ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम; अमेरिकेसह आशियाई बाजारातही तेजी

Tarrif: डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की चीन वगळता 75 देशांवरील वाढीव आयात शुल्क 90 दिवसांसाठी थांबवण्यात येणार आहे. मात्र चीनवर याचा उलट परिणाम झाला असून त्यांच्यावरील शुल्क 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
[gspeech type=button]

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात-निर्यात शुल्कासंदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. विशेषतः अमेरिकेतील S&P 500 व नॅसडॅक निर्देशांकांनी विक्रमी उसळी घेतली असून, आशियाई बाजारातही याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

ट्रम्प यांचा मोठा निर्णय – 75 देशांना टॅरिफमध्ये सवलत

बुधवारी, 9 एप्रिल 2025 रोजी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की चीन वगळता 75 देशांवरील वाढीव आयात शुल्क 90 दिवसांसाठी थांबवण्यात येणार आहे. मात्र चीनवर याचा उलट परिणाम झाला असून त्यांच्यावरील शुल्क 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आणि यामुळे शेअर बाजारात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे बाजारात अस्थिरता होती. गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. पण आता या निर्णयामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

S&P 500 आणि नॅसडॅकने गाठली विक्रमी उंची

ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशी S&P 500 निर्देशांक तब्बल 9.5 टक्क्यांनी वाढून बंद झाला. ही 2008 नंतरची सर्वात मोठी एकदिवसीय वाढ आहे. त्याचप्रमाणे नॅसडॅक निर्देशांकाने 12.2 टक्क्यांची उसळी घेतली. हे 2001 नंतरचं सर्वोच्च एकदिवसीय प्रदर्शन मानलं जात आहे.

डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजमध्येही मोठी उसळी

डाऊ जोन्स निर्देशांकही 2,962.86 अंकांनी म्हणजेच 7.87 टक्क्यांनी वाढून 40,608.45 वर बंद झाला. ही मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी एकदिवसीय वाढ आहे. डाऊ जोन्स प्रथमच 3000 अंकांनी उसळल्याने ही घटना ऐतिहासिक ठरली.

हेही वाचा: अमेरिकेचा नवा आयात कर ; भारतावर 26% कर लागू

शेअर बाजारातल्या वाढीचा आशियाई बाजारांवरही प्रभाव

ट्रम्प यांच्या या निर्णयाचा प्रभाव केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहिला नाही. आशिया-पॅसिफिकमधील बाजारांनीही याचे स्वागत करत तेजी नोंदवली. जपानचा निक्केई निर्देशांक 8.24 टक्क्यांनी, तर टॉपिक्स निर्देशांक 7.33 टक्क्यांनी वाढला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 4.8 टक्क्यांनी आणि लहान कंपन्यांचा कोस्डॅक 4.2 टक्क्यांनी वाढला.

ऑस्ट्रेलियातील बाजारातही चांगली तेजी नोंदवली गेली. परंतु गुंतवणूकदारांचे लक्ष चीनच्या शेअर बाजारावर अधिक आहे. कारण, अमेरिकेने चीनवर लावलेले 125 टक्के शुल्क आणि याला प्रत्युत्तर म्हणून चीनने जाहीर केलेल्या 84 टक्के शुल्कामुळे या दोन्ही देशांतील व्यापार तणाव वाढण्याची शक्यता आहे.

बाजारातील गुंतवणूकदारांचे मत

बोल्विन वेल्थ मॅनेजमेंट ग्रुपच्या अध्यक्षा जीना बोल्विन यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “हा तो क्षण आहे ज्याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. कंपन्यांच्या कमाईचा हंगाम सुरू झाला आहे आणि अशा वेळी हा निर्णय बाजारासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, 90 दिवसांनंतर काय होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सतर्क राहावे लागेल.”

हेही वाचा: अमेरिका टेरिफचा भारतीय कापड उद्योग क्षेत्रावर काय परिणाम होणार?

लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीबाबत अजूनही साशंकता

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अल्पकालीन दिलासा मिळाल्याचे दिसते. पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून अजूनही गुंतवणूकदारांमध्ये शंका आहे. 90 दिवसांनंतर काय भूमिका असेल, चीनसोबतचा व्यापार किती गुंतागुंतीचा होईल आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर याचा काय परिणाम होईल. याचा परिणाम येणाऱ्या काळात शेअर बाजारावर होऊ शकतो.

ट्रम्प यांच्या घोषणेमुळे सध्या तरी अमेरिकेच्या आणि आशियाई शेअर बाजाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. पण, केवळ 90 दिवसांच्या या निर्णयामुळे बाजाराला दीर्घकालीन स्थिरता मिळेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाढलेली टॅरिफ आणि जागतिक राजकीय स्थिती यामुळे बाजार पुन्हा अस्थिर होऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ