सुवासिक मेणबत्तीमुळेही हवा प्रदूषण!

scented candles : अनेकांच्या घरात अगरबत्तीऐवजी सुवासिक मेणबत्त्यांचा वापर केला जातो. या मेणबत्त्या दिसायला अतिशय मनमोहक असतात. पण तितक्याच त्या घातक सुद्धा असतात. या मेणबत्त्यांमधून निघणारा धूर हा डिझेल इंजिनमधून निघणाऱ्या धूरापेक्षाही जास्त घातक असतो,असं अभ्यासातून समोर आलं आहे.
[gspeech type=button]

घरात प्रसन्न वातावरण राहावं आणि चांगला सुवास असावा, यासाठी अनेकांच्या घरात अगरबत्तीऐवजी सुवासिक मेणबत्त्यांचा वापर केला जातो. या मेणबत्त्या दिसायला अतिशय मनमोहक असतात. पण तितक्याच त्या घातक सुद्धा असतात. या मेणबत्त्यांमधून निघणारा धूर हा डिझेल इंजिनमधून निघणाऱ्या धूरापेक्षाही जास्त घातक असतो,असं अभ्यासातून समोर आलं आहे.

अमेरिका आणि जर्मनीमध्ये संशोधन

अमेरिका आणि जर्मनी इथल्या विद्यापीठामध्ये या सुवासिक मेणबत्त्यांच्या वापरावर व त्यानंतर होणाऱ्या परिणामावर अभ्यास केला. या अभ्यासातून असं समोर आलं की, जेव्हा या मेणबत्त्या पेटवल्या जातात तेव्हा त्यातील सुवासिक घटक म्हणजेच टर्पेन्स बाहेर पडतात. त्यांचा हवेतल्या ओझोन घटकाशी संपर्क येतो. या क्रियेतून एक विषारी वायू तयार होतो. हा वायू श्वसनाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाऊन आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतो.

सुवासिक मेणबत्त्या पेटवल्यावर नेमकं काय घडतं?

अशा पद्धतीचा धूर सतत शरीरात गेल्याने श्वासनलिकेवर परिणावर होतो. यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण या सुवासिक मेणबत्त्यांमधून बाहेर पडणारा वायू हा गॅस स्टोव्ह, डिझेल इंजिन आणि नैसर्गिक वायूमधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायू इतकाच विषारी असतो.

सुवासिक मेणबत्त्यांमध्ये कोणते विषारी घटक असतात?

अनेक सुवासिक मेणबत्त्यांमध्ये पॅराफिन हा घटक वापरला जातो. हा घटक सुवासासाठी असतो. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा पॅराफिनचा वापर केला जातो. हे एक पेट्रोलियम बेस्ड वॅक्स असतं. या पॅराफिनचा जेव्हा अतिवापर होतो तेव्हा आरोग्याच्या प्रश्न निर्माण होतात. काही जणांना या पॅराफिनची ॲलर्जी आहे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, डोकेदुखी सह डोळ्यातून आणि नाकातून पाणी येतं.

पॅराफिनसह या मेणबत्त्यांमध्ये बेंझिडाइन हे एक केमिकल वापरलं जातं. बेंझिडाइनच्या वापराने कृत्रिम रंग तयार होतो. कॅन्सरजन्य घटक म्हणून हे केमिकल ओळखलं जातं. या केमिकलच्या संपर्कात आल्याने ब्लॅडर कॅन्सर होण्याची शक्यता असते. या कारणांमुळे अमेरिकेमध्ये या केमिकलच्या वापरावर बंदी घातली आहे. असं हे धोकादायक केमिकल दररोज या सुवासिक मेणबत्त्यांच्या मार्फेत शरिरात जाऊन आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

या घटकांना पर्याय काय?

सुवासिक मेणबत्त्या बनवण्यासाठी हे दोन घटक अत्यावश्यक नाहीत. सोया किंवा बीझ वॅक्सचा वापर या मेणबत्त्या तयार करण्यासाठी करता येऊ शकतो. कारण या वॅक्समध्ये कृत्रिम रंगाचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे बेंझिडाइन केमिकलचा वापर टाळता येतो. त्याचप्रमाणे पॅराफिनची ॲलर्जी असेल, श्वसनासंंबंधित अस्थमासारखे आजार असतील तर वनस्पती सुगंधी तेलाचा वापर करता येऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

postpartum health recovery - वैज्ञानिक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, मूलाला जन्म देणाऱ्या ‘आईची रिकव्हरी’ म्हणजे पूर्ण बरी होण्यासाठी
आपण आनंदी असलो की आपल्याला उत्साह येतो आणि दुःखी असलो की सगळी एनर्जी गेल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट जी फक्त
Rent people: माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कितीही एकटं राहायचं म्हटलं तरी सोबत असली की जरा हायसं वाटतं. मग ती

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ