परिवर्तन घडवून आणणारी गावातील वाचनालये

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा गावात वाचनालय हे सशक्त विकासाचं माध्यम ठरतं.
[gspeech type=button]

गावाच्या चावडीवर गप्पांची गर्दी असते, चौकात रोजच्या जगण्याची वर्दळ असते, पण गावात  कोपऱ्यात शांत उभं असलेलं एखादं वाचनालय हे एक संवादाचे, विचारांचे आणि विकासाचे केंद्र बनू शकतं  हे अजूनही अनेकांना उमगलं नाही. वाचनालय म्हणजे फक्त पुस्तकांचा संग्रह नव्हे, तर परिवर्तनाची बीजं रुजवणारं केंद्र असतं. राज्यातल्या विविध खेड्यांमधल्या सामान्य नागरिकांनी स्वपुढाकारानं वाचनालय आणि अभ्यासिकांच्या माध्यमातून गावाला वेगळी स्वप्नं दाखवली आहेत. या गावांमधली मुले आणि तरुण पिढी डिजीटल व्यसनांपासून दूर आहेत. स्पर्धा परिक्षांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. ज्ञानाचा अखंड झरा या गावांमध्ये वाहतोय.

 

बसही न पोहचणाऱ्या गावात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातलं लावारी गाव एकदम दुर्गम भागात वसलं आहे. गावात बस सुविधाही नाही. लोकसंख्या 450 च्या आसपास तर कुटुंब केवळ शंभर. या गावातील नामदेवराव कोकोडे हे ब्रह्मपुरी इथून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. गावात केवळ दुसरीपर्यंत शाळा होती. वयाच्या  आठव्या वर्षी शिक्षणाच्या ध्यासातून त्यांनी गाव सोडले. मजुरी करीत अत्यंत हालअपेष्टा भोगत शिक्षण घेतले. पुढे ज्या महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयात ते प्राचार्य झाले. आणि सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावातील इतर मुलांच्या वाट्याला असला संघर्ष येऊ नये, म्हणून त्यांनी गावात अभ्यासिका आणि वाचनालयाची सुरुवात केली. गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हावं म्हणून कोकोडे हे प्रयत्न करत आहेत. गावाकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मुलांमध्ये वाचन वाढवण्याकरता प्रयोग

नागपूर जिल्ह्यातील गांधीवादी बंडूभाऊ शिंदे हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ते ग्रंथपाल म्हणून काम करत असत. त्यांनी मुलांमधील कमी होत चाललेली वाचण्याची आवड वाढावी, यासाठी प्रयोग सुरू केले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावातील मुलं घडवण्याच्या ध्यासातून  घरीच वाचनालय निर्माण केलं. मुलांनी तिथे अभ्यास करावा यासाठी त्यांनी सर्व वातावरण निर्मिती केली. गावोगावी सायकलवर भटकंती करून मुलांना प्रेरित केले. आजूबाजूच्या गावातील मुलांनी तिथे अभ्यास करावा म्हणून निशुल्क सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. या वाचनालयात अभ्यास करताना 103 मुलं-मुली उच्च पदावर नोकरीत रुजू झालीत. मुलांना वाईट व्यसन लागू नयेत म्हणूनही शिंदे त्यांची धडपड सुरू असते.

 

शिक्षकांची वाचनालय चळवळ

सांगलीतल्या भेंडवळ गावाता प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ‘गाव वाचनालय चळवळ’ सुरू केली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावात वाचनालय सुरू केलं. इथे रोज 150 पेक्षा जास्त वाचक नियमित येतात. एकेकाळी शिक्षणात मागे असलेला हा गाव आता तालुक्यात अव्वल आहे.

शेतकऱ्याचं वाचनालय

संभाजीनगरमधील सावरगाव इथं एका युवक मंडळाने स्वतःहून जुनी पुस्तकं गोळा करून ‘शेतकऱ्यांचं वाचनालय’ सुरू केलं. या वाचनालयात कृषी मासिकं, शाश्वत शेतीबाबत मार्गदर्शन, शासन योजना यांची माहिती दिली जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्राचा वापर करून कृषी करायला सुरुवात केली आहे.

हेही वाचाः ऋषी आणि कृषी सत्संग!

गावातील वाचनालयामुळं शासकीय नोकरी

गोंदियामधील सौंदड गावातील अनिल मेश्राम या निवृत्त शिक्षकाने सावित्रीबाई फुले वाचनालय निर्माण केले. स्वतः घरोघरी जाऊन मुलांना त्याची महती सांगितली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत  मुलांना वाचनालयाकडे वळवले. त्या ठिकाणी वाचन, लेखन, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा आयोजित करून मुलांना प्रोत्साहन दिले. या वाचनालयातील अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीत रुजू झालेत.

 

वाचनालयासाठी काय करायला हवं?

ग्रामपंचायतीचा पुढाकार– गावात वाचनालय निर्मितीसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलं घरी अभ्यास करत नाहीत. त्यांना दिशा नसते. त्यामुळे पान टपरीवर, चौकात, शहरात फेरफटका मारणे, वेळ घालविणे यातच त्यांना आनंद मिळतो.   त्यांचा वेळ सकारात्मक बाबीत व्यतीत हवा यासाठी वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे असते.  वाचनालयासाठी स्वतंत्र जागा व निधी  उपलब्ध करण्यासाठी सरपंच यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

स्थानीय स्वयंसेवकांची भूमिका – गावात वाचनालय सुरू करण्यासाठी आणि वाचनालय तयार झाल्यानंतर शिक्षक, युवक, महिला यांनी पुस्तक निवड, व्यवस्थापनात सहभाग घ्यावा.

पुस्तक दान मोहिमा – गावातील अनेक कुटुंबांकडे जुनी पुस्तके तशीच पडून असतात. ती सर्व पुस्तकं, मासिकं संकलित करावीत आणि आपले वाचनालय समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

साप्ताहिक वाचन सत्र – शालेय मुलांसाठी नियमित गोष्टी वाचन, चर्चासत्रं या माध्यमातून मुलांमध्ये अभ्यासाची वाचनाची आवड निर्माण होते.

 

2024 मध्ये आम्ही आमच्या रोजगार संघाच्या माध्यमातून वाचन चळवळ राबविली. त्याला गावातून उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलं आणि त्यांचे पालक मुलांच्या वाढदिवशी पुस्तके भेट द्यायला लागले. कुणाचा सत्कार समारंभ होत असताना किंवा कुठल्या कार्यक्रमाचे आयोजन करताना बुके म्हणजे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत न करता त्या ठिकाणी बुक म्हणजे पुस्तक भेट देण्याचा आग्रह आम्ही करत असतो. असे सर्व परिवर्तन आपल्या गावात घडून आणण्यासाठी वाचनालय एक सुंदर माध्यम असू शकते.

1 Comment

  • 📄 + 1.663426 BTC.NEXT - https://yandex.com/poll/enter/HvUzxzYyyGac7xQv4ZnQhs?hs=d74817529ca55f28997484cba35177c9& 📄

    mfizob

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. 📄 + 1.663426 BTC.NEXT - https://yandex.com/poll/enter/HvUzxzYyyGac7xQv4ZnQhs?hs=d74817529ca55f28997484cba35177c9& 📄 says:

    mfizob

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही
हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून
कबड्डी हा एक केवळ खेळ नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे. शरीरसामर्थ्य, श्वसन नियंत्रण, आणि रणनीती यांचे मिलाफ असलेला हा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ