‘ऑपरेशन डेविल हंट’ बांग्लादेशमध्ये अघोषित आणिबाणी?

Operation Devil hunt : बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी ‘ऑपरेशन डेविल हंट’ राबवण्यास सुरुवात केली आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत 1 हजार 300 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 
[gspeech type=button]

बांग्लादेशमध्ये ऑगस्ट 2024 माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार उलथवून लावल्यानंतर अशांततेचं वातावरण निर्माण झालं होतं. फेब्रुवारी 2025 मध्ये या घटनेला सहा महिने पूर्ण होतील. मात्र अजूनही तेथील राजकीय, सामाजिक परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही.

दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झालेल्या हिंसाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी ‘ऑपरेशन डेविल हंट’ राबवण्यास सुरुवात केली आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत 1 हजार 300 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

हिंसाचाराचं कारण काय ?

बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीग या राजकीय पक्षाविरोधात अद्यापही संतापाचं वातावरण आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी काही समाजकंटकांनी ढाकामधल्या धानमंडी 32 येथल्या शेख मुजीबुर रेहमान, ज्यांनी बांग्लादेश मुक्तीसंग्रामासाठी बलिदान दिले त्यांच्याच स्मारकावर आणि घरावर हल्ला केला. 

ढाका ट्रिब्यून या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सोशल मीडियावरुन प्रसारित झालेल्या भाषणानंतर आंदोलनकर्त्यांनी शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रेहमान यांच्या स्मारकावर आणि घरावर हल्ला केला. त्यांनी त्यादिवशी रात्रीपर्यंत घराची तोडफोड करत आग लावली होती. सलग चार दिवस ठिकठिकाणी आवामी लीग पार्टीच्या कार्यालयावर हल्ले सुरू होते. ऑगस्ट 2024 मध्ये सुद्धा आंदोलनकर्त्यांनी शेख मुजीबुर रेहमान यांची पुतळ्याची आणि स्मारकाची तोडफोड केली होती. 

‘ऑपरेशन डेविल हंट’ नेमकं काय आहे?

धानमंडी 32 येथून सुरू झालेला हा हिंसाचार देशभर पसरला होता. या वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी ‘ऑपरेशन डेविल हंट’ची घोषणा केली आहे. 

स्थानिक पोलिस, लष्कर आणि विविध तपाय यंत्रणेच्या माध्यमातून देशभरात हे ऑपरेशन राबविण्यात येत आहे. गाजीपूरमध्ये विद्यार्थी सेनेवर हल्ले व्हायला लागल्यामुळे सरकारने गांभीर्यपूर्वक हे ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. 

या ऑपरेशन अंतर्गत देशभरात हिंसक कारवायामध्ये सहभागी असलेल्या सर्व आंदोलकांना, समाजकंटकांना ताब्यात घेतलं जात आहे. आतापर्यंत 1 हजार 300 जणांना सरकारने अटक केली आहे. 

देशद्रोही कृत्य करणाऱ्यांना नेस्तनाबूत करणार

देशात अशांतता निर्माण करणारे, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्याअंतर्गत अशा सर्व लोकांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय हे ऑपरेशन संपणार नाही, अशी माहिती लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांनी माध्यमांना दिली. 

दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

ऑगस्ट 2024 पासून बांग्लादेशमध्ये आवामी लीग आणि बांग्लादेश नॅशनल पार्टी सह अन्य विरोधी पक्षादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहेत. देशात ठिकठिकाणी आवामी लीग पक्षाच्या कार्यालयांवर, कार्यकर्त्यांवर हल्ले सुरू आहेत. त्यामुळे या सर्व घटनांना आता बंदी घालण्यासाठी अंतरिम सरकाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी कठोर निर्देश दिले आहेत. 

आवामी लीगच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई

ऑपरेशन डेविल हंट अंतर्गत आवामी लीगच्या कार्यकर्त्यावरही सरकारने कारवाई केली आहे. जवळपास 81 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तर या संपूर्ण मिशनमध्ये 14 लोकं जखमी झाले आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

India - America : पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्यावर भारताने आतापर्यंत कधीच कोणत्याच देशाची मध्यस्थी स्विकारली नाही आणि यापुढेही
Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ