‘अरण्यऋषी’ हरपले!

निसर्गाचे अभ्यासक, साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचं बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी निधन झालं. ते 93 वर्षाचे होते. त्यांना ‘अरण्यऋषी’ या विशेष नावाने ओळखलं जायचं.

मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये 36 वर्ष काम केलं. या कार्यकाळात त्यांनी देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांना 13 भाषा अवगत होत्या.

देशभर फिरत असताना त्यांनी आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत पर्यावरणाशी संबंधित माहितीची नोंद डायरीमध्ये करत गेले. या माहितीच्या आधारावर त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं लेखन केलं.

अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली आहेत.

संशोधनपर लेखन करणाऱ्या चितमपल्ली यांचा साहित्यक्षेत्रातही वावर होता. त्यांनी अ.भा. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.

निसर्ग, वन्यजीव अशा पर्यावरण क्षेत्रातलं आणि साहित्य क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाची नोंद घेत 30 एप्रिल 2025 रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ