भारतीय नौदलात तीन नवीन युद्धनौका सामील

Indian Navy : नेव्हीडेच्या निमित्ताने मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयएनएस वाघशीर (पाणबुडी), आयएनएस सुरत आणि आयएनएस नीलगिरी या तीन अत्याधुनिक लढाऊ युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत.
[gspeech type=button]

मुंबई,15 जानेवारी 2025, आज नेव्हीडेच्या निमित्ताने मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयएनएस वाघशीर (पाणबुडी), आयएनएस सुरत आणि आयएनएस नीलगिरी या तीन अत्याधुनिक लढाऊ युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत.

आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस सुरत युद्धनौका

आयएनएस नीलगिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत निर्माण करण्यात आलेली अत्याधुनिक युद्धनौका आहे. ही युद्धनौका शिवालिक श्रेणीतील जहाजांपेक्षा जास्त प्रगत आहे. यामध्ये स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे जहाज रडारवर जास्त दिसत नाही आणि ते शोधणे अवघड होते. यामध्ये कमी रडार सिग्नेचर देखील आहे. म्हणजे रडारद्वारे जहाज सापडण्याची शक्यता कमी आहे.

आयएनएस सुरत ही प्रोजेक्ट 15B च्या अंतर्गत बनवलेली एक विनाशका आहे. ही कोलकाता क्लास (प्रोजेक्ट 15A) च्या विनाशकां पेक्षा सुधारित आणि अधिक सक्षम आहे. 

भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने या दोन्ही विनाशिका डिझाईन केल्या आहेत आणि यामध्ये विविध प्रकारच्या हेलिकॉप्टर्ससाठी आधुनिक उड्डाण सुविधा आहेत. यात चेतक, एएलएच, सी किंग आणि MH-60R हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर्स दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा वापरता येऊ शकतात. या जहाजांमध्ये महिलांसाठीही विशेष निवास व्यवस्था आहे. यामुळे  नौदलाच्या लढाऊ भूमिकांमध्ये महिलांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

आयएनएस वाघशीर पाणबुडी

आयएनएस वाघशीर ही कलवरी-श्रेणीच्या प्रकल्प 75 अंतर्गत बनवलेली सहावी स्कॉर्पियन श्रेणीची पाणबुडी आहे. ही पाणबुडी डिझेल-इलेक्ट्रिक इंधनावर चालते. हिचा आवाज अतिशय कमी आहे. एक बहुउद्देशीय पाणबुडी आहे. वागशीर पाणबुडीला विविध प्रकारच्या मोहिमांसाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे  आणि विशेष मोहीमांसाठी सक्षम शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. वाघशीर पाणबुडीत  एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञानासारखी अत्याधुनिक तंत्रे असू शकतात. यामुळे त्याची कार्यक्षमता वाढवता येईल. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ