ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक असे आजार हे आता दैनंदिन आजार होत असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. दर दिवशी कोणाही तरुण व्यक्तिचा स्ट्रोकने मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. खूप कमी वेळा स्ट्रोक आलेल्या व्यक्ति उपचाराच्या साहाय्याने वाचतात. तर काही वेळा उपचारांमध्ये यश मिळत नाही.
मात्र, स्टॅडफॉर्ड विद्यापीठातील संशोधकांनी स्ट्रोकवरील नवीन उपचार पद्धत विकसित केली आहे. ज्यामुळे रक्तातील गाठी 90 टक्के काढून रुग्णाला या आजारातून बरं करता येईल. आणि तेही कोणत्याही सर्जरीने नाही तर एका डिव्हाईसने. जाणून घेऊयात हे कोणतं डिव्हाईस आहे आणि कसं काम करते.
मिली-स्पिनर थ्रोम्बेक्टॉमी
मिली-स्पिनर थ्रोम्बेक्टॉमी नावाच्या एक नवीन तंत्राने स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसीय एम्बोलिझम (रक्ताच्या गाठीमुळे फुफ्फुसातल्या रक्तपेशी बंद होतात) यासारख्या रक्तातल्या गाठी मोकळ्या करता येतात. सध्या रक्ताच्या गाठी सोडवण्यासाठी जी उपचार पद्धत वापरली जाते, त्यानं 15 टक्के रुग्णांच्या बाबतीत अपयश येतं. मात्र, मिली-स्पिनर थ्रोम्बेक्टॉमी या डिव्हाईसच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये 90 टक्के यश मिळतं, असा दावा संशोधकांनी केला आहे.
जून महिन्यात प्रकाशित झालेल्या नेचर या मासिकामध्ये संशोधक जेरेमी हीट या डिव्हाईसची माहिती दिली आहे. ते म्हणतात की, आम्ही सध्याच्या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता दुप्पट करत आहोत. सर्वात गुंतागुंत असलेली गाठ सोडवण्यासाठी आता आम्ही या तंत्राचा वापर करत आहोत. यामध्ये आम्हाला 11 टक्के यश मिळत आहे. तर सामान्य रक्ताच्या गाठी या पहिल्याच प्रयत्नात 90 टक्के उघडण्यात यश आलं आहे.
हे ही वाचा : शरीरातील गाठी (ट्यूमर) आणि त्यांची लक्षणे
रक्तातील गाठींच्या गुंतागुंतीचा फायदा घेणे
रक्ताच्या गाठी या फायब्रिनच्या गुंत्यामुळे बनतात. आपल्या शरीरात प्रथिनांसारखे जे धागे असतात ते लाल रक्तपेशींना गुंडाळतात. त्यामुळे अन्य घटकही त्याला चिकटून एक चिकट अशी गाठ तयार होते. ही रक्तगाठ सोडवण्यासाठी डॉक्टर धमनीमध्ये कॅथेटर घालतात किंवा व्हॅक्यूम निर्माण करुन ती गाठ खेचून काढण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत काही वेळेला यशस्वी होते. तर काही वेळेला अयशस्वी होते. या पद्धतीमध्ये जेव्हा डॉक्टर ती गाठ खेचायला लागतात तेव्हा ते धागे तुटू शकतात, कधी ती रक्तगाठ शरीरात फुटू शकते त्याचे भाग शरिरात पसरू शकतात तर काही वेळेला परिस्थिती इतकी बिकट असते की डॉक्टरांना त्या गाठीपर्यंत नीट पोहोचताही येत नाही. त्यामुळे पुढची सगळी प्रक्रिया करणं अवघड जातं.
मात्र, या नवीन तंत्रामध्ये त्या गाठीचा आकार कमी करण्याऐवजी त्या गाठीचे भाग करुन ती बाहेर काढण्यावर भर दिला जातो. मिली-स्पिनर या तंत्राच्या साहाय्याने जी गाठ असते ती आकाराने छोटी करण्यासाठी कॉम्प्रेशन आणि शीअर फोर्स वापरतात. त्यामुळे ती गाठ शरीरात न फुटता बाहेर काढता येते. हे डिव्हाईस त्या गाठीला कॉम्प्रेस करतात आणि एकदम कडक चेंडूसारखं त्याचं रुपांतर करतो. त्यामुळे गाठीला न फोडता शरीराबाहेर काढलं जातं.
हे डिव्हाईस रक्त गाठीला त्याच्या मूळ आकारापेक्षा 5 टक्क्याने कमी करतं. हा आकार कमी झाल्यावर त्या गाठीतल्या लाल रक्तपेशी मोकळ्या होऊन बाहेर पडतात. आणि प्रथिनाची जी फायब्रिन गाठ असते ती शरीराबाहेर काढली जाते.
वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या रक्टगाठी सोडवण्यासाठी या तंत्राचा वापर करता येतो. फायब्रिन स्वरुपातली रक्तगाठ ही आताच्या तंत्राने सोडवता येत नाही. पण मिली-स्पिनरच्या सोप्या तंत्राने तिही सोडवता येऊन रुग्णावर यशस्वी उपचार करता येतात.
मिली स्पीनर कसं विकसीत झालं?
संशोधक झाओ यांच्या मिलीरोबोट्स या प्रकल्पाचं ही पुढची आवृत्ती आहे. म्हणजे झाओ यांनी लहान, ओरिगामी-आधारित रोबोट्स तयार केलेलं. जे शरिरात जाऊन औषधं पोहोजविण्याचं आणि रोगाचं निदान करण्यासाठी वापरलं जाणार होतं. पण या प्रयोगावेळी संशोधकांच्या लक्षात आलं की, हा रोबोट शरीरात गेल्यावर व्हॅक्यूम तयार करतो. त्यामुळे मग याचे इतर काय फायदे होतील यावर ते विचार करु लागले.
संशोधकांनी सांगितलं की, त्यांनी सुरुवातीला रक्तगाठीवर उपचार करण्यासाठी याचा काही उपयोग होईल का हे तपासत होतो. त्यामुळे लगेच रक्तगाठीवर त्याचा प्रयोग केला. तेव्हा त्या गाठीचा रंग हा लाल वरुन पांढरा झाला आणि गाठीचा आकार ही छोटा झाला. हे का आणि कसं झालं हे त्यांना पहिल्यांदा समजलं नाही. त्यांना ही जादूच झाली असं वाटलं.
या परिणामामुळे संशोधकांनी या यंत्रातली तांत्रिक बाजू समजून घेऊ लागले. त्यानंतर त्यांनी मिली स्पिनर आणखीन कार्यक्षमतेने कसं वापरता येईल यावर काम सुरु केलं. आता ते मिली स्पिनरचं असं यंत्र घडवत आहेत, जे रक्तवाहिन्यांमध्ये सहज संचार करु शकेल आणि गाठीला ओळखून ती नाहिशी करु शकेल.
याशिवाय या मिली स्पिनरच्या साहाय्याने किडनी स्टोनचे तुकडे पकडून ते बाहेर काढून टाकता येतील का यावर संशोधन सुरु आहे.
दरम्यान रक्तगाठीवर प्रभावी उपचार करणाऱ्या या डिव्हाईसला लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी आता प्रयत्न सुरु आहेत.