अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू न देणारी ही लस आहे. प्राण्यांवर या लसीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तर माणसांवरील प्रयोगामध्ये एका लहान गटावर याचा प्रयोग केला आहे. त्यातून अपेक्षित निकाल येत आहेत. तरी या लसीचा प्रयोग पूर्ण व्हायचा आहे. त्यामुळे ही लस अजून बाजारात उपलब्ध नाही.
शरीरात कोकेनला रोखणारी लस
ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तिने कोकेनचं सेवन केल्यावर त्याच्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली (इम्यून सिस्टीम) ही सतर्क होऊन कोकेनमधील घटकाला मेंदूपर्यत जाण्यास रोखणार आहेत. या ड्रग्जमुळे शरिरातील डोपेमाईन हार्मोनचं प्रमाण वाढून नशा चढली जाते. मात्र या क्रियेत अडथळा निर्माण केल्यावर या ड्रग्जच्या सेवनाने माणसाला जी नशा येते ती येणार नाही. अनेकदा या नशेची सवय झाल्यामुळे वारंवार कोकेन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र, या लसीमुळे ही नशा येण्यापासून रोखलं तर कोकेन घेण्याची ईच्छाच कमी कमी होऊन सरतेशेवटी यापासून सुटका होऊ शकते.
प्रयोगाचे निकाल
अमेरिकेमध्ये वेइल कॉर्नेल इथल्या ड्रग्ज व्यसनाधिन असलेल्या सात जणांना महिन्याला एक अशी लस देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या लघवीचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये प्लेसिबो मिळालेल्या लोकांपेक्षा 17 टक्क्याने त्यांची लघवी ही कोकेन-मुक्त झाल्याचं आढळून आलं..
Drugs Mafia : ड्रग्जच्या विळख्यात पश्चिम महाराष्ट्र?
लसीचा उगम
ब्राझिलच्या फेडरल यूनिर्व्हसिटी मिनास गेरायसमधल्या एका संशोधकाच्या गटाने ही कॅलिक्सकोका ही लस शोधली आहे. ड्रग्ज व्यसनाधीन व्यक्तिने ही लस घेतल्यानंतर जर कोकेन घेतलं तर त्याच्या शरिरातील रक्तप्रवाहात कोकेनचा प्रसार रोखण्यासाठी शरिरातील अँटीबॉडीज कृत्रिम रेणू तयार करते.
उंदरावर आणि माकडांवर या लसीचा प्रयोग केला. या प्रयोगामध्ये त्यांच्यावर कुठलेही साईड इफेक्ट न झाल्याचं आढळलं. आणि टप्प्याटप्याने रक्तप्रवाहाच्या मार्फेत मेंदूपर्यंत कमी प्रमाणात कोकेन पोहोचल्याचं दिसून आलं.
प्रयोगासाठी 3 हजार व्हॉलेंटियर्सची नोंदणी
प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता पुढच्या टप्यात माणसांवर प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 3 हजार व्हॉलेंटियर्सनी नाव नोंदणी केली आहे.
यापूर्वी ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी ज्या-ज्या लसी तयार केलेल्या आहेत आणि ज्या वापरात आहेत त्या सर्वांपेक्षा ही लस उत्तम आहे असा संशोधकांचा दावा आहे. कारण यापूर्वींच्या लसीमध्ये शरिरातील प्रथिनांच्या वाहकांमध्ये अडथळे निर्माण केले जायचे. यामुळे त्या व्यक्तिची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन अन्य आजारांचा सामना करावा लागायचा.. मात्र, या लसीमुळे असे कोमतेही साईड इफेक्ट होणार नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
पुढील शक्यता काय?
कॅलिक्सकोका या लसीमुळे व्यसनाधीन व्यक्तिला कोकेनची नशा चढणार नाही. आणि मग हळूहळू त्याची ड्रग्ज घेण्याची ईच्छा कमी होत जाईल. अशा पद्धतीने तो ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडू शकतो. मात्र, या सगळ्यामध्ये जर त्या व्यक्तिने अधिक प्रमाणात ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली तर मात्र त्याला वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल. शेवटी ड्रग्जची उपलब्धता कमी होणे, त्याची किंमत खूप जास्त असली तर ते व्यसनाधील लोकांना खरेदीचं करता येणार नाही. हाही एक प्रभावी पर्याय आहे. सरतेशेवटी ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तिंना त्यांचं व्यसन सुटत नाही तोपर्यंत दर महिन्याला या लसीचं इंजेक्शन दिलं तरिही, मानसिक दृष्ट्या त्याला यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन आणि पाठिंब्यांची गरज आहे.