स्विस नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांनी तिथल्या बँकेत ठेवलेल्या पैशांमध्ये तब्ब्ल तीन पटीने वाढ झाली आहे. भारतीयांनी या बँकेत 3.54 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 37,600 कोटी रुपये ठेवी स्वरुपात ठेवले आहेत. पण भारतीय थेट स्वित्झर्लंडच्या नॅशनल बँकमध्ये पैसे का ठेवतात? चला समजून घेऊया.
स्विस नॅशनल बँक
स्विस नॅशनल बँक ही स्वित्झर्लंडची राष्ट्रीय बँक आहे. जशी आपल्या देसात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दर्जा आणि त्याचे कार्ये आहेत. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये स्विस बँक कार्य करते. देशाचे चलनाविषयाचे धोरण ठरवणे, स्वित्झर्लंडचं चलन फ्रँकची धोरणानुसार निर्मिती करणं ही मुख्य जबाबदारी आहे.
स्विस बँकेतच का पैसे ठेवतात
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर ही बँक कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेप्रमाणेच असेल तर मग श्रीमंत भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतल्या बँकेमध्ये का पैसे ठेवत नाहीत. तर त्याचं उत्तर आहे सुरक्षा.
स्वित्झर्लंड हा भू – राजकीय पातळीवर तटस्थ देश म्हणून ओळखला जातो. देशाअंतर्गत ही शांततेचं वातावरण असतं. तसच जगातल्या कोणत्याही वादामध्ये स्वित्झर्लंडचा सहभाग नसतो. याशिवाय जागतिक पातळीवर चलन संकट जरी आलं तरी स्विस बँकेतला पैसा सुरक्षित असणार याची खात्री गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळे जगभरातले श्रीमंत व्यक्ती आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी स्विस बँकेची निवड करतात.
हे ही वाचा : स्विस बँकेत भारतीयांचे पैसे तिप्पट वाढले!
यामध्ये आणखीन एक कारण आहे ते म्हणजे जगातील श्रीमंताच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवणे. जर तुमचं स्विस बँकेत खातं असेल तर तुम्हाला जगातल्या कोणत्याही देशात गुंतवणूक करणं सोपं जातं. गुंतवणूकीच्या क्षेत्रासंदर्भात असा कोणताही लिखित नियम नाही की तुमचं स्विस बँकेत खातं असलं पाहिजे म्हणून. पण या बँकेत तुमचं खातं असेल तर ते एक प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्यामुळे या बँकेत खातं नसणाऱ्यांना अन्य देशात गुंतवणूक करताना अनेक प्रयत्न करावे लागतात. तुलनेत ज्याचं या बँकेत खातं आहे त्यांना ते सोपं जातं. त्यामुळे स्विस बँकेत खाती असलेल्यांना श्रीमंताचा क्लब असं म्हटलं जातं.
तसच स्वित्झर्लंडच्या या राष्ट्रीय बँकेचे ट्रस्ट संबंधित कायद्यामुळे या बँकेत खाती असणाऱ्यांची संपूर्ण कौटुंबिक मालमत्ता एकत्र ठेवली जाते. तसच ऑफशोर ट्रस्टद्वारे त्या कुटुंबाच्या जगभरात विखुरलेल्या सदस्यांना वारस म्हणून घोषित केलं जाते.
स्विस बँकेत काळा पैसा ठेवला जातो का?
दशकभरापूर्वी स्विस बँकेत भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा साठवल्याच्या चर्चा होत्या. करचुकवेगिरीकरुन हा पैसा स्विस बँकेत ठेवला जातो अशा बातम्या वाचायला मिळाल्या आहेत. त्यामुळे स्विस बँकेतला भारतीयांच्या ठेवींमध्ये तीनपट वाढ झाली म्हणजे एवढा काळा पैसा पुन्हा देशाबाहेर साठवला जातो आहे का हा प्रश्न आपसुकच आपल्याला पडला असेल.
मात्र, स्विस बँकेत ठेवला जाणारा हा पैसा काळा पैसा नसतो याबाबत स्विस बँकेने वारंवार स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसच देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धा स्विस बँकेत ठेवला जाणारा सगळात पैसा हा काळा पैसा नसतो असं म्हटलेलं होतं.
भारतीयांचा हा समज दूर व्हावा, यासाठी स्विस बँकेने कर बुडवणाऱ्यांविरोधात सुरु केलेल्या लढाईला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
या अंतर्गत स्विस बँकने पारदर्शकता आणि वारंवार भारत सरकारला खातेधारकांसंदर्भात माहिती पुरवण्यावर भर दिला आहे.
2018 सालापासून भारतासोबत माहिती देवाण-घेवाण करण्याच्या कराराअंतर्गत, स्विस बँकेकडून भारत सरकारला स्विस बँकेतील भारतीय खातेधाराकांची संपूर्ण माहिती दिली जाते. यामध्ये संशयास्पद खाती, खातेधारकांकडून किती पैसे खात्यात ठेवले जात आहेत, त्यातली नियमीतता, त्यामध्ये काही संशयास्पद आढळलं तर त्याची माहिती भारत सरकारला दिली जाते.