धर्मांतर आणि शिवरायांचे क्रांतिकारी पाऊल..!

छत्रपती शिवराय: इ. स. 640 नंतर तत्कालीन हिंदुस्थानवर मुस्लिम आक्रमणे सुरू झाली. धर्मविस्तार आणि इथल्या संपत्तीची लूट इतकाच उद्देश घेऊन आलेल्या यातील कित्येकांनी अनन्वित अत्याचार करत विविध भागात आपले बस्तान बसवले. या सगळ्यासमोर अजिबात मान न तुकवता “हिंदवी स्वराज्यासाठी लढा देण्याचा” धगधगता विचार प्रथम दिला तो छत्रपती शिवरायांनी...! इतकेच नव्हे तर जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याचे क्रांतिकारी पाऊल त्यांनी उचलले त्याचीच ही गोष्ट..!
[gspeech type=button]

इ. स. 640 नंतर तत्कालीन हिंदुस्थानवर जे मुस्लिम आक्रमक तुटून पडले त्यात महंमद बिन कासिम, गझनीचा महंमद, घोरी, तुघलक, तैमूर, खिलजी, बहामनी आणि मोगल असे कित्येक जण होते. या आक्रमकांनी हिंदुस्थानात विविध ठिकाणी क्रूर आक्रमणे केली. गांधार (म्हणजे आताचा पाकिस्तान-अफगाणिस्तानचा काही भाग), काश्मीर, राजस्थान, पंजाब या परिसरात हजारो लोकांनी चिवटपणे प्रतिकार केला. अनेकदा मुस्लिम आक्रमकांना माघारही घ्यावी लागली. कित्येकांना या राजांनी उदारपणे जीवदान दिले. मात्र कोणताही विधिनिषेध न बाळगणाऱ्या या क्रूर आक्रमकांनी पुनःपुन्हा आक्रमणे केली. सर्व प्रतिकार मोडून काढला. हिंदू राजांमध्ये असलेली आपापसातील भांडणे, इथल्या लोकांनी क्षणिक सुखासाठी केलेली फंदफितुरी यामुळे पाहता पाहता या मुस्लिम आक्रमकानी विविध ठिकाणी सत्ता स्थापन केली. त्यासाठी स्थानिक जनता घाबरून जाईल इतके प्रचंड अत्याचार केले. त्या अत्याचारांच्या कहाण्या इतक्या जीवघेण्या आहेत की ऐकल्यावर आपल्याला जेवण देखील नकोसे वाटावे..!

 

आक्रमकांची चाकरी आणि जुनाट विचार

घाबरलेले स्थानिक नागरिक अशा अनन्वित अत्याचारांना सामोरे जात राहिले. धर्मांतर हा त्यातील सर्वात प्रमुख भाग राहिला. धर्मांतर केले नाही तर हाल हाल करून मारणे, घरातील स्त्रियांवर बलात्कार, मंदिरे उद्ध्वस्त करून तिथल्या मूर्तीची विटंबना या सगळ्यापुढे जनता शरण गेली. हिंदू समाजातील ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादि प्रमुख उच्च जातीतील ज्या लोकांनी समाजाला दिशा द्यायला हवी तेच गलीतगात्र होऊन गेले. तेच या आक्रमकांची चाकरी करू लागले. एकदा हिंदू माणसाचे धर्मांतर झाले की तो पुन्हा हिंदू होऊ शकत नाही अशा कर्मठ जुनाट विचारांमुळे हिंदू समाजाला कुणी त्राता उरला नाही. कुणीतरी देव आता अवतार घेईल याकडे लोक आशा लावून बसले. पण आपणच हाती शस्त्र घेऊन परिस्थितीचा सामना करायला हवा असे खूप कमी जण सांगत होते. कृतीतून दाखवत होते. ज्या महाराजांनी, संतांनी काळाचा विचार करून लोकांना पुन्हा जागृत करायला हवे, एकजुटीने उभे करायला हवे तेही गप्प बसून राहिले. पिचलेल्या, दुखावलेल्या, धर्मांतरीत झालेल्या हिंदू माणसाला कुणी वालीच उरला नाही. त्या काळच्या परिस्थितीचे वर्णन करताना समर्थ रामदास अचूक शब्दात लिहितात;

सकळ पृथ्वी आंदोळली .. धर्म बुडाला..

आणि मग या लोकांना पुन्हा प्रोत्साहित करताना “देव मस्तकी धरावा..अवघा हलकल्लोळ करावा..” असे सांगत राहतात.

 

शिवरायांनी दिली नवी उभारी

संतांनी भले उपदेश केला तरी घाबरून गेलेलं, अत्याचार सहन करून थकलेलं समाजमन इतक्या चटकन पुन्हा उभारी धरत नाही. त्याला समोर प्रत्यक्ष कुणीतरी हवं असतं जे स्वतः असं जगून दाखवत राहील. आणि ती जागा भरून काढली छत्रपती शिवरायांनी..! अत्यंत विपरीत परिस्थितीतून त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा खटाटोप सुरू केला. मूठभर मावळे सोबत घेऊन एकेक गड जिंकू लागले. सुभानमंगळसारख्या अनेक ठिकाणी मुसलमान सुभेदार होते जे लोकांवर दडपशाही करत होते. त्यांचे परिपत्य करायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता महाराष्ट्र पेटून उठला.

हेही वाचा – रयतेला मुलाप्रमाणे जपणारे शिवछत्रपती …

 

हर हर महादेवची गर्जना

आजवर जी माणसे मुस्लिम आक्रमकांसमोर झुकत होती ती ताठपणे “हर हर हर महादेव..!” असं गर्जू लागली. म्हणून लगेच बदल होणार नव्हता. फत्तेखान, अफजलखान, सिद्दी जौहर, शाहिस्ताखान, कारतलबखान असे एकेक मातबर शत्रू सरदार स्वराज्यावर चालून आले. प्रसंगी त्यांनी पुन्हा मंदिरे विटाळून टाकली. कित्येकांचा जीव घेतला. पण लढाईत स्वतः आघाडीवर शिवराय लढत राहिले. आणि या सरदारांचा पाडाव होऊ लागला. काही गडकोट आणि थोडीफार गावे इतकेच असलेले स्वराज्य विस्तारु लागले. पाहता पाहता मराठा सरदार जुन्नर, नगर, विजापूरच्या वेशीवर धडका मारू लागले.  शिवरायांच्या सोबत जे वीर लढत होते त्यातच एक नाव होते नेताजी किंवा नेतोजी पालकर. शत्रूचे सैनिक तर त्यांना प्रतिशिवाजी असंच म्हणायचे. इतका त्यांचा दरारा. इतकं त्यांचं शौर्य..! विजापूर, कोकण, मावळप्रांत, कल्याण-भिवंडी, कर्नाटकचा काही भाग असा सर्वत्र नेताजीरावांचा संचार होता. आडव्या आलेल्या शत्रूला पार संपवून टाकायचे ते..!

 

नेताजींना झाला उशीर

जेंव्हा मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान स्वराज्यावर चालून आले तेंव्हा मात्र स्वराज्याच्या विस्ताराला खीळ बसली. पुरंदरचा तह झाला. महाराज स्वतः मोगली फौजेला मदत करत आदिलशाहीवर चालून गेले. कोल्हापूरजवळ पन्हाळा जिंकून घेण्यासाठी एकीकडून महाराज आणि दुसरीकडून नेताजीराव तुटून पडणार होते. मात्र त्यावेळी काहीतरी झालं आणि नेताजीराव वेळेत पोचू शकले नाहीत. मोठ्या लढाईत हजारभर सैनिक गमावले. महाराज नेताजीरावांवर भयंकर संतापले. नाराज झालेले नेताजीराव थेट मिर्झाराजे आणि दिलेरखानाला जाऊन मिळाले.

 

नेताजींचं जबरदस्तानं धर्मांतर

त्यातच “बादशहाशी भेट घेऊन दक्षिणेच्या सुभेदारीची चर्चा करावी” यासाठी शिवरायांना आग्र्याला जायला मिर्झाराजांनी मनवले. तिथे वेगळेच प्रकरण घडले आणि महाराज कैदेत अडकले. मोठ्या मुश्किलीने महाराज तिथून निसटले खरे पण त्याचा राग मात्र नंतर नेताजीरावांवर निघाला. औरंगजेबाने तातडीने हुकूम सोडला आणि मिर्झाराजाचा सैन्यात असलेले नेताजी आणि त्यांचे कुटुंब कैद केले गेले. त्यांना बादशहासमोर आणण्यात आले. खूप हाल करण्यात आले. आणि शेवटी नेताजीराव शरण गेले. त्या सर्व कुटुंबाचे धर्मांतर केले गेले. नेताजी आता महंमद कुलीखान झाले..! मराठ्यांचा ढाण्या वाघ धर्मांतरीत झाला.

 

स्वराज्यात परतायला उतावीळ जीव

औरंगजेबाने त्यांना सह्याद्रीपासून दूर ठेवण्यासाठी थेट लांब काबूल कंदाहारकडे पाठवले. आसपासच्या मुस्लिम सरदारांचे जगणे पाहून नेताजीराव निराश झाले. आपण किती मोठी चूक करून बसलो हे त्यांना उमगले पण काही करता येईना. त्यांनी एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. हळूहळू त्यांनी मोगली सरदारांचा विश्वास संपादन केला. तिथल्या युद्धात शौर्य गाजवले. एव्हाना रायगडावर महाराजांचा राज्याभिषेकही झाला..! महाराज छत्रपती झाले. या सगळ्या वार्ता त्यांना कळत. स्वराज्यात परत यायला त्यांचा जीव उतावीळ झाला.

हेही वाचा – छत्रपती शिवरायांचा भाषाभिमान

 

कुलीखान रायगडाच्या पायथ्याशी

काही वर्षानी जेंव्हा दक्षिणेतील एका स्वारीतून त्यांना सोबत जाण्याचा हुकूम झाला तेंव्हा महमद कुलीखान झालेल्या नेताजीरावांनी अचूक वेळ साधत मोगली सैन्यातून पळ काढला. रायगडाच्या पायथ्याशी ते दाखल झाले.

राजदरबारात बसलेल्या छत्रपती शिवरायांना दूताने येऊन सांगितले, “ राजे कुणीतरी महंमद कुलीखान नावाचा मोगली सरदार पळून आलाय. तुम्हाला भेटायचं म्हणतोय. पार अवतार झालाय त्याचा..”

राजे गालातल्या गालात हसले. त्यांनी त्या सरदाराला दरबारात घेऊन येण्याची आज्ञा केली. मोठ्या बंदोबस्तात पहारेकरी त्याना घेऊन आले.

आल्या आल्या मोगली रिवाजानुसार त्यांनी कुर्निसात केला.. महाराज जागेवरून उठले.. म्हणाले, “ नेताजीराव, इतक्या वर्षात मुजरा करायला पण विसरून गेलात ना..”

नेताजीराव वरमले. त्यांनी मुजरा केला. राजे पुढे येताच त्यांच्या पायावर अक्षरश: लोळण घेतली. डोळ्यातील अश्रुनी राजांचे जणू पाय भिजवून टाकले. महाराजांनी त्यांना उठवलं आणि घट्ट मिठीत घेतलं..! अवघा दरबार थक्क होऊन पाहत राहिला..!

नेताजीरावाना सन्मानाने वागवण्याची आज्ञा महाराजांनी केली. मात्र सर्वत्र कुजबूज सुरू राहिली. नेताजीराव खरच स्वराज्यात परत आलेत की औरंगजेबाची हेरगिरी करताहेत ? ते तर आता मुसलमान झालेत मग आपल्यासोबत त्यांना कसं बसवायचे ? त्यांच्यासोबत एका पंक्तीत कसं जेवायचे? असे कित्येक प्रश्न निर्माण झाले.

 

आपला धर्म इतका गुळमुळीत आहे का?

काही दिवस गेल्यावर एकदा दरबारात शिवरायांनी एक थरारक घोषणा केली. “नेताजीराव चुकले. झालेल्या छळाला कंटाळून मुसलमान झाले. म्हणून काय झाले? ते आपलेच आहेत. आपला हिंदू धर्म असा थोडाच बुडतो का? इतर आक्रमक येतात, आपल्यावर बळजबरी करतात. ते मुस्लिम आपला धर्म बदलून टाकतात, तिकडे पोर्तुगीज पण त्यांचा धर्म आपल्यावर लादतात. आपण हे का सहन करतो? आपला धर्म इतका गुळमुळीत कसा झाला? आपले विचार आता बदलायला हवेत. ज्यांचे आजवर जबरदस्तीने धर्मांतर झाले आहे त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घ्यायला हवे. त्याची सुरुवात आता करायची. नेताजीरावांना पुन्हा हिंदू करून घ्यायचे..!”

 

जुन्या ग्रंथात सापडला आधार

ते ऐकताच एकच गोंधळ उडाला. तत्कालीन ब्राह्मण पुरोहित वर्ग भडकला. हे सर्व शास्त्रविरोधी आहे असं सांगू लागला. महाराजांनी मोठ्या कौशल्याने त्या सर्वाना समजावले. जुने ग्रंथ शोधायला लावले. आणि अखेर काहीतरी आधार सापडला. त्यानुसार एक मोठा धार्मिक विधी घडवला गेला. महंमद कुलीखान पुन्हा एकदा नेताजी पालकर झाला..!

 

जबरदस्तीने बाटलेल्या शेकडो हिंदू बांधवांना नवी दिशा

राजा हा प्रजेचा पालक असतो, त्याने प्रजेची काळजी घ्यायची असते हे जितकं खरं तितकच त्याने प्रजेला योग्य दिशा दाखवणेही गरजेचे असते. ते कसे करावे हे छत्रपती शिवरायांनी या घटनेतून दाखवून दिले. त्यानंतर शंभुराजांच्या काळातदेखील कित्येकांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आले. यापुढे असल्या अन्यायी धर्मांतराला आम्ही भीक घालणार नाही हेच जणू शिवरायांनी आपल्या जगण्यातून, वागण्यातून दाखवून दिले. एक क्रांतिकारी निर्णय प्रत्यक्षात आणून, जबरदस्तीने बाटलेल्या शेकडो हिंदू बांधवांना एक नवी दिशा दाखवली.

3 Comments

  • अमोल पोवळे

    नेताजी पालकरचे धर्मांतर – ह्या इतिहासातील महत्वाच्या घटनेचे रसाळ वर्णन इतके छान झाले आहे की त्या व्यक्ती व त्या घटनांचा कालपट नजरेसमोर सरकत जातो आणि स्वराज्याच्या धारेत सामिल करण्यासाठी, जबरदस्तीने मुसलमान केलेल्यांना पुन्हा हिंदू करून घेण्याचे धैर्य शिवरायांनी समाजाच्या रोश पत्करून दाखवले हे छान अधोरेखित झाले आहे.

  • प्रवीण मानकर

    खूप सुंदर लेख. इतिहासाची उजळणी झाली.

  • Gauri Shete

    उत्तम लेख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 Responses

  1. खूप सुंदर लेख. इतिहासाची उजळणी झाली.

  2. नेताजी पालकरचे धर्मांतर – ह्या इतिहासातील महत्वाच्या घटनेचे रसाळ वर्णन इतके छान झाले आहे की त्या व्यक्ती व त्या घटनांचा कालपट नजरेसमोर सरकत जातो आणि स्वराज्याच्या धारेत सामिल करण्यासाठी, जबरदस्तीने मुसलमान केलेल्यांना पुन्हा हिंदू करून घेण्याचे धैर्य शिवरायांनी समाजाच्या रोश पत्करून दाखवले हे छान अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Ganeshotsav : गणपतीला दुर्वांचाच हार का घालतात, सिंहही गणपतीचं वाहन आहे पण मग उंदीरचं का सतत दाखवला जातो? जास्वंदाचं फूलचं
Ganeshotsav : गणेश चतुर्थी म्हटलं की, सर्वात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य 'मोदक'. या दिवसांत घराघरांतून
Ganeshotsav : आध्यात्मिक मार्गदर्शन, सांस्कृतीक प्रतीक किंवा आनंददायी काहीही म्हणा, गणपती हा कालातीत आणि सार्वत्रिक आहे. विघ्नहर्ता म्हणजेच वाटेतल्या सर्व

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ