काळं प्लास्टिक काय आहे आणि ते वापरणं सुरक्षित आहे का?

Black Plastic : घरात दैनंदिन वापरात असलेल्या काळ्या प्लास्टिकमध्ये हानीकारक रसायनं असतात त्यामुळे हे प्लास्टिक वापरणं धोकादायक असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
[gspeech type=button]

आपण स्वयंपाकघरात किंवा दैनंदिन वापरात काळ्या प्लास्टिकच्या वस्तू बऱ्याचवेळा वापरतो. चमचे, डबे किंवा स्वयंपाकाच्या इतर वस्तू काळ्या प्लास्टिकच्या असतात. पण हे काळं प्लास्टिक खरंच सुरक्षित आहे का?

या प्रश्नाचं उत्तरं शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधनं केली आहेत. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलं की काळया प्लास्टिकमध्ये काही हानीकारक रसायनं असतात, जी अन्नामध्ये मिसळल्यास आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात.  पण याच संशोधनात नंतर काही त्रुटी आढळल्या, त्यामध्ये रसायनांची पातळी जास्त असल्याचं दिसून आलं. त्यामुळे, काळं प्लास्टिक वापरणं किती सुरक्षित आहे, याबद्दल अजून संशोधन चालू आहे.

कसं बनतं काळं प्लास्टिक आणि ते धोक्याचं का आहे?

आजकाल आपण अनेक प्लास्टिकच्या वस्तू वापरतो, त्यापैकी काही वस्तू ह्या काळया प्लास्टिकच्या असतात. हे प्लास्टिक आपल्या घरात, ऑफिसमध्ये, अगदी खेळण्यांमध्येही वापरलं जातं. पण हे काळं प्लास्टिक कसं बनतं, आणि ते आपल्यासाठी धोक्याचं का आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

आपण वापरतो ते काळं प्लास्टिक बऱ्याचदा टीव्ही, कॉम्प्युटर आणि इतर उपकरणं अशा जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू रिसायकल करून बनवलं जातं. या वस्तूंच्या आतमध्ये काही हानीकारक रसायनं असतात. ज्यात  ब्रोमीन, अँटिमनी,शिसे, कॅडमियम, मर्क्युरीसारखे विषारी धातूंचा समावेश होतो. हे धातू आणि रसायनं माणसांसाठी खूप घातक असतात आणि अनेक देशांमध्ये यावर बंदी आहे. पण, जुन्या प्लास्टिकमधून बनवलेल्या वस्तू अजूनही बाजारात येतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो.

अमेरिकेतील संशोधन

अमेरिकेतील बाजारात विकल्या जाणाऱ्या तब्बल 203 काळया प्लास्टिकच्या वस्तूंचं परीक्षण करण्यात आलं. यामध्ये किचनमधील भांडी, जेवणाचे डब्बे, खेळणी अशा अनेक वस्तूंचा समावेश होता. संशोधनात असं आढळून आलं की, या वस्तूंमध्ये ‘डेकाब्रोमोडिफेनिल ईथर’ (BDE-209) नावाचं रसायन आढळलं. हे रसायन आरोग्यासाठी हानिकारक असून अमेरिकेत यावर दहा वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.

संशोधकांनी असंही सांगितलं की काही स्वयंपाकाच्या भांड्यांमधून दररोज 34,700 ng BDE-209 या रसायनाचा शरीरात प्रवेश होऊ शकतो, जे धोकादायक आहे. हे प्रमाण अमेरिकेच्या आरोग्य संस्थेने (EPA) ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेच्या जवळपास आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. पण नंतर असं समजलं की शास्त्रज्ञांनी गणना करताना चूक केली होती. त्यामुळे, खरं प्रमाण खूपच कमी निघालं. संशोधकांनी 10 पट जास्त मोजणी केली होती. त्यामुळे खरं प्रमाण EPA ने सांगितलेल्या सुरक्षित मर्यादेच्या फक्त दहाव्या भागाइतकंच होतं.

काळं प्लास्टिक वापरायला सुरक्षित आहे का?

काळया प्लास्टिकच्या वस्तू वापरणं सुरक्षित आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण, वैज्ञानिकांच्या मते, जरी या वस्तूंमधील ‘BDE-209’ नावाच्या रसायनाचं प्रमाण EPA च्या ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असलं, तरी या रसायनाचं खरं ‘सुरक्षित प्रमाण’ किती आहे, हे कोणालाच माहीत नाही. हे जुने आकडे असू शकतात, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा का, असा प्रश्न  संशोधकांनाही पडला आहे.

पर्यावरण तज्ज्ञ ॲडम हेरियट यांच्या मते, आपल्याकडे असलेली वस्तू जोपर्यंत वापरण्याजोगी आहे, तोपर्यंत ती वापरा. ती खराब झाल्यावरच नवीन वस्तू घ्या. सगळं काळं प्लास्टिक एकदम बदलण्याची गरज नाही.

त्यामुळे लगेचच सर्व काळं प्लास्टिक फेकून देणं हा सुद्धा एक उपाय नाही. विशेषतः ज्या वस्तू रिसायकल करता येत नाहीत, त्या फेकून देणं पर्यावरणासाठी आणखी हानीकारक असू शकतं.

काळया प्लास्टिकच्या वस्तू वापरताना काळजी घेणे देखील गरजेचं आहे. जरी काही वस्तूंमधील रसायनांचं प्रमाण सुरक्षित मर्यादेत असलं, तरी हानीकारक रसायनं आपल्या शरीरात जाणं कितपत सुरक्षित आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे, काळया प्लास्टिकचा वापर कमी करणं, आणि त्याच्या ऐवजी इतर सुरक्षित पर्याय वापरणं जास्त चांगलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

भारत आणि ब्रिटनने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 112 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) म्हणजेच मुक्त
Climate change: आता हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीसाठी एक देश दुसऱ्या देशावर खटला दाखल करू शकतो. यात अनेक वर्षांपासून वातावरणात मोठ्या
Gallery app : आपल्या फोनमधील 'गॅलरी' ॲप बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ॲप डेव्हलपर्स तुमच्या फोन गॅलरीतून

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ