विमान संकटात असताना मदतीसाठी वापरले जाणारे ‘मे डे’ सारखे शब्द आणि त्यांची तीव्रता !

MAYDAY Call : मे डे हा सर्वात महत्त्वाचा कोड वर्ड आहे. या कोड वर्डचा अर्थ आहे की विमानाला मदतीची त्वरित आवश्यकता आहे.
[gspeech type=button]

12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं एक विमान अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. ही दुर्घटना टाळण्यासाठी पायलटने ‘मे डे’ (Mayday) म्हणत कंट्रोल रूम कडे मदत मागितली होती. पण तुम्हाला माहिती का हा ‘मे डे’ शब्द नेमका काय आहे आणि संकटात सापडलेल्या वैमानिकांसाठी तो किती महत्त्वाचा का असतो? पायलट हा शब्द नेमका कधी वापरतात? चला तर मग, आज आपण याचबद्दल जाणुन घेऊया.

‘मे डे’ म्हणजे काय?

‘मेडे’ हा एक खास आपत्कालीन संकेत शब्द आहे. जेव्हा विमान अतिशय धोकादायक परिस्थितीत असतं आणि त्याला तातडीनं मदतीची गरज असते, तेव्हा या संकेत शब्दाचा उपयोग पायलट करतात. हा शब्द ऐकताच एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) आणि इतर विमानं लगेच सतर्क होतात. मग त्या विमानाला शक्य तितकी लवकर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

‘मे डे’ हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. मूळ फ्रेंच शब्द आहे “m’aider”, याचा अर्थ “मदत करा”. त्याचाच इंग्रजीतून रुपांतर करून ‘Mayday’ असा शब्द तयार झाला. आज जगभरात हा शब्द संकटात सापडलेल्या विमानं, जहाजं किंवा इतर वाहतूक साधनांसाठी वापरला जातो.

मे डे हा सर्वात महत्त्वाचा कोड वर्ड आहे. या कोड वर्डचा अर्थ आहे की विमानाला मदतीची त्वरित आवश्यकता आहे.

जेव्हा एखादं विमान किंवा जहाजासारखं मोठं वाहन खूप मोठ्या संकटात सापडतं आणि त्यांना तातडीने मदतीची गरज असते, तेव्हा हा शब्द वापरला जातो.

हेही वाचा: गुजरात विमान अपघात : पायलट, केबिन क्रू सह 241 प्रवाशांचा मृत्यू, 1 प्रवासी बचावला

पायलट ‘मे डे’ कधी म्हणतात? 

पायलट हा शब्द काहीही झालं की वापरत नाही. खरोखरच जिवाला मोठा धोका असेल, विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा विमान कोसळण्याची शक्यता असेल, तेव्हाच ‘मे डे’ कॉल दिला जातो.

इंजिनमध्ये बिघाड होणे, विमानात आग लागणे, वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटणे किंवा विमान कोसळण्याची भीती असणे. याशिवाय, विमानात एखादी मोठी तांत्रिक अडचण आल्यास, प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्यास इंधनाची तीव्र कमतरता जाणवल्यास किंवा दहशतवादी हल्ला झाल्यासही वैमानिक ‘मे डे’ कॉल करतात.

‘मे डे’ तीन वेळा का म्हणतात?

पायलट रेडिओवर ‘Mayday Mayday Mayday” असा शब्द तीन वेळा म्हणतो. यामागचं कारण म्हणजे रेडिओवर कधीकधी आवाज व्यवस्थित येत नाही. जर एकदाच ‘मे डे’ म्हटलं आणि तो आवाज नीट पोहचला नाही, तर मदतच मिळणार नाही. म्हणून तो तीनदा बोलला जातो.

‘मे डे’ कॉल इतका महत्त्वाचा का?

‘मे डे’ ऐकताच एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) वाले आणि आजूबाजूच्या इतर विमानांना लगेच समजतं की हे विमान खूप मोठ्या संकटात आहे आणि त्याला तात्काळ मदत हवी आहे.

‘मे डे’ कॉल आल्यावर संकटात सापडलेल्या विमानाला लगेच मदत दिली जाते. कंट्रोल रूम सर्वात आधी त्या विमानाला मदत करतं. त्यांना सुरक्षित उतरण्यासाठी किंवा इतर सूचना देण्यासाठी लगेच मार्ग मोकळा करून दिला जातो.

‘मे डे’ कॉलमुळे आजूबाजूची इतर विमाने आणि कंट्रोल रूम सावध होतात. यामुळे ते त्या संकटात असलेल्या विमानाला रस्ता मोकळा करून देऊ शकतात. याशिवाय, अग्निशमन दल, रुग्णवाहिका अशा आपत्कालीन सेवांनाही लगेच अलर्ट केलं जातं, जेणेकरून विमान उतरताच त्यांना मदत मिळू शकेल.

विमान उड्डाणावेळी इतर इमर्जन्सी कोड्स

PAN PAN हा कोड ‘मे डे’ इतका महत्वाचा नसतो, पण तरीही आपत्कालीन परिस्थिती आल्यास वापरला जातो.

7700 : हा एक विशेष ‘स्क्वाक कोड’ आहे, जो वैमानिक विमानाच्या ट्रान्सपॉंडरवर सेट करतात. हा कोड सेट करताच, एटीसीला त्यांच्या रडारवर लगेच कळतं की हे विमान संकटात आहे. हा कोड कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरला जातो.

Abort हा शब्द वैमानिक तेव्हा वापरतात, जेव्हा त्यांना उड्डाण थांबवायचे असते. विमान धावपट्टीवर धावत आहे आणि टेकऑफ करण्यापूर्वी काही तांत्रिक अडचण आली, तर वैमानिक ‘Abort’ म्हणतो आणि उड्डाण रद्द करतो

‘मे डे’ हा एक आंतरराष्ट्रीय संकटकालीन कॉल आहे, जो वैमानिक अत्यंत धोकादायक परिस्थितीत आपल्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मदतीची मागणी करण्यासाठी वापरतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Frog skin : बेडूक हा जिथे ओलसर आणि दमट जागा असते तिथेच असतो. अशा ठिकाणी बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात असतात.
Keyboard :आज आपण जो कीबोर्ड वापरतो, तो गेल्या शंभर वर्षांपासून तसाच आहे. त्यावरची अक्षरंही तशीच आहेत.पण ही मांडणी कशी झाली,
Strawberry Moon - आजच्या पौर्णिमेला आकाशात दिसणाऱ्या चंद्रांचं नाव जरी स्ट्रॉबेरी मून असं असलं तरी तो खराखूरा स्ट्रॉबेरीसारखा गुलाबी रंगाचा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ