केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सोमवार, दिनांक 26 मे 2025 रोजी भारत हवामान अंदाज प्रणाली लॉन्च केली. ही हवामान अंदाज प्रणाली पूर्णत: स्वदेशी बनावटीची असून यामुळे अचूक हवामान अंदाज कळू शकतील असा दावा सरकारने केला आहे.
ही प्रणाली इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) ने विकसीत केली आहे. यंदाच्या पावसाळा ऋतूपासून ही प्रणाली वापरली जाणार आहे. समजून घेऊया ही भारत फोरकास्टिंग सिस्टीम कशी आहे आणि त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत?
Launched the first-of-its-kind, state-of-the-art indigenous “Bharat Forecast System” #BharatFS by ‘India Meteorological Department’ under the Ministry of Earth Sciences #MoES.
A major leap in IMD’s capabilities, this breakthrough places India among global leaders in weather… pic.twitter.com/Qs1RMBaqga
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) May 26, 2025
भारत फोरकास्टिंग सिस्टीम
भारत फोरकास्टिंग सिस्टीम (BFS) ही हवामान अंदाज दर्शवणारी यंत्रणा पूर्णत: भारतीय बनावटीची आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून स्थानिक वातावरणाबद्दल अचूक अंदाज मिळू शकतील.
या यंत्रणेमध्ये हाय रेझोल्यूशन प्रणाली बसवली आहे. त्यामुळे 6 किमी अंतरावरच्या हवामानाची माहिती बीएफएस देऊ शकतं. संख्यात्मक पद्धतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी ही जगातली पहिली यंत्रणा आहे.
केंद्रीय हवामान खात्याकडे आता असलेल्या यंत्रणेमध्ये 12 किमी पर्यंतचं हवामान सांगितलं जातं. मात्र, बीएफएस यंत्रणा ही अद्ययावत यंत्रणा असून त्यामध्ये उष्णकटिबंधीय क्षेत्रातलं 6 किमी आणि दोन्ही ध्रुवावर जवळपास 7-8 किमी रेझोल्यूशन आहे. त्यामुळे खूप जास्त अचूक असा हवामानाचा अंदाज आपल्याला मिळू शकतो. तर अमेरिका, यूरोप, ब्रिटनमध्ये 9 – 14 रेझोल्यूशनची हवामान अंदाज प्रणाली वापरली जाते. अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे संचालक सुर्यचंद्रा राव यांनी दिली.
जागतिक हवामान अंदाज प्रणाली (GFS) ने कमी काळातलं आणि मध्यम काळातल्या हवामानाबद्दल माहिती देणारी यंत्रणा विकसीत केली आहे. तर भारताने ट्रँग्यूलर क्यूबिक ऑक्टाहेड्रल (Tco) ग्रीड म्हणजे त्रिकोणी अष्टभूज पद्धतीत कार्य केलं जातं.
संख्यात्मक हवामान अंदाज आणि हवामान मॉडेलिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या या ग्रीड स्ट्रक्चरमुळे उष्ण कटिबंधांवर सुमारे 6.5 किमीच्या रेंजमध्ये हाय रिझोल्यूशन मिळते.
उष्णकटिबंधीय प्रदेश हा हवामानाच्या दृष्टीने गुंतागुंतीचा प्रदेश असतो. अलिकडे हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे बारकाईने या हवामान बदलांची नोंद घेणं गरजेचं आहे. पूर्वीच्या यंत्रणेच्या साहाय्याने चार गावांसाठी एकच अंदाज व्यक्त केला जायचा. आता मात्र, बीएसएफ यंत्रणेमुळे छोट्या छोट्या भौगोलिक क्षेत्रातल्या हवामानाची माहिती देता येईल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री एम. रविचंद्रन यांनी दिली.
#WATCH | Delhi: On IMD (India Meteorological Department), Union Minister Dr Jitendra Singh says, "The time has come to see what will be our contribution to our target of 2047 in the context of IMD… We have succeeded in backing IMD in bringing India's economy to the top level,… pic.twitter.com/rnly2FPaZI
— ANI (@ANI) May 26, 2025
बीएफएस कसं काम करते?
आयआयटीएम कॅम्पसमध्ये नवीन सुपरकॉम्प्युटर अर्का बसवल्यानंतर ही नवीन बीएसएफ सिस्टीम विकसीत करणं शक्य झालं. सुपरकम्प्यूटर अर्का मध्ये 11.77 पेटाफ्लॉप्स (पेटाफ्लॉप्स म्हणजे कॉम्प्युटर प्रोसेसिंग स्पीड मोजण्याचं एक युनिट) आणि 33 पेटाबाईड्स माहिती साठवण्याची क्षमता आहे. (1 पेटाबाईट म्हणजे 1 हजार टेराबाइड्स (TB) असते.)
यापूर्वी आयआयटीएम मध्ये प्रत्युष हे सुपर कॉम्प्यूटर वापरलं जायचं. या कॉम्प्यूटरमध्ये माहिती प्रोसेसिंग व्हायला 10 तास लागायचे. मात्र तेच काम अर्का सुपरकम्प्यूटरमध्ये चार तासात पूर्ण होतं.
बीएसएफ यंत्रणेमध्ये हवामानाचा अंदाज काढण्यासाठी देशभरातल्या 40 डॉपलर हवामान रडारचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे केवळ दोन तासांमध्ये देशभरातल्या स्थानिक स्थितीनुसार हवामानाचा अंदाज जाहीर केला जाईल. दरम्यान, देशभरातल्या हवामान डॉपलरची संख्या येत्या काळात वाढवून 100 पर्यंत नेण्याची योजना आहे.
हे ही वाचा : देशातला पहिला मासिक बेरोजगारीदर अहवाल प्रसिद्ध
बीएसएफची आवश्यकता
अलिकडच्या काळात ऋतूचक्रामध्ये बदल होताना दिसत आहे. याला हवामानात सातत्याने घडणारे बदल कारणीभूत आहेत. यावर्षीची मे महिन्यामध्येच मान्सूनने हजेरी लावली. या अशा बदलत्या वातावरणाचा ठोस अंदाज काढणं गरजेचं आहे. बीएसएफ प्रणालीमुळे हवामानाच्या अंदाजामध्ये 30 टक्के अचूकता येऊ शकते.
सन 2022 पासून बीएसएफच्या चाचण्या सुरू आहेत. या काळात बीएसएफने अतिवृष्टीसंदर्भात वर्तवलेल्या अंदाजामध्ये 30 टक्के सुधारणा झाल्या आहेत. तर मुख्य पर्जन्यवृष्टी होणाऱ्या प्रदेशाच्या हवामानाविषयी वर्तवलेल्या अंदाजामध्ये 60 टक्के अचूकता आढळली आहे.