विमान प्रवास होणार जास्त सुलभ; बोर्डिंग पास आणि चेक-इन सेवा बंद होणार ?

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
[gspeech type=button]

आता विमान प्रवासाचे नियम बदलणार आहेत. प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (International Civil Aviation Organisation – ICAO ) यासाठी पुढाकार घेतला आहे.

कोणते बदल होणार ?

आता तुमच्या चेहऱ्यावरून आणि डिजिटल ओळखपत्रावरून तुमची ओळख पटवली जाईल. त्यामुळे भविष्यात विमान प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्याची शक्यता आहे. प्रवाशांसाठी एक ‘डिजिटल प्रवासाचे ओळखपत्र’ तयार केले जाईल. जे त्यांच्या मोबाईलमध्ये असेल आणि त्यामध्ये पासपोर्टची माहिती सुरक्षित असेल. विमानतळ आणि विमान कंपन्या याच डिजिटल ओळखपत्राच्या आधारे आणि चेहऱ्यावरून प्रवाशांची ओळख पटवतील. त्यामुळे कागदपत्रे दाखवण्याची गरज राहणार नाही आणि विमानतळावर प्रवाशांची ये-जा करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलेल.

कसा असेल ‘जर्नी पास

हा ‘जर्नी पास’ तुमच्या मोबाईलमध्ये असेल. तुमच्या विमान प्रवासाची सगळी महत्त्वाची माहिती त्यात असेल. तुमच्या प्रवासाच्या योजनेत काही बदल झाला तर तो आपोआप या पासमध्ये दिसेल. त्यामुळे तुम्हाला विमानतळावर जाऊन रांगेत उभे राहून चेक-इन करायची गरज नाही. यामुळे विमान कंपन्यांना कोण विमानात चढत आहे कोण नाही हे बघायची गरज भासणार नाही. तुम्ही विमानतळाच्या प्रवेशद्वारावर तुमचा चेहरा दाखवला की लगेच विमान कंपन्यांना कळेल की तुम्ही प्रवासासाठी तयार आहात.

आताच्या काळात विमान कंपन्यांची सिस्टीम वेगळी आहे. पण हा ‘जर्नी पास’ आल्यावर सगळी माहिती एकाच ठिकाणी आणि लगेच उपलब्ध होईल. त्यामुळे काम लवकर आणि सोपे होईल.

सध्या काय होतं की तिकीट बुक केल्यावर आणि विमानप्रवासाच्या वेळी वेगळी प्रक्रिया करावी लागते. पण ‘जर्नी पास’मुळे हे सगळं एकदम सोपं आणि एकाच वेळी होईल. ‘जर्नी पास’ हे भविष्यातील विमान प्रवासाचं महत्त्वाचं फीचर असेल.

हे ही वाचा :तुम्हांला भारतीय पासपोर्टच्या पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगांचा अर्थ माहीत आहे का?

विमानतळांवर कसे बदल होतील

हा नवीन नियम चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी, जगभरातील विमानतळांना त्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठे बदल करावे लागतील. या नवीन सिस्टीमनुसार विमानतळांवर चेहऱ्यावरून ओळख पटवणारी मशीन (facial recognition technology) बसवावी लागेल. ही मशीन विमानतळाच्या मुख्य ठिकाणी जसे की प्रवेशद्वार, बॅग तपासणीची जागा आणि विमानात चढायच्या ठिकाणी असेल. त्यामुळे प्रवाशांना फक्त आपला चेहरा दाखवून ओळख पटवता येईल.

यासोबतच, विमानतळाच्या सिस्टीमला प्रवाशांच्या मोबाईलमधील पासपोर्टची माहिती वाचण्याची सोय करावी लागेल. तसेच, प्रवासाच्या माहितीमध्ये लगेच बदल करणे आणि ती माहिती सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करावी लागेल.हे सगळे बदल जगभरातील विमान कंपन्या आणि विमानतळांच्या सिस्टीममध्ये जुळणारे आणि एकसारखे असावे लागतील. हे काम थोडं कठीण आहे.

एका तज्ज्ञांनी सांगितले की अनेक विमान कंपन्यांची सिस्टीम 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्यामुळे सगळ्या सिस्टीममध्ये एकसारखे बदल करणे मोठे आव्हान आहे. यासाठी सरकार, तंत्रज्ञान कंपन्या, विमान कंपन्या आणि विमानतळ चालवणाऱ्या संस्था यांना एकत्र काम करावे लागेल, जेणेकरून सगळ्या नियम आणि पद्धती एकसारख्या होतील.

यामध्ये खास काय आहे?

‘डिजिटल प्रवासाचे ओळखपत्र’ आणि ‘जर्नी पास’ यांचा एक मोठा फायदा म्हणजे विमान प्रवासात काही अडचण आली, जसे की विमान सेवेत उशीर झाल्यास किंवा वेळेवर पोहोचता न आल्यास त्यावेळी ही सिस्टीम प्रवाशांना लवकर मदत करू शकते. यामुळे प्रवासातील गोंधळ कमी होईल. मदतीसाठी तुम्हाला लांब रांगेत उभे राहायची किंवा कस्टमर केअरच्या वेबसाईटवर शोध घ्यायची गरज पडणार नाही. सगळी माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच मिळेल.

हे ही वाचा : पासपोर्टमध्ये आता जोडीदाराचे नाव टाकण्यासाठी ‘Annexure J’ फॉर्म पुरेसा!

डेटा सुरक्षिततेचा प्रश्न

नवीन डिजिटल सिस्टीममुळे विमान प्रवास सोपा आणि जलद होणार असला, तरी लोकांच्या मनात त्यांच्या खासगी माहितीच्या सुरक्षिततेबद्दल काही प्रश्न आहेत.

या नवीन सिस्टीममध्ये लोकांचे चेहरे स्कॅन केले जातील. आणि त्यांची महत्त्वाची माहिती जमा केली जाईल. त्यामुळे ही माहिती किती सुरक्षित राहील, याबद्दल काही लोक आणि तज्ज्ञ शंका व्यक्त करत आहेत.

पण ही सिस्टीम बनवणारी ‘Amadeus’ नावाची कंपनी म्हणते की, त्यांनी लोकांची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्याची सोय सुरुवातीपासूनच केली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, प्रवाशांची माहिती तपासणी झाल्यावर फक्त 15 सेकंदात ती माहिती सिस्टीममधून काढून टाकली जाईल. असं केल्याने लोकांची ओळख पटवली जाईल आणि त्यांची खासगी माहिती जास्त वेळ साठवून ठेवण्याची किंवा तिचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल.

हा बदल प्रवाशांच्या कामात मोठा सुधारणा करणारा आहे. अनेक वर्षांपासून विमान प्रवासाच्या पद्धतीत फारसा बदल झाला नव्हता. त्यामुळे आता हे नवीन तंत्रज्ञान आणणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

भारत आणि ब्रिटनने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 112 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) म्हणजेच मुक्त
Climate change: आता हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीसाठी एक देश दुसऱ्या देशावर खटला दाखल करू शकतो. यात अनेक वर्षांपासून वातावरणात मोठ्या
Gallery app : आपल्या फोनमधील 'गॅलरी' ॲप बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ॲप डेव्हलपर्स तुमच्या फोन गॅलरीतून

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ