दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
टिळकांना गणिताची प्रचंड आवड होती आणि त्यांचं खगोलशास्त्राचं ज्ञानही खूप होतं. आपल्याकडे त्यावेळी जवळपास 60 प्रकारची पंचांगं होती, ज्यात तिथी आणि नक्षत्रांच्या गणना वेगवेगळ्या असत. यामुळे खूप गोंधळ व्हायचा.
टिळकांनी यावर उपाय काढायचं ठरवलं. त्यांनी 'दृक्-गणित' म्हणजे, आकाशात जे दिसतं, त्याच गणितावर आधारित पंचांग असावं यावर जोर दिला.
केरुनाना छत्रे आणि आबासाहेब पटवर्धन यांनी पंचांग सुधारण्यासाठी 18 व्या शतकात 'पंचांग शुद्धिकरण मंडळ' स्थापन केले. याच मंडळाने पुढे 'झीटा' किंवा 'रैवत पक्ष' म्हणून काम सुरू केले. पुढे लोकमान्य टिळक या मंडळाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष होते.
टिळकांच्या प्रयत्नांमुळे पंचांगांच्या गणितात एकसारखेपणा आणि अचूकता आली. त्यांनी सुसूत्रता आणलेलं हे पंचांग आजही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वापरलं जातं
टिळकांचं खगोलशास्त्र आणि वेदांचं ज्ञान 'ओरायन' आणि 'आर्क्टिक होम इन वेदाज' या त्यांच्या दोन महत्त्वाच्या ग्रंथांमधून दिसतं
टिळकांची भाषा त्यांच्या स्वभावासारखीच धारदार आणि थेट लोकांच्या मनाला भिडणारी होती. त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांची शीर्षकं पाहिली की याची कल्पना येते.1881 ते 1920 या काळात टिळकांनी सुमारे 513 अग्रलेख लिहिले.
टिळक सुरुवातीला मवाळ गटाशी संबंधित होते, पण इंग्रजांची धोरणे आणि त्यांच्या जुलमी राजवट पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांना कळून चुकले की केवळ अर्ज-विनंत्या करून काहीही साध्य होणार नाही. म्हणूनच ते जहाल मतवादी बनले.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!" हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे आणि जहाल मतवादाचे प्रतीक असलेले वाक्य आहे. त्यांनी इंग्रजांकडून स्वराज्य मागण्याऐवजी, तो आपला हक्क आहे आणि तो मिळवूनच दाखवणार असं ठामपणे सांगितलं