आपण अनेकवेळा पाणी पिण्यासाठी बाजारातून पाण्याची बॉटल विकत घेतो. पण, कधी तुम्ही या बाटल्यांच्या झाकणाच्या रंगांकडे बारकाईने लक्ष दिलं आहे का? कदाचित नाही! पण आज आपण जाणून घेणार आहोत की हे झाकणाचे रंग केवळ डिझाइन किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाही, तर त्या रंगांमागे काही खास अर्थ आहेत.
भारतामध्ये 1970 च्या दशकात बाटलीतलं पाणी वापरायला सुरुवात झाली. पण आता बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या झाकणांच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात. या रंगांवरूनच आपण आपल्या गरजेनुसार योग्य पाण्याची बाटली निवडू शकतो.
पाण्याच्या बाटलीच्या झाकणांच्या रंगांचा अर्थ
1.निळं झाकण – शुद्ध आणि मिनरल-रिच वॉटर
निळ्या रंगाचं झाकण असणाऱ्या बाटलीत सहसा नैसर्गिक झऱ्यातून आलेलं पाणी असतं, आणि त्यात आपल्या शरीराला लागणारी महत्त्वाची खनिजं म्हणजेच क्षार आणि सल्फर कंपाउंड्स असतात. हे पाणी शुद्ध आणि ताजं असतं. त्यामुळे ते रोज पिण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.
2.हिरवं झाकण – फ्लेवर पाणी
जर तुमच्या बाटलीवर हिरवं झाकण असेल, तर याचा अर्थ त्या पाण्यात फ्लेवर मिक्स केला आहे. कंपनी या पाण्यामध्ये फळांचे अर्क किंवा इतर नैसर्गिक चवी मिसळतात, यामुळे पाण्याची चव वाढते.
3.पांढरं झाकण – शुद्ध आणि डिस्टिल्ड पाणी
पांढऱ्या झाकणाच्या पाण्याच्या बाटलीमधील पाणी खूप शुद्ध केलेलं असतं. त्यामुळे पाण्यामधील घाण पूर्णपणे निघून जाते. हे पाणी खूप स्वच्छ असतं. ज्या लोकांना एकदम शुद्ध पाणी प्यायला आवडतं, त्यांच्यासाठी हे पाणी योग्य आहे.
4.काळं झाकण – अल्कलाइन पाणी
काळं झाकण म्हणजे अल्कलाइन पाणी. या पाण्याची pH पातळी जास्त असते. काही लोकांच्या मते, हे पाणी पचनासाठी आणि शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासाठी चांगलं असतं. हे पाणी खास असल्यामुळे ते साध्या पाण्याच्या बाटलीपेक्षा या पाण्याची बाटली जास्त महाग असतं.
5.पिवळं झाकण – व्हिटॅमिनयुक्त पाणी
पिवळ्या रंगाचं झाकण असलेल्या बाटलीत व्हिटॅमिन आणि क्षार मिसळलेले असतात, जे खेळाडू आणि जास्त पाणी पिणाऱ्यांसाठी फायदेशीर असतात.
6.लाल झाकण – इलेक्ट्रोलाईट-युक्त झऱ्याचं पाणी
लाल झाकण म्हणजे झऱ्याच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स मिसळलेले असतात. हे पाणी जास्त मेहनत करणाऱ्या आणि गरम हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी चांगलं असते.
7.पारदर्शक झाकण – नैसर्गिक किंवा डिस्टिल्ड पाणी
पारदर्शक झाकण सहसा नैसर्गिक झऱ्याच्या पाण्यासाठी किंवा डिस्टिल्ड पाण्यासाठी वापरलं जातं. हे शुद्धता आणि पारदर्शकता दर्शवतं. त्यामुळे अनेक लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
झाकणांच्या रंगाचं महत्त्व
झाकणांच्या रंगांचा उपयोग फक्त पाण्याचा प्रकार ओळखण्यासाठी नाही, तर ब्रँडिंगसाठी आणि पर्यावरणासाठीही महत्त्वाचा आहे.
ग्राहकांना योग्य निवड करण्यास मदत- झाकणाचा रंग पाहून ग्राहकांना योग्य पाणी निवडणं सोपं होतं.
ब्रँडची ओळख वाढवणे – कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टची ओळख मजबूत करण्यासाठी एकसारखे झाकणांचे रंग वापरतात
बाटलीच्या झाकणांच्या रंगांमधील बदल
सुरुवातीला, कंपन्यांनी साध्या पद्धतीने रंग वापरले. पण पुढे ग्राहकांची आवड बदलत गेली. मग झाकणांच्या रंगांमध्ये विविधता आली. आजकाल झाकणांचे रंग फक्त कंपन्यांची ओळख बनवत नाहीत, तर ते ग्राहकांच्या खरेदीवरही परिणाम करतात. एका संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की 70% पेक्षा जास्त ग्राहक झाकणांच्या रंगावरून पाण्याची बाटली खरेदी करण्याचा विचार करतात.
पर्यावरणाची काळजी
पर्यावरणाच्या काळजीमुळे, बाटलीच्या झाकणांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे झाकण बनवण्यासाठी कंपन्या रिसायकल आणि रियुज घटकांचा वापर करण्याचा विचार करत आहेत. तर काही कंपन्यांचा स्मार्ट झाकणं बनवण्याचा विचारही चालू आहे, जे पाण्याची गुणवत्ता दर्शवतील. तसंच , पारदर्शक लेबलिंग आणि पर्यावरणाला मदत करणारे पॅकेजिंग यामुळे झाकणांच्या रंगांचा वापर बदलेल.
पुढच्यावेळी पाण्याची बाटली घेताना, झाकणाच्या रंगाकडे लक्ष द्या. झाकणाचा रंग तुम्हांला योग्य प्रोडक्ट निवडण्यास मदत करेल.