भारतातील सॉफ्टपॉर्न, एरॉटिक इंडस्ट्रीची वाढ, आर्थिक गणितं आणि सामाजिक परिणाम

OTT Softporn Content : ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सॉफ्टपॉर्न आणि एरोटिका प्रकारचे चित्रपट आणि वेब सिरीजच्या निर्मितीत मोठी वाढ झाली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली अशा प्रकारचा कंटेंट सर्रासपणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. या क्षेत्रात कोरोना काळानंतर झालेली वाढ, हा कंटेंट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये झालेली वाढ, आर्थिक उलाढाल, कलाकारांचं जीवन आणि या प्रकारच्या कंटेंटचा सामाजिक परिणाम अशा विविध मुद्दयांचा आढावा या लेखात घेतला आहे.
[gspeech type=button]

भारतात गेल्या दशकभरात सॉफ्टपॉर्न आणि एरोटिका प्रकारच्या चित्रपट आणि वेब सिरीजच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना महामारीनंतर ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म्सच्या लोकप्रियतेने या कंटेंटला मोठी बाजारपेठ मिळवून दिली. उल्लू, अल्ट बालाजी, कूकु, हॉटशॉट्स, प्राईम फ्लिक्स, एमएक्स प्लेयर यांसारख्या नव्या प्लॅटफॉर्म्सनी कमी बजेटच्या, कामुक कंटेंटवर आधारित मालिका तयार करून तरुण प्रेक्षकांना आकर्षित केलंय. 

या लेखात या उद्योगाची वाटचाल, कोरोनाकाळानंतरची वाढ, युजर्स, आर्थिक उलाढाल, कलाकारांचं जीवन आणि या प्रकारच्या कंटेंटचा सामाजिक परिणाम यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.  

कोविडनंतर झालेली वाढ आणि नव्या उद्योगाची वाटचाल

कोविड 19 लॉकडाऊन (2020-21) दरम्यान सिनेमा थिएटर्स बंद झाल्यामुळे प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे धाव घेतली. स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोन्सच्या उपलब्धतेमुळं ग्रामीण आणि शहरी भागात ओटीटीचा वापर वाढला. एका अहवालानुसार, 2020 मध्ये भारतातील ओटीटी युजर्स 35 कोटींवर पोहोचले, पुढे 2024 मध्ये ही संख्या 50 कोटींच्या घरात गेली. उल्लू, अल्ट बालाजी यासारख्या प्लॅटफॉर्म्सनी हिंदी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू या स्थानिक भाषांमधील बोल्ड कंटेंट निर्मितीवर भर दिला. 2016 ते 2023 या काळात सॉफ्टपॉर्न कंटेंट निर्मितीत तब्बल 150 टक्के वाढ झाल्याचा दावा सोशल मीडियावरील चर्चांमधून समोर येतो. लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांनी घरबसल्या अशाप्रकारच्या कंटेंटचा उपभोग घेतल्यामुळे या प्लॅटफॉर्म्सना नवीन युजर्स (प्रेक्षक) मिळाले.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सची संख्या आणि युजर्स

सध्या भारतात 60 हून जास्त प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत. यामध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, डिझनी+, हॉटस्टार यांच्यासह उल्लू, अल्ट बालाजी यासारख्या काही भारतीय प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. यापैकी 10 ते 15  प्लॅटफॉर्म्स हे सॉफ्टपॉर्न किंवा एरोटिका प्रकारातील कंटेंट तयार करतात. 

उल्लू (Ullu) – 2018 मध्ये विभू अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या उल्लूने ‘कविता भाभी’,  ‘चरमसुख’ आणि ‘पलंग तोड’ या बोल्ड वेब सिरीजमुळे कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली. 2025 मध्ये उल्लूचे 1 कोटीहून अधिक अँड्रॉइड डाउनलोड्स आणि सुमारे 20 लाख पेड सबस्क्रायबर्स होते. त्याची वार्षिक उलाढाल 2023-24 मध्ये 100 कोटींच्या घरात होती. ज्यातून साधारण 13 कोटींचा निव्वळ नफा उल्लूने कमावलाय. 

उल्लू हिंदीसह भोजपुरी, तमिळ, तेलुगू अशा प्रादेशिक भाषांमध्ये कंटेंट तयार करते. त्यामुळे मोठ्या शहरांसोबतच टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील प्रेक्षक उल्लूशी मोठ्या प्रमाणात जोडला गेलाय. 

अल्ट बालाजी (ALT Balaji) – चित्रपट, मालिका निर्माती आणि बालाजी टेलिफिल्म्सची 

संचालिका एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्म्सने 2017 मध्ये अल्ट बालाजी सुरू केलं. ‘गंदी बात’, ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ आणि ‘बेकाबू’ यासारख्या सिरीजमुळे या प्लॅटफॉर्मने सुरूवातीच्या काळात लोकप्रियता मिळवली. 2024 मध्ये अल्ट बालाजीचे सुमारे 1.2 कोटी पेड सबस्क्रायबर्स होते. यातून त्याची उलाढाल साधारण 58 कोटींच्या घरात होती. ज्यातून 4 कोटींचा निव्वळ नफा अल्ट बालाजीने कामवलाय. 

एमएक्स प्लेयर (MX Player) – अ‍ॅमेझॉनच्या मालकीचे एमएक्स प्लेयर 25 कोटी युजर्ससह भारतातील मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. यावर ‘आश्रम’सारख्या मुख्य प्रवाहातील सिरीजसह बोल्ड कंटेंटही उपलब्ध आहे. उल्लू आणि अल्ट बालाजीच्या तुलनेत यांचे कंटेंट कमी विवादास्पद आहेत, पण त्यांनीही एरोटिक कंटेंटच्या बाजारपेठेत आपलं स्थान मिळवलंय. 

आर्थिक उलाढाल

भारतातील ओटीटी उद्योगाची उलाढाल 2025 या वर्षात सुमारे 15 हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. यामध्ये सॉफ्टपॉर्न आणि एरोटिका कंटेंटचा वाटा सुमारे 20 ते 25 टक्के आहे, म्हणजेच साधारण 3 हजार कोटी रुपये. या प्लॅटफॉर्म्सची कमाई प्रामुख्याने सबस्क्रिप्शन (70%) आणि जाहिराती (30%) यामधून होते. उल्लू आणि अल्ट बालाजी कमी किमतीच्या सबस्क्रिप्शन मॉडेल्सवर (मासिक 100 ते 300 रुपये) काम करतात. यामुळे छोट्या शहरातील प्रेक्षकांना आकर्षित करणं सोपं जातं. सिरीजचा पहिला एपिसोड मोफत दाखवून प्रेक्षकांना ‘पॉवर युजर्स’ बनवलं जातं. त्यानंतर ते पैसे देऊन दीर्घकालीन सबस्क्रायबर्स बनतात. सोशल मीडियावर ‘क्लिफहॅंगर’ क्लिप्स शेअर करून प्रेक्षकांना आकर्षित केले जाते.

कलाकारांचं जीवन आणि त्यांच्यासमोरची आव्हानं

या कंटेंटमधील कलाकार, विशेषतः नवोदित अभिनेते, अभिनेत्री अनेकदा मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये संधी न मिळाल्याने या क्षेत्रात येतात. काही कलाकार आणि तंत्रज्ञ या इंडस्ट्रीला करिअरची संधी मानतात, तर काहींना यामुळे दीर्घकालीन करिअरला धोका निर्माण होतो, असं वाटते. एका मुलाखतीत उल्लूच्या एका अभिनेत्रीने सांगितलं की, अशाप्रकारच्या भूमिका स्वीकारणं सोपं नाही. समाज आणि कुटुंबाकडून अनेकदा टीका सहन करावी लागते. पण आर्थिक गरजांमुळे हा पर्याय निवडावा लागला. दुसऱ्या एका अभिनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, एका अडल्ट सिरीजसाठी 50 हजार ते 2 लाखांपर्यंत मानधन मिळतं. पण नियमित कामाची हमी नसते. सामाजिक टीका, कमी मानधन आणि करिअरमधील अनिश्चितता यामुळं या कलाकारांचं जीवन आव्हानात्मक बनलंय.

या उद्योगातील तंत्रज्ञ जसे की दिग्दर्शक (Director), छायालेखक (Cinematographer) आणि संपादक (Editor)  यांची मतं संमिश्र आहेत. एका दिग्दर्शकानं (नाव गुप्त) सांगितले, सॉफ्टपोर्न कंटेंटची मागणी जास्त आहे. ती दिवसेंदिवस वाढत आहे. पण यामुळे आमच्या सर्जनशीलतेवर मर्यादा येतात. आम्हाला प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ठराविक फॉर्म्युला फॉलो करावा लागतो. या कंटेंटमुळे नवीन तंत्रज्ञांना संधी मिळत आहे. पण त्या कामाची गुणवत्ता अनेकदा कमी असते. तंत्रज्ञांना कमी बजेट आणि कमी वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव असतो. त्यामुळे कामावर परिणाम होतो, असं एका छायालेखकानं सांगितलं. 

सामाजिक परिणाम

सॉफ्टपॉर्नसारख्या कंटेंटमुळे अनेक परिणाम झाल्याचे दिसतात. एकीकडे तरुण पिढीमध्ये लैंगिक विषयांवर मोकळेपणा वाढला आहे. तरूणाई मोकळेपणाने लैंगिकबाबींवर चर्चा करताना दिसते. तर दुसरीकडे 2019 च्या एका अहवालानुसार भारतात पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झालीय. ज्यामुळे लैंगिक हिंसाचार आणि स्त्रियांविषयी चुकीच्या धारणा वाढण्याची भीती आहे. यामुळे नैतिक मूल्यांचा ऱ्हास आणि तरुणांवर नकारात्मक प्रभाव पडत असल्याची टीका होते.

कायदा काय सांगतो?

केंद्र सरकारने 2021 मध्ये आयटी (मध्यवर्ती नियम) अंतर्गत ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नियमावली जारी केली. आयटी कायद्यानुसार अश्लील सामग्री प्रसारित केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपये दंड होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयात अशा कंटेंटवर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल आहेत. सेन्सॉर बोर्डासारखी यंत्रणा ओटीटीसाठी लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होतेय. पण सध्या सेन्सॉरशिपच्या अभावामुळे नियमांचं पालन कितपत केलं जातं यावर शंका घेण्यास वाव आहे. 

हे ही वाचा : – पोरांना आतून रिकामं करणारं Emptiness

जनमानसातील मते आणि अश्लीलतेचे आरोप

उल्लू आणि अल्ट बालाजीवर अश्लीलता पसरवण्याचे आरोप सातत्याने होत आलेत. सोशल मीडियावर अशाप्रकारच्या प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटला ‘अश्लील’ आणि ‘नैतिकतेच्या विरोधात’ असल्याची टीका नेहमीच होते. उल्लूवरच्या ‘हाऊस अरेस्ट’ या रिॲलिटी शोमुळे काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह अनेक नेत्यांनी या शो वर अश्लिलता पसरवण्याचा आरोप करत बंदीची मागणी केली होती. 

2024 मध्ये केंद्र सरकारनं 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती. पण उल्लू आणि अल्ट बालाजी यांना त्यातून वगळण्यात आलं. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त झाला. सर्वोच्च न्यायालयानं 2023 मध्ये ओटीटीवरील अश्लील कंटेंटला ‘मोठी चिंता’ म्हणत नियमनाची गरज व्यक्त केलीय. राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल संरक्षण आयोगाने उल्लूवरील कंटेंटमुळे शालेय मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. जनमानसात याबद्दल संमिश्र मतप्रवाह दिसून येतात. हा अडल्ड, एरॉटिक आणि सॉफ्टपॉर्न कंटेंट काहीजण ‘मनोरंजन’ मानतात तर काहींना ते नैतिकतेच्या विरोधात आणि तरुणांवर नकारात्मक परिणाम करणारं वाटतं. 

भारतातील सॉफ्टपॉर्न आणि एरोटिका कंटेंटच्या वाढीने ओटीटी उद्योगाला आर्थिकदृष्ट्या मजबूत केलंय हे मान्य करावं लागतं. उल्लू, अल्ट बालाजी, एमएक्स प्लेयर किंवा यांसारख्या इतर प्लॅटफॉर्म्सनी सॉफ्टपॉर्न आणि एरोटिका कंटेंटद्वारे भारतातील ओटीटी बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलंय. कमी खर्चात जास्त नफा मिळवणारी ही इंडस्ट्री कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन आली आहे. मात्र, सामाजिक टीका, कायदेशीर अडचणी, आणि नियमनाच्या अभावामुळे या उद्योगाची भविष्यातील वाटचाल अनिश्चित आहे. यासाठी कडक सेन्सॉरशिप, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या हक्कांचे संरक्षण, आणि सामाजिक जागरूकता वाढवून या कंटेंटचा समाजावरील प्रभाव नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

India Healthcare sector : भारतातील लोकसंख्येचा आढावा घेऊन, आरोग्य सेवेतील वेगवेगळे घटक जोडून, सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या व्यवहारिक आणि जागतिक स्तरावरही प्रेरणादायी
America tariff : काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताच्या अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता 27 ऑगस्ट 2025 पासून
Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ