आयटीआर रिटर्न्सची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

Important Documents for ITR : आयटीआर रिटर्न्स प्रक्रिया करण्यापूर्वी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, गुंतवणूकी संदर्भातले कागदपत्रे, फॉर्म 16 असे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे तुमच्याजवळ उपलब्ध असमं अत्यावश्यक आहे.
[gspeech type=button]

दिनांक 15 जून 2025 पासून बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातून टीडीएस सर्टिफिकेट (फॉर्म 16) मिळालं असणार, तर काहिंना येत्या काही दिवसात मिळणार असेल. टिडीएस सर्टिफिकेट हातात येता बरोबरच तुम्ही नक्कीच आयटीआर रिटर्न्सची प्रक्रिया करायला घाई कराल. पण त्याआधी तुमच्याकडे आणखीन काही कागदपत्रे असणं आवश्यक आहे. पाहुयात ही कागदपत्रे कोणती आहेत. 

योग्य फॉर्मची निवड करणे

आयकर विभागाकडून आयटीआर रिटर्न्स संदर्भात प्रक्रिया सुरु झाली आहे. करदात्यांना आयकर विभागाकडून दिले जाणारे फॉर्म सुद्धा आता उपलब्ध आहेत. करदात्यांच्या मिळकत आणि गुंतवणूकीनुसार आयटीआर रिटर्न्सचे वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्स असतात. यातून आपण योग्य फॉर्मची निवड करणं अत्यावश्यक आहे. जर तुम्ही इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यातून मिळणारं व्याज हे 1.25 लाखापेक्षा कमी असेल आणि या गुंतवणूकीत तुमचं कोणतचं नुकसान झालं नसेल तर तुम्ही नव्या नियमांनुसार आयटीआर -1 म्हणजे ‘सहज’ फॉर्मची निवड करु शकता. 

जर चुकीचा फॉर्म निवडून आयटीआर रिटर्न्सची प्रक्रिया केली तर तुम्हाला त्याचा भुर्दंड बसू शकतो. ही सगळी प्रक्रिया तुम्हाला पुन्हा डिसेंबर महिन्यात करावी लागू शकते. त्यामुळे योग्य फॉर्म निवडण्याची काळजी घ्या. 

अन्य महत्त्वाची कागदपत्रे

  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • बँक टिडीएस सर्टिफिकेट (फॉर्म 16 A – पगाराव्यतिरिक्त पेमेंटवरील टीडीएससाठी
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक्ड असावेत.
  • फॉर्म 26 एएस
  • वार्षिक माहिती पत्र (Annual Information Statement)
  • फॉर्म 16 – टिडीएस सर्टिफिकेट (यामध्ये जर आर्थिक वर्ष 2024 – 2025 मध्ये एकाहून अधिक वेळा नोकरी बदलली असेल तर त्या सगळ्या कंपनीचे फॉर्म 16 सादर करणे अनिर्वाय असतं.)
  • यापूर्वी रिटर्न्स भरले असतील तर ती कागदपत्रे सोबत जोडायची.
  • जर तुम्ही परदेशातून काही उत्पन्न कमावलं असेल तर त्याची माहिती असलेली कागदपत्रे
  • घरभाडे भत्त्यावर जर दावा करायचा असेल तर घरभाडे भरत असल्याचे ॲग्रीमेंट आणि भाडे भरल्याच्या पावत्या.
  • जर परदेशातील बँकेत तुमचं बँक खातं असेल तर त्याचं स्टेटमेंट
  • विदेशी गुंतवणूकीचं विवरण पत्र
  • जर तुम्ही परदेशात एखादी वस्तू खरेदी करुन त्यावर तिथे कर भरला असेल आणि त्या वस्तूवर जर भारताचं दुहेरी कर न आकारण्याचं धोरण असेल तर हा दुहेरी कर टाळण्यासाठी फॉर्म 67 घ्यावा लागतो. 
  • जर अन्य मालमत्तामधून तुमची मिळकत 50 लाखांहून जास्त होत असेल तर तुम्हाला त्या मालमत्तेसंबंधित कागदपत्रं सादर करुन आयटीआर – 2 या फॉर्म अंतर्गत कर भरावा लागतो.
  •  त्याचप्रमाणे, कर सवलतीचे पुरावे सादर करावे लागतात.  
हे ही वाचा : नोकरदार व्यक्ती ‘कर कपात’ पद्धत कशी निवडू शकतो?

यंदाचा आयटीआर रिटर्न्स हा जुन्या कर पद्धतीने भरला जाणार

अर्थसंकल्प 2025 मध्ये केंद्रिय मंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 लाखापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाला कर सवलत दिली आहे. त्यामुळे अनेक नोकरदार नवीन कर पद्धतीचा पर्याय निवडतील. मात्र, आता जो आयटीआर रिटर्न्स भरला जाणार आहे तो आर्थिक वर्ष 2024 – 2025  यावर्षाचा असणार आहे. आणि तो जुन्या कर पद्धतीने घेतला जाणार आहे. 

त्यामुळे कर भरण्यासाठी तुम्ही जरी नवीन पद्धत निवडली असेल तरी तुमच्या ऑफिसकडून ती जुन्या पद्धतीने भरली जाणार असेल तर तुमची एकूण गुंतवणूक, त्यातून मिळणारा नफा, वार्षिक कमाई आणि फॉर्म 16, फॉर्म 26 एएस आणि वार्षिक माहिती पत्रातल्या तपशिलामध्ये तफावत दिसू शकते. त्यामुळे हा सगळा गुंता सोडवण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीसंबंधित कागदपत्रे तुमच्याजवळ असली पाहिजेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ