंबाला दुसरं महागडं बक्षिस हे युक्रेनकडून मिळालं आहे. युक्रेनच्या राजदुताने बायडेन यांना 14,063 अमेरिकन डॉलर्स किंमतीचा ‘ब्रोच’ दिला आहे. तर इजिप्त देशाच्या राष्ट्रपतींनी बायडेन यांना 4,510 अमेरिकन डॉलर्सचा ब्रोच, फोटो फ्रेम आणि ब्रेसलेट बक्षिस म्हणून दिलं आहे. 

भारतीय बक्षिसाला विशेष स्थान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे जिल बायडेन यांना दिलेला 230 हजार अमेरिकन डॉलर्सचा हिरा व्हाईट हाऊसमध्ये ठेवण्यात आला आहे. या हिऱ्याला व्हाईट हाऊसमध्ये विशेष स्थान दिलं आहे. तर अन्य देशोविदेशातील सन्मानीय व्यक्तींकडून देण्यात आलेली बक्षिसं ही सरकारी कोषागारामध्ये जमा करण्यात आली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  जून 2023 सालच्या आपल्या अमेरिका दौऱ्यावेळी  हा हिरा भेट म्हणून दिला होता. हा हिरा भारताच्या लॅबमध्ये विकसीत केलेला आहे. त्याची भारतीय किंमत 17.15 लाख रूपये आहे. कोरीव कलाकुसर केलेल्या चंदनाच्या पेटीमध्ये हा हिरा भेट म्हणून दिला. तसंच ‘ द टेन प्रिन्सिपल्स ऑफ उपनिषध’, तेलाचा दिवा आणि एक पुतळा अशा 6,232 अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय 5.34 लाखाच्या इतर भेटवस्तूही या दौऱ्या दरम्यान दिल्या होत्या.

बायडेन यांना मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांनाही त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या आहेत. उत्तर कोरियाचे अध्यक्ष सूक येऊल यून यांनी 7,100 अमेरिकन डॉलर्सचा फोटो अल्बम भेट म्हणून दिला आहे. 

मंगोलियन पंतप्रधानांनी मंगोलियन वीरांचा 3,495 अमेरिकन डॉलर्सचा पुतळा भेट दिला आहे. तर ब्रुनईच्या सुलतानांनी 3,300 अमेरिकन डॉलर्सचे चांदिचे तबक भेट दिले आहे. युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झेलन्स्की यांनी बायडेन यांना 2,400 अमेरिकन डॉलर्सचं कोलाज आर्ट भेट दिलं आहे. 

कार्यकाल संपताना बक्षिसाची माहिती देणं अनिवार्य

अमेरिकन कायद्यानुसार, सरकारचा कार्यकाल संपताना त्या सरकारमध्ये असलेल्या मंत्रिमंडळापासून महत्त्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना 480 अमेरिकन डॉलरहून अधिक किंमतीच्या मिळालेल्या बक्षिसांची माहिती द्यावी लागते. त्याचप्रमाणे या सगळ्या भेटवस्तू सरकारी कोषागरात जमा कराव्या लागतात. जर कोणत्या अधिकाऱ्याला वा नेत्याला एखादी भेटवस्तू हवी असेल तर त्यांना ती तत्कालीन बाजार किंमतीनुसार सरकारकडून खरेदी करुन घ्यावी लागते. 

सरकारकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार बायडेन यांच्या कार्यकालातील अधिकाऱ्यांना अनेक मौल्यवान घड्याळं, परफ्यूम्स, दुर्बिण कॅमेरा भेटवस्तू म्हणून मिळाल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ