डासांच्या विनाशासाठी ‘चतुरां’ची मोठी मदत

Dragonfly : चतुर हे डासांचा बिमोड करण्यासाठी उत्तम शस्त्र आहे हे अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार, जर तुम्ही एका चतुरला मारलं तर तुम्हाला 100 डासांचे चावे सहन करायला लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
[gspeech type=button]

अलिकडे मच्छरांची वाढ हा प्रदूषणासारखाच ज्वलंत विषय बनला आहे. प्रत्येक घरामध्ये मच्छर किती वाढले आहेत, मच्छर चावत असल्यामुळे झोप पूरी न होणं आणि या मच्छरांपासून संरक्षण करण्यासाठी बाजारात काय – काय नविन गोष्टी आल्या आहेत याच्या चर्चा सुरू असतात. या मच्छरांचा नाश करण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांकडून धूर फवारणीही केली जाते. पण या डासांची पैदास काही कमी होत नाही. 

मात्र, चतुर हे डासांचा बिमोड करण्यासाठी उत्तम शस्त्र आहे हे अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार, जर तुम्ही एका चतुरला मारलं तर तुम्हाला 100 डासांचे चावे सहन करायला लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे. समजून घेऊयात चतुरांमुळे आपलं डासांपासून संरक्षण कसं होतं. 

चतुर आणि भिंगरीमध्ये डासांचा नाश करण्याची ताकद

चतुर आणि भिंगरी ज्यांना आपण इंग्रजीमध्ये ड्रॅगनफ्लाय आणि डॅम्पसेलफ्लाय असं म्हणतो.  या कीटकांमध्ये निसर्गत: डासांचा नाश करण्याची ताकद आहे. कारण हे डासचं या कीटकांचं अन्न असतं. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, एक प्रौढ कीटक दिवसाला 100 डास खातो. त्यामुळे जर का तुम्ही एका जरी कीटकाला मारलं तर तुम्हाला 100 डासांचे चावे सहन करावे लागणार हे निश्चित. 

हे डास कीटकांचं अन्न असतं, त्यामुळे डासांची संख्या कमी होण्यात आणि रोगराईसुद्धा कमी व्हायला मदत होते. डास नियंत्रणासाठी चतुर आणि भिंगरी हे जैविक घटक उपलब्ध आहेत हे स्पष्ट करण्यासाठी ठोस अभ्यासाची आवश्यकता होती. त्यामुळे हे कीटक ठरावीक वेळेत दिवसाला किती प्रमाणात डास आणि त्यांच्या अळ्या खातात त्यामुळे काय परिणाम होतो यावर अभ्यासकांनी संशोधन केलं आहे. 

हे ही वाचा : च्युइंग गम चघळताय ? मग हे वाचा – एका गममधून शरीरात जातात हजारो मायक्रोप्लास्टिकचे कण

डासांची शिकार

जगभरातल्या 14 देशांमध्ये हा अभ्यास केला. यामध्ये आशिया, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका इथल्या देशांचा समावेश होता. इथल्या देशांमध्ये चिकुणगुनिया, डेंग्यु, जपानी मेंदूज्वर, लिम्फॅटिक फायलेरियासिस, मलेरिया, रिफ्ट व्हॅली ताप, वेस्ट नाईल ताप, यलो ताप आणि झिका या तापाचे आजार पसरवणाऱ्या डासांची पैदास होते. 

या अभ्यासासाठी संशोधकांनी एडीस, अ‍ॅनोफिलीस आणि क्युलेक्स या डासांच्या नऊ प्रजातीवर आपल्याला सामान्यत: पाहायला मिळतात अशा 47 जातींतले कीटक सोडून दिले. अशा एकूण 31 प्रयोगामधून समोर आलेले जवळपास 485 परिणामाची नोंद करण्यात आली आहे. 

या निरीक्षणांच्या माध्यमातून एका दिवसाला एक कीटक सरासरी किती डास खातो याची माहिती घेतली. अभ्यासकांनी या प्रगोयावेळी भक्षक चतुक आणि भिंगरी या कीटकांमध्ये आणि भक्ष्य डास यांच्यामध्ये शिकारीवेळी होणारा संपर्क आणि त्यातून रोगराई पसरते का हे समजून घेण्यासाठी एक नेटवर्क निर्माण केलं. 

प्रयोगातील निष्कर्ष

या प्रयोगातून चतुर आणि भिंगरी या कीटकांमुळे डासांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं आढळून आलं. एक चतुर कीटक किंवा एक भिंगरी कीटक दिवसाला सरासरी 40 डासाच्या अळ्या खाऊ शकतो. म्हणजे एका दिवसाला टप्प्याटप्याने 20 आणि 60 इतके डास आणि डासाच्या अळ्या खाऊ शकतो. यामुळे डासांची संख्या ही दिवसाला 45 टक्क्यांने कमी होते.  

प्रयोगामध्ये एडीस, अ‍ॅनोफिलीस आणि क्युलेक्स असे वेगवेगळे डास वापरलेले. या वेगवेगळ्या प्रकारची यशस्वी शिकार या कीटकांनी केल्याचं अभ्यासातून आढळून आलं. 

त्यामुळे हे चतुर आणि भिंगरी हे दोन्ही कीटक डासांची पैदास रोखण्यासाठी त्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावशाली उपाय असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चतुर आणि भिंगरी या कीटकांची पैदास वाढवली तर आपोआप डासांची पैदास ही नियंत्रणात राहून रोगराईचं प्रमाण कमी होईल. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dance : डिप्रेशन कमी करण्यासाठी गोळ्या किंवा थेरपी घेण्यापेक्षा, डान्स सर्वात उत्तम व्यायाम प्रकार आहे असं हे नवीन संशोधन सांगतंय.
बुद्धिमत्ता ही केवळ जनुकांवर अवलंबून नसते. मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासावर त्यांच्या घरातील वातावरण, त्यांना मिळणारं शिक्षण आणि त्यांची आर्थिक परिस्थिती या
tiger's tongue : आपल्याला वाटतं की वाघ शिकार पकडतात आणि दात व पंजाने फाडतात. पण, ते शिकार कापण्यासाठी त्याच्या जिभेचा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ