वेगवेगळ्या एआय असिस्टंट ॲपमधलं वैविध्य

AI assistant app : आता चर्चा होतेय ती वेगवेगळ्या एआय असिस्टंट ॲपच्या वापराबद्दल. या ॲपचे दर, ते कसे काम करतात, ते हाताळताना काय अडचणी आहेत, कोणत्या ॲपची काय वैशिष्ट्य आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
[gspeech type=button]

चीन स्टार्ट अप कंपनी डीपसीकच्या एआय असिस्टंट ॲपने आयटी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे. अर्ध्यापेक्षा कमी किंमतीमध्ये कमी मनुष्यबळामध्ये हे ॲप चीनने विकसीत केलं आहे. त्यामुळे अमेरिकेपासून अनेक देशांमध्ये हे ॲप चर्चेचा विषय झाला आहे.

पण आता चर्चा होतेय ती या वेगवेगळ्या एआय असिस्टंट ॲपच्या वापराबद्दल. या ॲपचे दर, ते कसे काम करतात, ते हाताळताना काय अडचणी आहेत, कोणत्या ॲपची काय वैशिष्ट्य आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

डीपसीक एआय असिस्टंट ॲप

सामान्य माहिती आणि छोट्या-मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी डीपसीकचं मोफत व्हर्जन युजर्ससाठी उपलब्ध आहे. तर, दर महिन्याला 43 रुपयाचं पेड सबस्क्रिप्शन आहे. पायथॉन आणि जावा या कॉम्प्युटर भाषेमध्ये कोडींग तयार करण्यासाठी आणि कठीण गणितं सोडवण्यासाठी या डीपसीक ॲपचा चांगला उपयोग होतो.

मात्र, भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या विषयाची माहिती या एआय असिस्टंट ॲपवर मिळत नाही.

डीपसीकचे आर 1 मॉडेल हे गणितं, सामान्य ज्ञान आणि सामान्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ओपन एआयच्या जीपीटी आणि गुगलच्या जेमिनीच्या बरोबरीचे आहेत.

ओपन एआय चॅट जीपीटी

ओपन एआय कंपनीचं चॅट जीपीटी हे एआय असिस्टंट ॲप हे सुद्धा मोफत आहे. याचं ॲडव्हान्स व्हर्जन वापरण्यासाठी प्रती महिना 20 डॉलर म्हणजे 1 हजार 730 रुपये मोजावे लागतात. कथा तयार करणं, जोक्स तयार करणं आणि डिजीटल मार्केटिंग मध्ये चॅट जीपीटी हे जीपसीकपेक्षा चांगलं काम करतं.

चॅट जीपीटी हे वापरण्यासाठी खूप सोपं आहे. सद्य घडामोंडीविषयी आपण चॅटजीपीटीला विचारल्यावर तो खूप जलदगतीने आपल्याला आवश्यक ती माहिती पुरवतो.

मात्र, हे एआय तंत्रज्ञान जरी असलं तरी त्यामध्ये विविध विषयांची माहिती अपलोड केलेली आहे. त्यामुळे काही विषय वा घटनांवर तथ्यांवर आधारित उत्तरं मिळण्याऐवजी त्या ॲपमध्ये अपलोड केलेल्या माहितीनुसार एकांगी स्वरूपातली माहिती उत्तरादाखल कधी कधी मिळते.

 हे ही वाचा : अमेरिका आणि चीन मध्ये ‘एआय’ वॉर

गुगल्स जेमिनी

गुगलचं जेमिनी 1.5 व्हर्जन हे वापरकर्त्यांसाठी मोफत आहे. तर जेमिनी ॲडव्हान्स व्हर्जनसाठी प्रती महिना 22.45 डॉलर म्हणजे 1 हजार 950 रुपये मोजावे लागतात.
टेक एक्सपर्टच्या मते, जेमिनी एआय हे प्रश्नांना जलदगतीने उत्तरं देण्यासाठी आणि अहवालाचं विश्लेषण करण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये एआय व्हिडीओ, फोटो आणि म्युझिक सुद्धा तयार करता येते.

दरम्यान, कॉम्प्युटर लँग्वेज पायथॉन मध्ये या एआय असिस्टंट ॲपवर थेट कोडींग करणं जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुटसुटीत, वापरकर्त्याला वापरण्यासाठी योग्य अशा पद्धतीने जेमिनीचं डिझाईन केलेलं आहे.

मायक्रोसॉफ्ट कोपायलट

मायक्रोसॉफ्टच्या कोपायलट या एआयचे दोन व्हर्जन आहेत. एक एआय कोपायलट आणि दुसरं कोपायलट प्रो. त्यापैकी कोपायलट प्रो व्हर्जनसाठी 23.11 डॉलर म्हणजे 2 हजार रुपये प्रती महिना मोजावे लागतात. या कोपायलट प्रो व्हर्जनमध्ये वापरकर्त्यांला अधिकाधिक पर्याय, मॉडेल्स वापरायला मिळतात. मायक्रोसॉफ्टचं कोपायलट हे मायक्रोसॉफ्ट मध्ये एकत्र केल्याबद्दल मायक्रोसॉफ्टची कार्यक्षमता ही अधिक चांगली झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते कोणतं एआय असिस्टंट आहे बेस्ट?

आयटी तज्ज्ञांच्या मते डीपसीक हे गणितं सोडवण्यासाठी, लॉजिकल रिझनिंग आणि कोडिंगसाठी उत्तम आहे. शिवाय हे ॲप तंतोतंत, कमी शब्दात आणि तार्किक उत्तरं देतं. क्रिएटिव्हीटी, संवाद साधणं आणि चालू घडामोडींवर अद्ययावत माहिती ही चॅट जीपीटीवर तातडीने मिळते.

व्हार्टन विद्यापीठाचे प्रोफेसर एथन मोलिक यांनी त्यांच्या ‘वन युजफुल थिंग’ या ब्लॉगमध्ये एआय असिस्टंट वापरकर्त्यांसाठी चॅट जीपीटी, जेमिनी आणि क्लॉड हे एआय असिस्टंटचे सशुल्क मॉडेल वापरण्याचं आवाहन करतात. जे युजर्स एक्स ॲप वापरतात, ते त्याचं ग्रोक एआय ॲप ही वापरू शकतात. कारण या ग्रोक मध्ये मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि चॅट जेपीटी सारखेच फीचर्स असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्या अमेरिकन कंपन्यांच्या एआय असिस्टंट ॲपसोबत चीनचं डीपसीक एआय ॲप ही तितकंच उत्तम असल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे.

एआय ॲपच्या मदतीने वेब तपासणी

फर्स्टपोस्टच्या माहितीनुसार, प्रोफेसर एथन मोलिक यांनी आणखीन एक गोष्ट नमूद केली की, आता उपलब्ध असलेले सगळेच एआय ॲप हे वेब सर्चिंग करु शकत नाहीत. जेमिनी, ग्रोक, डीपसीक, कोपायलट आणि चॅटजीपीटी ही एआय ॲप वेब सर्चिंग करतात. मात्र, क्लॉड ॲप हे वेब सर्चिंग करु शकत नाही.

वेब सर्चिंगचा उपयोग चालू घडामोडी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी होतो. जर आपलं एआय ॲप वेब सर्चिंग करत असेल तर चालू घडामोंडीवर किंवा फॅक्ट चेक करण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

UPI: मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जवळपास तीन वेळा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे जी पे
Cotton or linen : कॉटन आणि लिनेन हे दोन वेगळ्या प्रकारचे कापड आहेत. लिनेन हे फ्लेक्स नावाच्या एका खास प्रकारच्या
Pope Election Process : रोमन कॅथॉलिक समुदायाचे पोप फ्रान्सिस यांचे भारतीय वेळेप्रमाणे सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी निधन झालं.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ