जेन झी पिढी ‘कंटाळ्या’चा सकारात्मक फायदा कसा घेऊ शकते?

Gen Z : जेन झी ( Gen Z)  या पिढीतल्या तरुण वर्गाला कोणत्याही कामात थोडा तरी एकसूरीपणा आला किंवा थोडा वेळ जरी मोबाईल बाजूला ठेवला तरी पटकन कंटाळा येतो, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी ही या पिढीतल्या मुलांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत यावरुन पिढीनुसार घडत असलेल्या स्थित्यंतराविषयी माध्यमातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र, फोनशिवाय किंवा काहिही न करता नुसतीच ही पिढी 5 मिनीटं सुद्धा स्थिर बसू शकत नाही हे धोकादायक आहे. 
[gspeech type=button]

जेन झी ( Gen Z)  या पिढीतल्या तरुण वर्गाला कोणत्याही कामात थोडा तरी एकसूरीपणा आला किंवा थोडा वेळ जरी मोबाईल बाजूला ठेवला तरी पटकन कंटाळा येतो, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेल्या मुलांना जेन झी पिढी म्हणून संबोधलं जातं.  ही मुलं आता ( 25 मे 2025 पर्यंत)  13 ते 28 या वयोगटात आहेत. यापूर्वी ही या पिढीतल्या मुलांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत यावरुन पिढीनुसार घडत असलेल्या स्थित्यंतराविषयी माध्यमातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र, फोनशिवाय किंवा काहिही न करता नुसतीच ही पिढी 5 मिनीटं सुद्धा स्थिर बसू शकत नाही हे धोकादायक आहे. 

मोबाईलची क्रेझ 

पूर्वी जेव्हा मोबाईल नव्हते, त्यावेळी लोकं आपली कामं झाल्यावर वेळ घालवण्यासाठी म्हणजे कंटाळा आला तर टिव्ही बघायचे, पुस्तक वाचायचे, फेरफटका मारायला जायचे किंवा घरातल्या सोबत गप्पा मारणं असे अनेक पर्याय होते. आता हे पर्याय सुद्धा एक काम (Duty) म्हणून गणले जातात. 

या पिढीतल्या मुलांकडे पाच मिनीटं जरी मोबाईल नसला तरी त्यांना चुकल्यासारखं होतं. मोबाईलवर जर काही सिनेमा, सिरीज पाहत असले आणि त्यामध्ये 30 सेकंदाची जरी जाहिरात आली तरी बोट लगेच ती जाहिरात स्कीप करण्यासाठी हलतं. काही वेळेला जाहिरात स्कीप करण्याचा ऑप्शन नसतो तेव्हा या मुलांची चलबिचल होते. 

लोकलने जेव्हा प्रवास करतो तेव्हा ट्रेन थोडा जास्त वेळ थांबली किंवा तासाभराचा प्रवास असेल तर लगेच ‘यार कंटाळा आला’ हा डायलॉग ऐकायला मिळतो. हे वागण्यातले खूप छोटे छोटे बारकावे आहेत. पण या पिढीतल्या मुलांमध्ये ‘अतिप्रमाणात चंचलता’ आहे हे वास्तव आहे. या मुलांना सतत काहितरी घडत राहावं अशी अपेक्षा असते. त्यामध्ये थोडा एकसूरीपणा आला की लगेच कंटाळा आला, हे कंटाळवाणं आहे असं बोलल्याचं ऐकायला मिळते. 

सतत कंटाळा येण्यातूनही फायदेही मिळवता येतील

कंटाळा येणं या गोष्टीला नकारात्मकरीत्या घेण्याऐवजी सकारात्मक पद्धतीने घेणं आता गरज बनत आहे. हां त्यासाठी काही करण्याची इच्छा असणं मात्र गरजेचं आहे. आपल्यात जी चंचलता असते त्यावर आपण ध्यान, चिंतन या मार्गानेच मात करु शकतो.  पूर्वीची लोकं म्हणायची थोडं स्थिर बसा, स्वस्थ बसा. पण काळाच्या ओघात माणसातली स्वस्थताच नाहीशी झाली आहे. 

हे स्वस्थ बसणं, चिंतन करणं म्हणजे केवळ शारीरिक आराम नसतो तर माणूस स्वमग्न होतो. मेंदूला घडलेल्या गोष्टींवर विचार करुन, त्यावर महत्त्वपूर्ण काम करायला पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे आपली बौद्धिक क्षमतेची वाढ होते.  त्यामुळे दिवसातून थोडा वेळ चिंतन, ध्यान करणं आवश्यक आहे. यासाठी जर वेळ मिळत नसेल तर ज्यावेळेला आपण घरात असल्यावर कंटाळा आला आहे असं म्हणतो तेव्हा ध्यान करणं उत्तम आहे. 

हे ही वाचा : एआयच्या ( AI ) जास्त वापरामुळे तरुणाईच्या विचारशक्तीवर परिणाम!

कंटाळा आल्यावर काय करायचं

या वारंवार कंटाळा येण्याचा सकारात्मक फायदा या पिढीला घेता येऊ शकतो. यासाठी पुढील काही गोष्टीवर लक्ष देता येईल. 

कंटाळा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला : 

आपलं एक काम संपलं, किंवा एक सिरीज पाहून झाली की दुसरं काही हाती लागेपर्यंत आपल्याला कंटाला येतो. अशावेळी कंटाळा आला म्हणजे आपल्याकडे वेळ आहे याअर्थाने त्यांच्याकडे बघणं गरजेचं आहे. हा जो वेळ आहे यामध्ये आपल्याकडे करायला काही नाही म्हणून आपण जे काम केलं किंवा जे काही मोबाईलवर पाहिलं ते कसं केलं आहे यावर विचार करत, त्याचं अवलोकन करता येईल. 

जेव्हा ऑफिसचं काम करुन कंटाळा येतो. तेव्हा थोडा ब्रेक घेत, डोळे मिटून जे काम केलं ते काय केलं, कसं केलं यावर विचार करता येईल यातून आपल्या मेंदूला यासाठी दीर्घकाळासाठी साठवायच्या आहेत की नाही, त्यातून नेमकी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, काय बोध घ्यायचा आहे याची स्पष्टता येते. 

कंटाळा म्हणजे कल्पनेतल्या विश्वात हरवण्याचा क्षण : 

आपल्याला सतत काहितरी काम, क्रिया करत राहावसं वाटतं. थोडा मोकळा वेळ असला की कंटाळा यायला लागतो. अशावेळी या वेळेत शांत बसून राहावं. मनात जे काही विचार येतील त्यासोबत वेळ घालवावा. एकसारखं मनाशी किंवा सोबत असलेल्यांशी कंटाळा आला, कंटाळा आला असं म्हणत बसण्याऐवजी त्यावेळेत गप्प बसून आपल्या मनात किती काय काय प्रकारचे विचार येतात – जातात त्यासोबत वेळ घालवावा. याला डे ड्रीमर म्हणतील पण यातून तुमच्या मनात काय विचार आहेत, याची तुम्हाला जाणिव होईल. 

 हे ही वाचा : जनरेशन बीटा : शिक्षण घेण्याची नवी पद्धत, शाळा तयार आहेत का?

वहीवर काहितरी रेखाटणं : 

 जेव्हा कंटाळा येईल तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असा वा घरी तुमच्याजवळ एखादं पान किंवा वही, डायरी असेल तर त्यामुळे काहितरी रेखाटतं बसा. ते काय असेल, चित्र असेल की फक्त रेषा याचा विचार करायचा नाही. या क्रियेतून हळूहळू आपलं मन एकचित्त होत जातं. त्यावेळी जर काही कामाचा ताण असेल तर तो निघून जातो. आपल्याला काही समस्या असेल आणि ती कसी सोडवायची याचं उत्तर मिळत नसेल तर आपला मेंदू  त्यावर विचार करायला लागतो. यातून समस्येचं निराकरण होऊ शकतं. 

अनेकदा या कंटाळवाण्या काळात जेव्हा आपलं मन स्थिर असतं तेव्हाच आपल्याला खूप चांगल्या कल्पना सुचतात. अशा कल्पना लिहून ठेवणं आणि त्यानंतर जेव्हा सुद्धा कंटाळा येईल तेव्हा या कल्पनांवर विचार करणं हा सुद्धा चांगला उपक्रम होऊ शकतो. 

निवांत बसून राहणं : 

कंटाळा आला आहे तर तो घालवण्यासाठी काहीतरी दुसरं काम वा क्रिया केली पाहिजे असं नसतं. त्याऐवजी एखाद्या बागेत किंवा खिडकीजवळ निवांत, शून्य विचाराने बसून आजूबाजूला काय काय घडत आहे हे न्याहाळता वेळ घालवता येतो. 

नेहमीची कामं सावकाश, लक्ष देऊन करणे :

अनेकदा घरातली नेहमीची कामं जसं की, कपडे धुणे, कपडे घडी करुन ठेवणे, कपाट लावणं, भांडी घासणे, ते स्वयंपाकघरात लावणं अशी जी दररोजची कामं आपण घाईघाईत करतो, ती सगळी  कामं या वेळेत सावकाशपणे लक्ष देऊन करता येतील. कारण, हातात दुसरं काही काम नसल्यावर आणि डोक्यात काही विचार नसल्यावर ही कंटाळवाणी कामं आपल्याला आराम देतात. 

‘टेक’ उपवास : 

जर तुमच्यामध्ये वारंवार कंटाळा येण्याचं प्रमाण जास्त असेल तर दररोज किमान 10  मिनीटं मोबाईल, टिव्ही अशा सगळ्या गोष्टींचा उपवास करा. सुरुवातीला कठीण जाईल. 10 मिनिटाचा काळ दिवसाप्रमाणे वाटेल. पण हळूहळू सवय होईल. त्यानंतर मोबाईल वापरावर मर्यादा येतील. मोबाईल ऐवजी या वेळेत अन्य गोष्टी करण्याची सवय लागून कंटाळा येण्याचं प्रमाण कमी होईल.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ