महाकुंभ मेळाव्यामध्ये आध्यात्मिकतेचा अनुभव घेण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही लाखो भाविक येत असतात. पवित्र नदीमध्ये स्नान केल्यावर आध्यात्मिक शांती आणि ध्यानसाधना करण्यासाठी अनेक जण योगचा अवलंब करतात. यासाठी उत्तर प्रदेश पर्यटन खात्याने योग आणि ध्यानसाधना करु इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा विशेष एकदिवसीय सत्र आयोजित केली आहे.
योग
योग हा केवळ व्यायाम आणि ध्यानसाधनेचा प्रकार असून व्यक्तिनं आपलं संपूर्ण आयुष्य कसं जगावं याविषयी मार्गदर्शन करणारी ही प्रक्रिया असते. मनुष्याचं राहणीमान, आरोग्य, आहार, विहार, कार्य अशा प्रत्येक गोष्टीत कार्य करुन आयुष्याला अर्थ प्राप्त करुन देत असतो. आसनं हा योग मधला एक भाग वा पहिली पायरी आहे.
महाकुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी आणि परिसरात धार्मिक, सकारात्मक उर्जा असलेल्या ठिकाणी योगासने आणि ध्यानसाधना केल्याने अधिक उर्जा मिळते. अशा ठिकाणी या क्षेत्रातल्या चांगल्या प्रभावशाली व्यक्तिंकडून प्रशिक्षण घेण्याची संधी उत्तरप्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने भाविकांना दिली आहे.
योग, ध्यानसाधना सत्राची माहिती
योग आणि ध्यानसाधना असं संपूर्ण एक दिवसाचं सत्र असतं. सकाळी 6 वाजता या सभाला सुरुवात होते. प्रयागराजमधल्या राही त्रिवेणी दर्शन येथे असलेल्या फ्लोटींग रेस्टॉरंट वर हे सत्र आयोजित केलं जातं. या सत्रात आध्यात्मिक जीवना संबंधित दूरदृष्टी या विषयावर मार्गदर्शन करुन ध्यानसाधना केली जाते. त्यानंतर जेवन दिलं जातं. जेवनानंतर योगासने आणि ध्यानसाधनाचं सत्र असते. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता त्रिवेणी संगमावर संगम आरती करुन सत्राची सांगता होते.
सत्राचे दर 5 हजार रुपये
या संपूर्ण दिवसाच्या योग आणि ध्यानसाधना सत्रासाठी जीएसटीसह प्रती व्यक्ती 5 हजार रुपये आकारले जातात. यामध्ये प्रवासासाठी बोटीचे दर, सकाळी बोटीवर आल्यावर दिलं जाणारं वेलकम ड्रिंक, नाश्ता, दुपारचं जेवण याचा समावेश आहे. शिवाय या सत्रात गाइड, मेळाव्याचा नकाशा आणि पुस्तिका, इको-फ्रेंडली पिशवी आणि मिनरल पाण्याची बाटली दिली जाते.
महाकुंभ मेळावा परिसर आणि फोटोग्राफी टूर
महाकुंभ मेळावा परिसर आणि फोटोग्राफी ही संपूर्णत: महाकुंभ मेळाव्याची साइट सिंग करुन देणारी टूर आहे. सकाळी 7 वाजता परेड ग्राउंडमधल्या टेंट कॉलनी पासून या टूरला सुरुवात होते. यामध्ये पर्यटकांना बडे हनुमान जी कॉरिडोर, अक्षय्यावता कॉरिडोर, त्रिवेणी संगम दाखवलं जातं. एका आखाड्यातून फिरवलं जातं. त्यानंतर नागा साधू, अघोरी आणि कल्पवासी यांच्याशी भेट घालून देत त्यांच्याबद्दल माहिती देतात.
या संपूर्ण टूरसाठी 3 तास लागतात. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ही टूर असते. यासाठी 2500 रुपये आकारले जातात. यामध्ये गाइडची फी, मेळाव्याचा नकाशा आणि पुस्तिका, इको-फ्रेंडली पिशवी आणि एक पाण्याची बाटली दिली जाते.
टूर रद्द झाली तर रिफंड नाही
या टूरसाठी कमीतकमी पाच सदस्य असणं अनिर्वाय आहे. जर का प्रयागराजमध्ये हवामान बदल झाला किंवा अन्य कोणत्या घटनेमुळे राज्य सरकारने एखाद्या दिवशीची टूर रद्द केली. तर त्यादिवशी नोंदणी केलेल्या पर्यटकांना अन्य उपक्रमात सामावून घेतलं जातं. मात्र रिफंड दिला जात नाही. या टूरसाठी उत्तरप्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर https://upstdc.co.in/Web/kumbh2025 नोंदणी करता येते.