महाकुंभ मेळ्यात अदाणी आणि इस्कॉन मिळून मोफत ‘महाप्रसाद सेवा’ देणार

Mahakumbh 2025 : यंदाच्या महाकुंभ मेळ्यात अदाणी समुहाने इस्कॉनच्या (ISKCON)  सहकार्याने 'महाप्रसाद सेवा' देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत चालणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जगभरातून भाविक महाकुंभ मेळ्यासाठी येत आहेत.
[gspeech type=button]

यंदाच्या महाकुंभ मेळ्यात अदाणी समुहाने इस्कॉनच्या (ISKCON)  सहकार्याने महाप्रसाद सेवादेण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत चालणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जगभरातून भाविक महाकुंभ मेळ्यासाठी येत आहेत.

अदाणी समूहाचे अध्यक्ष, गौतम अदाणी  यांनी या उपक्रमाबद्दल सांगितले की, “महाकुंभ हे सेवा करण्यासाठी एक  पवित्र स्थान आहे, ISKCON च्या मदतीने ‘महाप्रसाद सेवासुरू करणे हे माझे भाग्य आहेमाता अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने लाखो लोकांना मोफत भोजन मिळणार आहे”

या महाप्रसादसेवेद्वारे 50 लाख भक्तांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, यासाठी दोन मोठ्या किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. जे महाकुंभ क्षेत्रात आणि बाहेरच्या भागात देखील असणार आहेत. हा महाप्रसाद पानांच्या पत्रावळीत वाढला जाणार आहे. म्हणजेच या महाप्रसादसेवेत पर्यावरणाची काळजी घेतली जाणार आहे.  महाप्रसादामध्ये रोटी, डाळ, भात, भाजी आणि मिठाई हे पदार्थ असतील. यासाठी 40 असेंब्ली पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेततिथे भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे आणि याठिकाणी 2,500 स्वयंसेवक हे कार्यरत असणारं आहेत.

महाकुंभ मेळा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार विविध उपाययोजना करत आहेत. 

विशेषतः दिव्यांग, वयोवृद्ध आणि बालकांच्या सोयीसाठी गोल्फ कार्ट्सची व्यवस्थाही करण्यात आली आहेभक्तांना सहजपणे सेवांचा लाभ घेता येईल, याबाबत अदाणी समूहाने विशेष काळजी घेतली आहे.

गुरु प्रसाद स्वामी यांनी अदाणी समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्यांनी अदाणी समूहाने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि सर्व भक्तांना या उपक्रमात सहभागी होण्यास सांगितलं आहे.

महाप्रसाद सेवेव्यतिरिक्त, गौतम अदानी यांच्या समूहाने गोरखपूर मुख्यालय गीता प्रेसलाही सहकार्य केले आहे. अदानी ग्रुपने त्यांच्याकडून आरती संग्रहाच्या सुमारे 1 कोटी प्रती छापल्या आहेत. या आरती संग्रहात भगवान शिव, गणेश, विष्णू, दुर्गा-लक्ष्मी आणि इतर देवतांना समर्पित भजन किंवा आरत्या समाविष्ट आहेत. हा संग्रह महाकुंभमेळ्यात भाविकांना मोफत वाटण्यात येणार आहे.

144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभात सहभागी होणाऱ्या या भक्तांना सोनेरी क्षण अनुभवायला मिळणार आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण
Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ