कर्नाटकातील काँग्रेस आमदारास सट्टेबाजी प्रकरणात ईडीकडून अटक

कर्नाटकातील चित्रदुर्गमधील काँग्रेस आमदाराला ईडीने सिक्किममधून शुक्रवारी अटक केली. ईडीने या आमदाराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड टाकून 12 कोटी रुपये रोख जप्त केले. यात 1 कोटी रुपये परकीय चलन, 100 अमेरिकन डॉलर्स, 10 व 20 ब्रिटिश पौंड, 500 दिरहम, 100 व 50 युरोच्या चलनी नोटांचे बंडल यांचा समावेश आहे.
[gspeech type=button]

चित्रदुर्गचे आमदार के. सी. वीरेंद्र उर्फ पपी यांना सिक्कीममधील गंगटोक इथे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. वीरेंद्र यांना लगेचच स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. तपासयंत्रणेनं ट्रान्झिट रिमांड मिळवला आहे आणि पुढील चौकशीसाठी वीरेंद्र यांना बेंगळुरूला आणले जाईल.

 

ईडीने शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी गंगटोक, चित्रदुर्ग जिल्हा, बेंगळुरू शहर, हुबळी, जोधपूर आणि मुंबईसह भारतातील विविध 31 ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले.

 

गोव्यात, पपीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपीज कॅसिनो प्राइड, ओशन 7 कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनोवर छापे टाकण्यात आले.

 

 

ईडीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आरोपी किंग567, राजा567 या नावाने अनेक ऑनलाइन बेटिंग साइट्स चालवत आहे. शिवाय, आरोपीचा भाऊ केसी थिप्पेस्वामी हा दुबईतून गेमिंग व्यवसायाशी डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नोलॉजी आणि प्राइम 9टेक्नॉलॉजीज या तीन व्यवसायिक संस्था चालवत आहे. थिप्पेस्वामी हा के.सी. वीरेंद्र पपी यांच्या कॉल सेंटर सेवाही चालवत असल्याचं उघड झालं”.

 

विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या या धाडीत 12 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. यात 1 कोटी रुपये परकीय चलन, 100 अमेरिकन डॉलर्स, 10 व 20 ब्रिटिश पौंड, 500 दिरहम, 100 व 50 युरोच्या चलनी नोटांचे बंडल यांचा समावेश आहे. या नोटांव्यतिरिक्त, ईडीच्या तपास अधिकाऱ्यांनी 6 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सुमारे 10 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार चार वाहने देखील जप्त करण्यात आली.

 

 

“याशिवाय, 17 बँक खाती आणि दोन बँक लॉकर देखील गोठवण्यात आले. भाऊ केसी नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन राज यांच्या घरातूनही मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणांहून अनेक गुन्हेगारी कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली.”

 

वीरेंद्र यांचे इतर सहकारी, भाऊ केसी थिप्पेस्वामी आणि पृथ्वी एन राज हे दुबईहून ऑनलाइन गेमिंगचे कामकाज हाताळत आहेत. केसी वीरेंद्र हे त्यांच्या सहकाऱ्यांसह कॅसिनो भाड्याने घेण्यासाठी जमीन पाहायला व्यावसायिक भेटीवर बागडोगरा मार्गे गंगटोकला गेले होते, असे ईडीने म्हटले आहे.

 

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार रोख रक्कम आणि इतर निधीशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे.  याबाबत पुढील तपास सुरू आहे.

 

 

केसी वीरेंद्र पपी कोण आहे?

केसी वीरेंद्र पप्पी यांचा जन्म 1975 मध्ये झाला. काँग्रेस आमदाराने 1999 मध्ये एचपीपीसी सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालयातून बी.कॉम. पदवी पूर्ण केली. पप्पी हे चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जी. एच. थिप्पारेड्डी यांचा 50 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ