2020 मध्ये 19 करोडहून अधिक लोकांना ‘शुगर ड्रिंक्स’ प्यायल्याने मधुमेह !

Sugary drinks : 'शुगर ड्रिंक्स' तुमच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं एका नवीन संशोधनात समोर आलं आहे. 2020 मध्ये जगभरात तब्बल 19 करोडहून अधिक लोकांना फक्त 'शुगर ड्रिंक्स' प्यायल्यामुळे टाइप 2 डायबिटीसह झाला आहे .
[gspeech type=button]

तुम्ही ‘शुगर ड्रिंक्स’ पिता का? हे ‘शुगर ड्रिंक्स’ तुमच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं एका नवीन संशोधनात समोर आलं आहे. 2020 मध्ये जगभरात तब्बल 19 करोडहून अधिक लोकांना फक्त ‘शुगर ड्रिंक्स’ प्यायल्यामुळे टाइप 2 डायबिटीसह झाला आहे .

द वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, नेचर मेडिसिन या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनात 184 देशांतील डेटा तपासण्यात आला. या संशोधनात असे दिसून आले की, ‘शुगर ड्रिंक्स’ प्यायल्यामुळे टाईप 2 डायबिटीस आणि हृदयरोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढले आहेत.

या संशोधनात असेही दिसून आलं की, पुरुष हे स्त्रियांच्या तुलनेत जास्त ‘शुगर ड्रिंक्स’ पितात. त्याचबरोबर, तरुण वयातील, उच्च शिक्षित लोक आणि शहरात राहणारे लोक हे ‘शुगर ड्रिंक्स’ अधिक प्रमाणात पितात.

विशेषत: लॅटिन अमेरिका, कॅरेबियन आणि सब-सहारन आफ्रिकेतील लोकांमध्ये ‘शुगर ड्रिंक्स’ पिण्यामुळे मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सब-सहारन आफ्रिकेत 2020 मध्ये शुगर ड्रिंक्समुळे 21% नवीन मधुमेहाचे रुग्ण आढळले, तर अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये या पेयांमुळे जवळपास 24% नवीन मधुमेहाचे रुग्ण आणि 11% पेक्षा जास्त हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे रुग्ण आढळले आहेत.

कोलंबियात 1990 ते 2020 या कालावधीत शुगर ड्रिंक्स प्यायल्यामुळे टाईप 2 डायबिटीस रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोलंबियात 10 लाख प्रौढांमागे सरासरी 793 नवीन रुग्णांची भर पडली होती. 2020 मध्ये कोलंबियातील 50% नवीन रुग्ण हे टाईप 2 डायबिटीसशी संबंधित होते. याच काळात, अमेरिकेतही दर 10 लाख प्रौढांमागे सरासरी 671 नवीन टाईप 2 डायबिटीसचे रुग्ण वाढले.

वॉशिंग्टन पोस्टच्या एका प्रेस रिलीझमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शुगर ड्रिंक्समुळे जगभरात मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फूड इज मेडिसिन इन्स्टिट्यूटचे संचालक आणि वॉशिंग्टन पोस्टचे ज्येष्ठ लेखक डॅरियश मोझफ्फरियन यांनी सांगितले की, शुगर ड्रिंक्समुळे लोकांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे खासकरून गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे, कारण अशा देशांमध्ये शुगर ड्रिंक्सची विक्री जास्त आहे आणि त्यांच्याकडे या आजारांवर उपचारासाठी लागणाऱ्या पुरेश्या सुविधा उपलब्ध नसतात.

संशोधकांचे म्हणणे आहे की, शुगर ड्रिंक्समुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ