दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा
महाराष्ट्रात श्रावण अमावस्येला पोळा किंवा बेंदूर साजरा केला जातो. शेतकऱ्याचा मित्र बैलाशिवाय शेतीतील कोणतीच कामं पूर्वी शक्य नव्हती. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
घरातील बैलांचे खांदे आदल्या दिवशी तेल लावून चोळले जातात. खांद्यांना गरम पाण्यानं शेक दिला जातो. आणि मग गरम पाण्यानं आंघोळ घालतात. आंघोळ झाली की बैलांची शिंग रंगवतात.
पोळ्याच्या दिवशी सकाळीच गाई-बैलांना आंघोळ घालतात. बैलांच्या अंगावर झूल लावली जाते. डोक्याला बाशिंग बांधून त्यांच्या अंगावर हळदीची बोटं उमटवली जातात. नवीन वेसण आणि गळ्यात माळ घालून त्यांना छान सजवण्यात येतं.
घरात दोन मातीचे लहान बैल तयार करतात. या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. घरच्या बैलांची साग्रसंगीत आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घालतात.
पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपत नाहीत. गावात त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात. काही गावांमध्ये कर ओलांडतात तर काही ठिकाणी बैलांच्या शर्यती आयोजित करतात.