इंटरमिटंट फास्टिंग: प्राचीन पद्धती ते आधुनिक ट्रेंड

Intermittent fasting : आपल्या पूर्वजांनी उपवास हा फक्त धार्मिक कारणांसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही केला. आजच्या आधुनिक काळात यालाच ‘इंटरमिटंट फास्टिंग’ असे नाव देण्यात आले आहे. ही पद्धती सध्या जगभर चर्चेत आहे आणि अनेक लोक तिचा अवलंब करत आहेत. समजून घेऊयात ‘इंटरमिटंट फास्टिंग’ म्हणजे नेमकं काय?  तो कसा करावा आणि त्याचे फायदे काय आहेत.
[gspeech type=button]

उपवास हा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासूनच एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. आपल्या पूर्वजांनी उपवास हा फक्त धार्मिक कारणांसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही केला. आजच्या आधुनिक काळात यालाच ‘इंटरमिटंट फास्टिंग’ असे नाव देण्यात आले आहे. ही पद्धती सध्या जगभर चर्चेत आहे आणि अनेक लोक तिचा अवलंब करत आहेत.

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे एक आहार पद्धती, ज्यामध्ये ठराविक कालावधीत ठराविक अंतरानं अन्न सेवन केले जाते आणि उर्वरित वेळ उपवास केला जातो. यामध्ये कोणतेही विशिष्ट पदार्थ खाण्याची बंधने नसतात, फक्त ‘कधी खावे आणि कधी खाऊ नये’ यावर भर दिला जातो.

प्राचीन काळातील उपवास पद्धती आणि आधुनिक इंटरमिटंट फास्टिंग

भारतीय संस्कृतीत उपवास करण्याची पद्धत हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. अनेक धार्मिक परंपरांमध्ये उपवासाचा उल्लेख आहे.

प्राचीन उपवास पद्धती:

1.एकादशी, संकष्ट चतुर्थी, प्रदोष अशा विशेष दिवशी उपवास

2.चातुर्मासात साधे आणि सात्त्विक अन्न सेवन

3.ऋषी-मुनींची तपश्चर्या आणि उपवास

आधुनिक इंटरमिटंट फास्टिंगचे प्रकार:

1.16/8 पद्धत: 16 तास उपवास आणि उरलेल्या 8 तासांमध्ये ठराविक अंतराने खाणे

2.5:2 डाएट: आठवड्यात 5 दिवस सामान्य आहार आणि 2 दिवस कमी कॅलरी सेवन

3.OMAD (One Meal A Day): दिवसातून फक्त एक मोठे जेवण

4.अल्टरनेट डे फास्टिंग: एक दिवस उपवास, दुसरा दिवस नियमित आहार

हे ही वाचा : सायलेंट किलर्स

कोणासाठी फायदेशीर आहे?

  • वजन कमी करायचे असेल
  • मधुमेह किंवा इन्सुलिन रेजिस्टंट असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे
  • पचनसंस्थेचे विकार असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे
  • जास्त चरबी कमी करण्यासाठी उपयोग होईल
  • आपला मेंदू पचनाची जबाबदारीही पार पाडतो. सतत खाल्ल्यानं मेंदूवरचा ताण वाढतो आणि त्याच्या कामांवर परिणाम होतो. ठराविक वेळी आणि ठराविक अंतरानं खाल्ल्यावर मेंदूला इतर कामं करण्यासाठी सवड  आणि ऊर्जा मिळते

इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे

1.वजन नियंत्रण आणि चरबी कमी होणे

उपवास करताना शरीरातील इन्सुलिन पातळी कमी होते, त्यामुळे शरीर साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरते.

2.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे

इंटरमिटंट फास्टिंगमुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

3.शरीरातील दुरुस्ती प्रक्रियेला गती मिळते (Autophagy)

उपवासामुळे जुन्या आणि खराब झालेल्या पेशींची सफाई होते, ज्यामुळे शरीर अधिक निरोगी राहते.

4.मेंदूचे आरोग्य सुधारते

उपवास केल्याने BDNF (Brain-Derived Neurotrophic Factor) नावाचे प्रथिन तयार होते, जे मेंदूच्या आरोग्यास मदत करते आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

5.हृदयाचे आरोग्य सुधारते

उपवासामुळे कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर आणि इन्फ्लमेशन कमी होते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

6.दीर्घायुष्य मिळते

संशोधनानुसार, उपवासामुळे शरीराच्या पेशींचे वृद्धत्व मंदावते आणि आयुष्य वाढण्यास मदत होते.

हे ही वाचा : कार्डिएक अरेस्ट ! 

इंटरमिटंट फास्टिंग कसे करावे?

1.सुरुवातीला 12/12 पद्धतीने सुरुवात करावी, म्हणजे 12 तास उपवास आणि उरलेल्या 12 तासात ठराविक वेळी खाणे.

2.त्यानंतर हळूहळू 16/8 पद्धतीकडे जावे, ज्यामध्ये 16 तास उपवास आणि उरलेल्या 8 तासात ठराविक वेळी खाणे.

3.उपवासादरम्यान पाणी, हर्बल टी, ब्लॅक कॉफी किंवा लिंबू पाणी घेऊ शकता.

4.उपवास संपल्यानंतर संतुलित आणि पोषणयुक्त आहार घ्यावा.

कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

  • उपवासानंतर लगेच जास्त प्रमाणात अन्न खाणे टाळावे
  • प्रक्रिया केलेले (processed) आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाऊ नयेत
  • उपवासादरम्यान गोडसर पेय किंवा कोल्डड्रिंक्स पिऊ नयेत
  • झोपेची कमतरता असल्यास उपवास सुरू करू नये

महत्त्वाच्या टिप्स

  • उपवासादरम्यान शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे
  • सुरुवातीला थोड्या काळासाठी उपवास करून हळूहळू वाढवावा
  • काही आजार असतील किंवा औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • उपवासानंतर प्रथिनेयुक्त आणि नैसर्गिक पदार्थ खा

इंटरमिटंट फास्टिंग ही केवळ ‘आधुनिक ट्रेंड’ नसून प्राचीन भारतीय जीवनशैलीतील उपवासाचीच एक सुधारित आवृत्ती आहे. याचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते, त्यामुळे कोणतीही पद्धत सुरू करण्याआधी शरीराची क्षमता आणि गरज यांचा विचार करावा. तसेच कोणत्याही पद्धतीचे उपवास किंवा डाएट प्लान सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधावा.

3 Comments

  • Meena Dumbre

    Very nice information ☺️ I m also trying 12/12 formula

  • Madhavi Manohar

    या आहार पद्धती नुसार वागण्याचा प्रयत्न आहे

  • MRS. MEDHA B. PATHAK

    Very useful information. I would like to follow intermittent fasting. I always follow your instructions which make me feel better and enthusiastic. Thank you.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 Responses

  1. Very useful information. I would like to follow intermittent fasting. I always follow your instructions which make me feel better and enthusiastic. Thank you.

  2. या आहार पद्धती नुसार वागण्याचा प्रयत्न आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही
हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून
कबड्डी हा एक केवळ खेळ नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे. शरीरसामर्थ्य, श्वसन नियंत्रण, आणि रणनीती यांचे मिलाफ असलेला हा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ