मनुष्यवस्ती नसलेल्या बेटावर अमेरिकेने लादले 10 टक्के टेरिफ!

Tariff on Heard and Macdonald Island : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुक्ती दिना निमित्त जगभरातील सर्वच छोट्या - मोठ्या देशांवर व्यापारासंबंधित टेरिफ जाहीर केले. उत्पादन क्षमता वाढवणे या उद्देशासह, आतापर्यंत जगातल्या सर्व मित्र आणि शत्रू राष्ट्रांनी अमेरिकेला लूटलं आहे असं वक्तव्य करत डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ जाहीर केले.
[gspeech type=button]

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुक्ती दिना निमित्त जगभरातील सर्वच छोट्या – मोठ्या देशांवर व्यापारासंबंधित टेरिफ जाहीर केले. उत्पादन क्षमता वाढवणे या उद्देशासह, आतापर्यंत जगातल्या सर्व मित्र आणि शत्रू राष्ट्रांनी अमेरिकेला लूटलं आहे असं वक्तव्य करत डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ जाहीर केले.

हे टेरिफ जाहीर करताना ट्रम्प यांनी सर्व देशांची नावं असलेला आणि त्या-त्या देशाला किती टक्के टेरिफ लादला जाणार आहे याचा मोठा फलक दाखवला. या फलकाच्या दुसऱ्या भागात खालून दुसऱ्या ओळीत हर्ड आणि मॅकडोनल्ड आयलंडवर 10 टक्के टेरिफ आकारणार असल्याचं नमूद केलं आहे. 

जगातल्या ज्या आयलंडवर एकही मनुष्य राहत नाही अशा आयलंडवरही टेरिफ लादल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊसची खिल्ली उडवली जात आहे. 

हर्ड आणि मॅकडोनल्ड आयलंड कुठे आहे?

हर्ड आणि मॅकडोनल्ड आयलंड हे  दक्षिण महासागरात, अंटार्क्टिकापासून सुमारे 1,700 किलोमीटर आणि पर्थपासून 4,100 किलोमीटर नैऋत्ये दिशेला  आहे.

यापैकी हर्ड बेटावर बिग बेन हा सक्रिय ज्वालामुखी आहे. हे बेट समुद्रसपाटीपासून 2,745 मीटर उंचीवर आहे.  तर, मॅकडोनाल्ड बेट खूपच लहान आहे. युनेस्कोच्या माहितीनुसार खडकांनी व्यापलेलं हे बेट 100 हेक्टर जागेवर पसरलेलं आहे.  हर्ड आयलंडवरची ज्वालामुखी ही सक्रिय असल्यामुळे ज्वालामुखीच्या या भौगोलिक क्षेत्रामुळे भूगर्भामधील हालचाली आणि हिमनदीची बदलती गती जवळून पाहायला मिळते.  

भौगोलिकदृष्ट्या ऑस्ट्रेलिया देशाच्या बाह्यप्रदेशामध्ये हे आयलंड आहेत. जगातले निर्मनुष्य असलेले आयलंड अशी या आयलंडची विशेष ओळख आहे. ऑस्ट्रेलियातूल पर्थवरुन या आयलंडवर जाण्यासाठी दोन आठवड्याचा बोटीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे या भौगोलिक क्षेत्रात माणसांचा वावर नाही.

हे ही वाचा : अमेरिकेचा नवा आयात कर ; भारतावर 26% कर लागू

निर्जन आयलंड

या आयलंडची भौगोलिक स्थिती पाहता येथे एकही मनुष्य राहत नाही. ते आयलंड पूर्णत: निर्जन आहे. 

मनुष्यवस्ती नसली तरी हे आयलंड जलचर प्राण्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असं आयलंड आहे. सागरी पक्षी आणि सस्तन प्राण्यांसाठी हे आयलंड एक महत्त्वपूर्ण अधिवास आहे. सील, पेट्रेल्स, अल्बाट्रॉस आणि पेंग्विन हे प्रजनन क्रियेसाठी या आयलंडचा उपयोग करतात.  

या आयलंडवर कोणीच नसलं तरी इथे जायला ऑस्ट्रेलिया सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. ऑस्ट्रेलिया अंटार्टिक प्रोग्राम कमिटीच्या माहितीनुसार हेलिकॉप्टर, इनफ्लॅटेबल रबर बोट्स आणि मोठ्या जहाजांच्या मदतीने ॲम्फिबियस बोटीने या आयलंडवर जाता येते. 

1855 साली हर्ड आयलंडवर जहाजाच्या माध्यमातून पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 240 वेळा या आयलंडला कोणी ना कोणी भेटी दिल्या आहेत. तर मॅकडोनाल्ड आयलंडवर 1971 साली आणि 1980 साली अशा दोनच वेळी भेटी दिल्या आहेत. 

या निर्मनुष्य आयलंडवर टेरिफ कसे लादले?

अमेरिकेने ऑस्ट्रेलिया या देशासह उपअंटार्क्टिक हिंद महासागरातील ऑस्ट्रेलियन प्रदेशांतर्गत येणाऱ्या भौगोलिक क्षेत्रावर त्याच्या सर्व निर्यातीवर 10 टक्के टेरिफ लावला आहे. ही दोन वस्ती नसलेली आयलंडसुद्धा या भौगोलिक क्षेत्रात येत असल्याने व्हाईट हाऊसने त्यांचा सुद्धा उल्लेख केला आहे.  

व्हाईट हाऊसच्या कारभाराची खिल्ली

हर्ड आणि मॅकडोनल्ड या दोन आयलंडवर टेरिफ जाहीर केल्यानंतर जगभरातून व्हाईट हाऊसच्या कारभाराची खिल्ली उडवली जात आहे. न्यू जर्सी इथले माजी सांसद टॉम मालिन्वोस्की यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, “हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्ड आयलंडवरचे पेंग्विन खूप दिवसांपासून आमचा (अमेरिकेचा) गैरफायदा घेत आहेत – आता त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याची वेळ आली आहे!”

अमेरिकेचे इम्मीग्रेशन कौन्सिलचे वरिष्ठ अधिकारी ॲरोन रीचलिन – मेलनिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,  “असे वाटते की व्हाईट हाऊसच्या एका इंटर्नने विकिपीडियावरुन सगळ्या देशांची यादी घेतली आणि त्याचा काहिही अभ्यास वा माहिती न घेता टेरिफची यादी तयार केली.”

 

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर व्हाईट हाऊसमधून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारचे काय मत आहे?

दरम्यान, अमेरिकेच्या या टेरिफ वर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थोनी अल्बानिज यांनी निषेध व्यक्त केलं आहे. तरी,  या विरोधात अमेरिकेला कोणतंही प्रत्युत्तर देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं आहे की, पृथ्वीचा कोणताच भौगोलिक प्रदेश आता सुरक्षित राहिलेला नाही आहे. कारण अमेरिकेने ऑस्ट्रेलियापासून 1,400 किलीमीटर अंतरावर असलेल्या नॉरफोर्क आयलंडवर 29 टक्के टेरिफ लादला आहे. या आयलंडची लोकसंख्या ही जवळपास 2 हजार आहे. इतकी कमी अर्थव्यवस्था असलेलं आयलंड हे अमेरिकासारख्या अर्थव्यवस्थेचे व्यापारी स्पर्धक असू शकतात याविषयी त्यांनी शंका व्यक्त केली आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Gallery app : आपल्या फोनमधील 'गॅलरी' ॲप बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ॲप डेव्हलपर्स तुमच्या फोन गॅलरीतून
Aura Farming Dance : आजकाल सोशल मीडियावर तुम्ही 'ऑरा' हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. खासकरून जेव्हा ॲनिमे कॅरेक्टर्स किंवा
Chess Banned In Afghanistan : ‘बुद्धिबळ हा जुगाराचा खेळ आहे’ असं स्पष्टीकरण अफगाणिस्तानमध्ये या खेळावर अधिकृतरित्या बंदी घातली आहे. तालिबानी