युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) 1ऑगस्टपासून इन्स्टंट पेमेंट सेवेमध्ये अनेक बदल करणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) युपीआय व्यवहारांमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी नवीन नियम लागू करणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही UPI वापरकर्ते असाल तर UPI वापर करण्याच्या या नवीन नियमांची माहिती घेणं गरजेचं आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होणार नसला, तरी ते युपीआय-संबंधित सेवांवर निर्बंध आणणार आहेत.
नवीन नियमांमध्ये बँक बॅलन्स तपासणे, ऑटो पेमेंट करणे, बँक खात्याची माहिती मिळवणे आणि पेमेंटची स्थिती (Status) तपासणे यासारख्या सेवांवर मर्यादा येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटलं आहे की, युपीआयची स्थिरता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी नविन नियम लागू केले जाणार आहेत.
युपीआय वर बँक बॅलन्स तपासण्यावर मर्यादा :
1 ऑगस्टपासून, युपीआय वापरकर्ते प्रत्येक युपीआय अॅपवर दिवसातून फक्त 50 वेळा त्यांचा बँक बॅलन्स तपासू शकतात. या निर्बंधांमुळे NPCI ला गर्दीच्या वेळी अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसेस (API) सिस्टमवरचा दबाव कमी करता येईल.
हे ही वाचा : बेंगळुरूमध्ये छोट्या विक्रेत्यांचे ‘ओन्ली कॅश, नो युपीआय’!
प्रत्येक व्यवहारानंतर शिल्लक दाखवणे :
NPCI ने शिल्लक विनंतीवरील प्रयत्नांची संख्या मर्यादित केली असली तरी, प्रत्येक युपीआय व्यवहारानंतर वापरकर्ते त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम पाहू शकतात.
निश्चित वेळेत ऑटो पेमेंट :
नवीन नियमांमध्ये दैनंदिन युपीआय व्यवहारांवरील भार कमी करण्यासाठी निश्चित वेळेत शेड्यूल केलेले बिल पेमेंट प्रक्रिया करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या पर्यायामुळे वापरकर्त्यांना ऑटो पेमेंट किंवा ओटीटी, ईएमआय किंवा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी दर महिन्याला शेड्यूल केलेले पैसे हे त्या – त्या दिवशी ट्रान्सफर होतील. यासाठी सकाळी 10 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 9.30 नंतर म्हणजे नॉन-ट्रॅफिक वेळे ठरवून दिलेली आहे.
हे ही वाचा : यूपीआय पेमेंट प्रणाली सर्व्हर वारंवार डाऊन का होतो?
बँक खात्याच्या तपशीलांमध्ये प्रवेश करण्यासाठी मर्यादित प्रयत्न :
ऑगस्ट महिन्यापासून, युपीआय वापरकर्ते दिवसातून 25 वेळा मोबाइल नंबरशी जोडलेल्या त्यांच्या बँक खात्यांबद्दल माहिती मिळवू शकतील.
पेमेंट स्टेटस संबंधित :
वापरकर्त्यांना प्रलंबित व्यवहाराची स्थिती फक्त तीन वेळा तपासण्याची परवानगी असेल. तसेच, प्रत्येक प्रयत्नांमध्ये 90 सेकंदांच्या अंतरानंतरच वापरकर्ता व्यवहाराची स्थिती तपासू शकतात.