जगभरातील वसंत ऋतूतील सण

Spring Festivals : वसंत ऋतू म्हणजे निसर्गाला आलेली नवचैतन्याची पालवी. हा ऋतू केवळ भारतातच नाही, तर जगभरात विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला तर मग, जाणून घेऊया जगभरातील काही खास वसंत ऋतूतील सण.
[gspeech type=button]

वसंत ऋतू म्हणजे निसर्गाला आलेली नवचैतन्याची पालवी. हा ऋतू केवळ भारतातच नाही, तर जगभरात विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला तर मग, जाणून घेऊया जगभरातील काही खास वसंत ऋतूतील सण.

भारत – होळी

भारत – होळी उत्सव

भारतात होळी हा रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या सणाने वसंत ऋतूची सुरुवात होते. होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केलं जातं. होळी दहन हे वाईटाच्या विनाशाचे प्रतीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग खेळून आनंदोत्सव साजरा केला जातो.

थायलंड – साँगक्रन

थायलंड – साँगक्रन उत्सव

थायलंडमध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यात साँगक्रन नावाचा खास सण साजरा केला जातो. हा सण म्हणजे थायलंडचे नवीन वर्ष. 13 ते 15 एप्रिल दरम्यान हा सण साजरा करतात . या काळात वसंत ऋतू संपून उन्हाळा सुरू होतो. या दिवशी लोकं एकमेकांवर पाणी टाकून मागील वर्षातील वाईट गोष्टी धुवून काढतात. आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. हा सण लाओस, कंबोडिया आणि म्यानमारमध्येही साजरा केला जातो.

हे ही वाचा : धुलीवंदनादिनी नाशिकची वीर दाजीबा बाशिंग परंपरा

बोस्निया – Cimburijada ( सिमबुरीजादा ) ‘ स्क्रॅम्बल्ड एग्ज फेस्टिव्हल ‘

बोस्निया – सिमबुरीजादा उत्सव

बोस्निया-हर्जेगोव्हिनियन शहर झेनिकामध्ये सिमबुरीजादा हा उत्सव 100 वर्षांहून अधिक काळापासून साजरा केला जात आहे. हा उत्सव वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा करतात. वसंत ऋतूचे आगमन झेनिकन लोक खास पद्धतीने करतात. पहाटेच्या वेळी, लोक बोस्ना नदीवर जमतात आणि मित्र परिवार, कुटुंब आणि पाहुण्यांसोबत स्क्रॅम्बल्ड अंड्यांपासून बनवलेल्या नाश्त्याचा आनंद घेतात.

बल्गेरिया – बाबा मार्टा

बल्गेरिया – बाबा मार्टा उत्सव

बल्गेरियामध्ये 1 मार्च रोजी ‘बाबा मार्टा’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी बल्गेरियन लोक एकमेकांना मार्टेनित्सा ( Martenitsa ) नावाचे छोटे दागिने देतात. हे दागिने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या धाग्यांपासून बनवलेले असतात. हे दागिने वसंत ऋतू, गरम हवामान आणि चांगले आरोग्य यांचे प्रतीक मानले जातात.

हे ही वाचा : वाराणसीतली होळी

पोलंड – मार्झाना

पोलंड – मार्झाना उत्सव

पोलंडमध्ये वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी मार्झाना नावाचा एक  सण साजरा केला जातो. या दिवशी मार्झानाचा पुतळा ( पेंढ्यापासून बनवलेली बाहुली ) जाळला जातो आणि नदीत बुडवला जातो. मार्झाना किंवा मोराना ही स्लाव्हिक देवी होती. जी मृत्यू आणि हिवाळ्याचे प्रतीक मानली जाते. हा विधी हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक आणि नवीन ऋतूचे स्वागत करण्यासाठी केला जातो. ही प्रथा आपल्याकडील होळीसारखीच आहे.

जपान – हानामी

जपान – हानामी उत्सव

जपानमध्ये ‘हानामी’ नावाचा सुंदर सण साजरा साजरा केला जातो. या दिवशी लोक चेरीच्या फुलांच्या (सकुरा) सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी बागेत एकत्र येतात. झाडांखाली बसून गप्पा मारतात आणि सहभोजन करतात. चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल (सकुरा उत्सव) अमेरिका, दक्षिण कोरिया आणि चेरीची फुले असलेल्या इतर देशांमध्येही साजरा केला जातो.

हे ही वाचा : आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या होळी उत्सव

स्वित्झर्लंड – Sechseläuten

स्वित्झर्लंड – सेचसेलाउटेन ( Sechseläuten ) उत्सव

सेचसेलाउटेन ( Sechseläuten ) हा स्वित्झर्लंडमधील झुरिच इथं साजरा केला जाणारा हा एक पारंपारिक वसंत ऋतू उत्सव आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हा सण साजरा केला जातो. या दिवशी ‘बोओग’ नावाचा स्नोमॅन पुतळा संध्याकाळी 6 वाजता जाळला जातो. यावरून उन्हाळा कसा असेल, याचा अंदाज लावला जातो. सेचसेलाउटेन हा हिवाळ्याच्या समाप्तीचे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे.

स्पेन – लास फॅलास

                           स्पेन – लास फॅलास उत्सव

लास फॅलास हा युरोपमधील सर्वात अनोख्या उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी मार्च महिन्यात स्पेनमधील व्हॅलेन्सिया इथे हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात कला, परंपरा आणि खूप मोठे प्रदर्शन असतं. आकाराने खूप मोठे कलात्मक आणि सुंदर कागदाचे पुतळे (papier-mâché) बनवले जातात. आणि रस्त्यावर त्यांची मिरवणूक काढली जाते. तसंच फटाके, गाणी आणि पारंपरिक व्हॅलेन्शियन कपडे घालून लोक या मिरवणुकीत सहभागी होतात. मग शेवटी, एक मोठा कार्यक्रम होतो. 19 मार्चला या मूर्ती जाळून जुन्या गोष्टी नष्ट करून नवीन सुरुवात करण्याचे प्रतीक मानलं जातं.

वसंत ऋतू हा नवीन सुरुवात, निसर्गाचे सौंदर्य आणि आनंदाचा काळ आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा ऋतू साजरा केला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण
Vaccine on Cocaine : अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ