ग्रामपंचायतीचे आदर्श कार्यालय | Citizen-First Panchayat Model – किसळ पारगाव, ठाणे गावाचं ‘पहिलं प्रशासनिक दालन’ म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय. इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहज, सन्मानपूर्वक आणि वेगवान सेवा मिळणं गरजेचं. ठाणे जिल्ह्यातील किसळ पारगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीत आम्ही पाहिलं—नागरिकांना माहिती त्वरित दिसेल अशा पद्धतीची मांडणी, स्वच्छ व सुबक परिसर, स्पष्ट दिशादर्शक (signage), citizen charter, दरपत्रक/कर माहिती, योजनांची याद्या, Gram Sabha schedule, तक्रार नोंदवही व संपर्क क्रमांक यांसारखी नागरिक केंद्रित मांडणी.
या व्हिडिओत आपण ‘आदर्श’ ग्रामपंचायत कार्यालयाची गरज आणि अपेक्षित घटक समजून घेऊ:
– पारदर्शकता: नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट यादी, शुल्क व वेळा
– प्रवेशयोग्यता: दिव्यांग अनुकूल रॅम्प/बसायची सोय, स्वच्छ शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय
– माहितीप्रद प्रदर्शन: महत्त्वाच्या शासन योजना, कर/जन्म-मृत्यू नोंदणी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन
– डिजिटल सुविधा: e-Governance संदर्भ (eGramSwaraj, online applications), QR/helpline माहिती
– सुशासन: कामकाज वेळापत्रक, जबाबदार अधिकारी व तक्रार निवारण प्रक्रिया