भारतातील सर्वात मोठं आणि हाय-टेक गोट फार्म!

goat farm : जवळपास पावणेसहा एकर जागेत हे गोट फार्म पसरलं आहे. सध्या या फार्ममध्ये अस्सल भारतीय जातीचे 5 हजार बोकड आणि बकऱ्या आहेत. पुढील 5 वर्षात ही संख्या 25 हजारांवर जाईल.
[gspeech type=button]

गोट फार्म म्हणजेच शेळी पालन या व्यवसायाला सध्या चांगले दिवस आले आहेत. शेतकऱ्यांकरता जोडधंदा किंवा युवावर्गाकरता मुख्य व्यवसाय रोजगाराचं हे चांगलं मॉडेल पाहिलं जात आहे. दूध, मांस आणि शेतीसाठी खत या तिन्ही गोष्टी यातून मिळतात. आग्रा इथं युवान एग्रो फार्मनं विशेषतः भारतीय जातीचे बोकड आणि बकऱ्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भारतातल्या या सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक गोट फार्मचं नुकतंच केंद्रीय पशुपालन मंत्री डॉ एस पी सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

 

10 हजाराहून अधिक लोकांना रोजगार

युवान एग्रो फार्मचे संचालक डी के सिंह यांनी सांगितलं की, या प्रकल्पाद्वारे सध्या दोनशे शेतकऱ्यांना जोडून घेण्यात आलं आहे. पुढील 2 वर्षात प्रशिक्षण कार्यक्रम, कन्सलन्टसी, वैद्यकीय सुविधा या माध्यमातून या प्रकल्पात 10 हजाराहून अधिक लोकांना रोजगार देण्याचा उद्देश आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना कमी वेळात जास्तीत जास्त नफा मिळवता येईल. क्रॉस ब्रीडच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची नवीन जात विकसित करण्यावरही भर आहे. बोकड आणि बकऱ्यांवर संशोधनही इथं केलं जाणार आहे. शाश्वत शेतीच्या माध्यमातून उत्पादनं आणि रोजगारावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

बकरीच्या दुग्ध उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय ब्राण्ड

युवान हाय टेक फार्ममध्ये सोजात, कोटा, अल्पाईन, सानेन, बीटल, ब्लॅक बंगाल, अफ्रिकन बोअर गोट या जातीतील बोकड-बकऱ्या आहेत. या सर्व बोकड-बकऱ्यांची उत्तम काळजी घेतली जाते. ग्राहकांना बोकड-बकऱ्यांपासूनची दर्जेदार उत्पादनं देण्याकरता इथं संशोधन केलं जातं. बोकडाचं मांस, दूध, दही, तूप, चीज आणि विष्ठा या सर्वच गोष्टींवर इथं लक्ष देण्यात येत आहे. बकरीचं दूध हे फार आरोग्यदायी मानलं जातं. 2026 पर्यंत साधारण बकरीच्या 3 लाख 60 हजार लिटर दूधाचं उद्दीष्ट युवानने ठेवलं आहे. या दूग्ध उत्पादनांची निर्मिती करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये ते वितरीत करण्यात येणार आहे. देशी बोकड-बकऱ्यांचे ब्रीडिंग करून ते स्थानिक गरजू शेतकऱ्यांनाही दिलं जाईल. त्यांचं पालन करून बाजाराच्या गरजेनुसार शेतकऱ्यांना ते विकता येतील.

उत्तम सुविधा आणि रुग्णालय

जवळपास पावणेसहा एकर जागेत हे गोट फार्म पसरलं आहे. सध्या या फार्ममध्ये अस्सल भारतीय जातीचे 5 हजार बोकड आणि बकऱ्या आहेत. पुढील 5 वर्षात ही संख्या 25 हजारांवर जाईल. या बोकड आणि बकऱ्यांकरता 80 हजार स्क्वेअर फिटचे उंचावर बांधलेले 5 निवारा शेड आहेत. निवारा शेडच्या आसपास बोकड-बकऱ्यांकरता दीड एकर जागा बोकड-बकऱ्यांना मोकळं फिरण्यासाठी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फार्ममध्ये रुग्णालय आहे.

ज्या व्यक्तिंना इथं येऊन बोकड-बकरी खरेदी करायचे आहेत, त्यांच्याकरता 2-3 दिवस राहण्याची व्यवस्थाही फार्ममध्येच आहे. या ग्राहकांना नंतरही प्राण्यांच्या देखभालीसाठी मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय गोट असोसिएशनची मान्यता मिळवणारे युवान एग्रो हे भारतातील एकमेव गोट फार्म आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ