जपानने लॉन्च केलं लाकडी सॅटेलाइट! कसं आहे नेमकं लिग्नोसॅट सॅटेलाइट?

Japan wooden satellite : धातूपासून बनविलेल्या सॅटेलाइट्सनां पर्याय मिळावा व अवकाशात लाकूड टिकू शकतं की नाही हे अभ्यासण्यासाठी जपानने लाकडी सॅटेलाइटचा प्रयोग केला आहे.
[gspeech type=button]

अवकाश संशोधन, विविध क्षेत्राची माहिती मिळवण्यापासून तर परग्रहांचा अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत हजारो सॅटेलाइट्स अवकाशात सोडले आहेत. मात्र, एखादं सॅटेलाइट अवकाशामध्ये राहू शकतं की नाही, याचा अभ्यास करण्यासाठीच ते अवकाशात सोडलं तर? जपानने अशा स्वरुपाच एक सॅटेलाइट अवकाशात कसं तग धरु शकतं, हे अभ्यासण्यासाठी लॉन्च केलं आहे. 

जाणून घेऊयात हे कोणतं आणि कशा स्वरुपातलं सॅटेलाइट आहे? 

जपानने लॉन्च केलं लाकडी सॅटेलाइट

जपानने अलिकडेच ‘डिफेन्स आणि एक्सपेरीमेंटल सॅटेलाइट्स’ लॉन्च केल्या. यामधील ‘एक्सपेरीमेंटल सॅटेलाइट’ हे लाकडापासून तयार करण्यात आले आहेत. या सॅटेलाइटचं नाव लिग्नोसॅट असं आहे. लिगनम हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ लाकूड असा आहे.  

क्योटो युनिव्हर्सिटी आणि लाकडांपासून घर निर्मिती करणाऱ्या सुमितोमो फॉरेस्ट्री यांनी संयुक्तपणे या सॅटेलाइटची निर्मिती केली आहे. 

जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजंसीकडून हे सॅटेलाइट अंतराळात सोडलं आहे. हे सॅटेलाइट पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर असणार आहे. 

लाकडी सॅटेलाइट का?

अवकाशामध्ये लाकूड टिकू शकतं की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी जपानकडून हे खास लाकडी सॅटेलाइट अंतराळात सोडलं आहे. क्योटो विद्यापीठातील प्राध्यापक ताकाओ डोई म्हणतात की, “लाकूड हे दीर्घकाळ टिकू शकतं. अंतराळातील हवामानामध्ये लाकडू टिकत असेल तर भविष्यात लाकडापासूनच घरं उभारता येतील का?  तसंच विविध धातूंनी बनवलेल्या सॅटेलाइटपेक्षा लाकडांनीच सॅटेलाइट बनवता आले तर ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल, या उद्देशाने जगातलं पहिलं लाकडी सॅटेलाइट तयार केलं आहे.” 

हे सॅटेलाइट अंतराळात पुढचे सहा महिने राहणार आहे.  या सहा महिन्यात अंतराळात विविध वातावरणात हे सॅटेलाइट तग धरुन राहतं की नाही? बदलत्या हवामानाचा त्यावर काय परिणाम होतो, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मानवाला अंतराळामध्ये वास्तव करण्यासाठी घर निर्मितीसाठी हा व्यवहार्य पर्याय ठरु शकतो. तसेच, लाकडापासून तयार केल्या जाणाऱ्या सॅटेलाइट्स मुळे अवकाशात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाणही कमी होऊ शकेल. 

लाकडी सॅटेलाइट कसं बनवलं आहे?

या सॅटेलाइटसाठी होनोकी सायप्रेस या झाडाच्या मैग्नोलिया जातीतल्या लाकडाचा वापर केला आहे. हे सॅटेलाइट 10 सेंटीमीटर लांबीची आहे. हे सॅटेलाइट 4 इंचाच्या क्यूबच्या आकाराची आहे. याचं वजन  जवळपास 2 पौंड म्हणजे 1 किलोपेक्षाही कमी वजन आहे. लाकडापासून तयार केलेल्या या विशेष सॅटेलाइटसाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.  

 लाकडी विमानापासून घेतली प्रेरणा

सन 1903 मध्ये लाकडापासून विमानाची निर्मिती केली होती. यापासूनच प्रेरणा घेत जपानमधील क्योटो विद्यापीठातल्या प्राध्यापक ताकाओ डोई यांनी सॅटेलाइट तयार करण्याची संकल्पना मांडली.  होनोकी लाकूड हे दीर्घकाळ टिकतं हे अभ्यासाअंती स्पष्ट झाल्यावर सॅटेलाइटसाठी या लाकडाची निवड करण्यात आली. सॅटेलाइटसाठी होनोकी लाकूड वापरण्यास  नासाकडून परवानगी मिळाल्यावरच डोई यांनी या सॅटेलाइटची निर्मिती केली. या संपूर्ण लाकडी सॅटेलाइटमध्ये ग्लू किंवा स्क्रूचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने ते घडवलं आहे. 

हे सॅटेलाइट जर सहा महिने उत्तमरित्या टिकलं तर  पुढच्या 50 वर्षात चंद्रावर आणि मंगळ ग्रहावर लाकडापासून बनवलेल्या विविध वस्तू पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. 

अंतराळातले तापमान आणि लाकडी सॅटेलाइट

अंतराळातील तापमान हे जलदगतीने बदलत असतं. वजा 100 ते अधिक  100 अंश सेल्सीयस असा वातावरणीय बदल झपाट्याने होतो. या बदलामध्ये, सॅटेलाइटच्या लाकडी आवरणात असलेले सेमी कंडक्टर हे चीप्सचं रक्षण करुन शकतात का? रेडीएशनचा परिणाम या सेमीकंडक्टर चीप वर होईल का? याचा अभ्यास केला जाणार आहे. 

आतापर्यंत धातूंनी तयार केलेल्या सॅटेलाइट्समुळे ॲल्युमिनियम ऑक्साईड हा बाहेर सोडला जातो. यामुळे प्रदूषण निर्मिती होते. अवकाशात धातूंचा मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होते. मात्र, जर लाकडी सॅटेलाइटचा प्रयोग यशस्वी झाला तर, प्राध्यापक डोईच्या मते, धातूपासून बनवल्या जाणाऱ्या सॅटेलाइटवर यापुढे बंदी घालून, फक्त लाकडी सॅटेलाइटनाच परवानगी दिली जाऊ शकते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Khon Art : भारतात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये कथा सादर केली जाते. काहीसा अशाच प्रकारचा नृत्यप्रकार हा थायलंडमध्ये सादर
Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ