घरात कायमस्वरूपी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करताना काय काळजी घ्यावी?

Ganeshotsav : गणपती बाप्पा विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारा, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातो. घराचं रक्षण करण्यासाठी, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी घराच्या, कार्यालयाच्या मुख्य दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याची पद्धत आहे. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची कोणत्या प्रकारची, रंगाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची हे आपण जाणून घेऊयात.
[gspeech type=button]

गणपती बाप्पा विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारा, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातो. घराचं रक्षण करण्यासाठी, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी घराच्या, कार्यालयाच्या मुख्य दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याची पद्धत आहे.  वास्तुशास्त्रानुसार गणपतीची कोणत्या प्रकारची, रंगाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची हे आपण जाणून घेऊयात. 

गृहप्रवेशासाठी कोणती गणेशमूर्ती चांगली असते?

नव्या वास्तूमध्ये प्रवेश करताना दृष्टी गणेशाची मूर्ती घराच्या प्रवेशद्वारावर ठेवणं चांगलं असतं.  दृष्टी गणेशाची मूर्ती ही दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा टाळण्यास मदत करते. तर सकारात्मकता आणि समृद्धीला आकर्षित करते.  दृष्टी गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या भिंतीवर असली पाहिजे. तिथे तुम्ही गणपतीच्या मूर्तीची जोडी ही ठेवू शकता.  प्रवेशद्वाराच्या पुढच्या भिंतीवर बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा लावत असताना देवतेची पाठ घराच्या आत नसावी याची काळजी घ्यावी. कारण आख्यायिकेनुसार, गणेश आपल्या पाठीवर गरिबीचे भार वाहतो. तेव्हा बाप्पाची पाठ घराच्या आतल्या भागात असेल तर ते नकारात्मक होईल. त्यामुळे जिथे मूर्ती ठेवली आहे तिथे मागच्या बाजूने घर पूर्ण दिसत असेल तर त्याच मूर्तीला लागून घराच्या आतल्या दिशेने पाहणारी आणखीन एक बाप्पाची मूर्ती स्थापन करावी.  

बाप्पाची मूर्ती कुठे ठेवावी ?

गणपती बाप्पाची मूर्ती उंच प्लॅटफॉर्मवर आपल्या डोळ्याच्या समकक्षेत ठेवावी. 

घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना योग्य पूजा विधी करावी. घरात एखाद्या शोपीस सारखी बाप्पाची मूर्ती ठेवू नये. त्यातली आध्यात्मिकता जपावी. श्रद्धेच्या भावनेने आणि सकारात्मक वृत्तीने मूर्ती ठेवा.

गणेशमूर्तीच्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ आणि गोंधळमुक्त ठेवा.

गणेशमूर्तीजवळ फुले ठेवा, उदबत्ती, दिवा लावा.

 गणेशमूर्ती कुठे ठेवू नये ?

गणपती बाप्पाची मूर्ती ही जिन्याखाली, स्टोअर रूम किंवा गॅरेजसारख्या मोकळ्या जागेत ठेवू नये.  त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जो निर्माण होऊ शकते. तसेच बेडरुमध्ये, वॉशरूममध्ये किंवा बाथरूमच्या समोर ठेवू नयेत. बाप्पाची मूर्ती ही सकारात्मक मनाने जिथे घरात प्रसन्नपूर्ण भाग असेल अशा ठिकाणी विशेष जागा तयार करुन प्रतिष्ठापना करावी. 

घरात किती गणेशमूर्ती ठेवाव्यात?

घरात फक्त एकच गणेशमूर्ती ठेवावी. एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवल्यास सकारात्मक उर्जा कमी होते. यामुळे गणपतीच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धीच्या समतोलावर परिणाम होऊ शकतो आणि घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं.

घरातली गणेशमूर्ती कोणत्या रंगांची घ्यावी?

गणपती बाप्पाच्या कृपेमुळे घरात अनेक बदल घडतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य करते असं म्हटलं जातं. त्यामुळे घरात शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी पांढऱ्या रंगाची मूर्ती ठेवणं चांगलं असते. स्वत:चा विकास होण्यासाठी सिंदूर रंगांची, शुभ घडण्यासाठी सोनेरी, शुद्धता आणि ज्ञानासाठी पिवळ्या किंवा नारिंगी रंगाची मूर्ती, संरक्षणासाठी हिरव्या रंगाची तर सुसंवाद आणि शांतता राहण्यासाठी निळ्या रंगांची मूर्ती घरात असणं चांगलं मानलं जातं.  

गणपती बाप्पाची मूर्ती निवडताना कोणती काळजी घ्यावी?

घरात गणेशमूर्ती घेताना गणेशाची मुद्रा, सोंडेची दिशा, मूर्तीचा रंग, अन्य घटक आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यामागचा उद्देश काय आहे हे पहिलं ठरवणं गरजेचं असतं. 

गणपतीची मुद्रा

घरी गणेशमूर्ती आणताना त्याची मुद्रा योग्य पद्धतीने निवडणं गरजेचं आहे.  ललितासन म्हणजे बसलेल्या स्थितीतील गणेश हा सगळ्यात चांगला मानला जातो. या मूर्तीतून शांतता आणि स्थैर्य प्रतिबिंबीत होते. विराजमान स्थितीतील गणेश मूर्ती किंवा फोटो खूप शुभ मानले जातात, कारण ते आराम, संपन्नता, आणि विलासाचे प्रतीक असतात.

नृत्य करणारा गणपती सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असल्याने तो सजावटीसाठी ठेवला जातो. अशी मूर्ती पूजेसाठी ठेवू नये.

हातात मोदक असलेला गणपती लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, कारण मोदक आनंद आणि समाधानाचे प्रतीक आहे.

बाप्पाच्या सोंडेची दिशा

डावीकडे झुकलेली सोंड असलेली गणेशमूर्ती वास्तूनुसार शुभ मानली जाते. कारण ती यश आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. उजवीकडे झुकलेली सोंड कठोरता आणि शिस्त दर्शवते. त्यामुळे अशा मूर्तींची पूजा करण्यासाठी विशेष नियम पाळावे लागतात. गणेशाचे दुर्मिळ रूप म्हणजे सरळ किंवा वर जाणारी सोंड, जी शक्ती आणि उन्नतीचे प्रतीक मानली जाते.

पूजा खोलीसाठी गणेशमूर्तीची सोंड

पूजा खोलीसाठी डावीकडे झुकलेली सोंड असलेली गणेशमूर्ती निवडणं चांगलं असते. कारण ती समाधान आणि विजयाचं प्रतीक आहे. गणेशमूर्ती ठेवताना योग्य पूजा विधी करुन ती ईशान्य कोपऱ्यात ठेवायची असते.गणपतीची मूर्ती किंवा फोटो कधीही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नये. 

मोदक आणि उंदीर

गणेशमूर्तीमध्ये मोदक आणि उंदीर असणं महत्त्वाचं आहे. उंदीर हे गणपतीचं वाहन मानलं जातं, तर मोदक त्याचा आवडता गोड पदार्थ आहे. या दोन घटकांसह असलेली मूर्ती घराच्या प्रवेशासाठी शुभ मानली जाते.

उंदीर आपल्या मनाच्या आणि भौतिक इच्छांचं प्रतीक आहे. जरी तो लहान असला तरी त्याच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे मोठी हानी करू शकतो. याचा संदेश असा आहे की आपल्यातील ‘इच्छांचा उंदीर’ आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा तो आपल्यातील चांगुलपणा नष्ट करू शकतो.

उंदीर हा अज्ञान कापून टाकणाऱ्या मंत्राचा प्रतीक मानला जातो, जो सत्य आणि ज्ञानाकडे नेतो.

तर हातातील मोदक हे ऐश्वर्य, समृद्धी, आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे.

घरासाठी गणेशमूर्ती निवडताना या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण त्या फक्त सौंदर्यासाठी नसून त्यामागे विशिष्ट अर्थ ही आहे.

संपत्ती वाढवण्यासाठी गणेशमूर्ती

गणेश रिद्धी आणि सिद्धी असलेली किंवा चित्रित शुभ महिला. रिद्धी संपत्तीचे, तर सिद्धी बुद्धीची प्रतीक आहे. संपत्ती, समृद्धी आणि बुद्धीमत्तेसाठी अशी मूर्ती घरात आणणे उत्तम आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Ganeshotsav : गणपतीला दुर्वांचाच हार का घालतात, सिंहही गणपतीचं वाहन आहे पण मग उंदीरचं का सतत दाखवला जातो? जास्वंदाचं फूलचं
Ganeshotsav : गणेश चतुर्थी म्हटलं की, सर्वात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य 'मोदक'. या दिवसांत घराघरांतून
Ganeshotsav : आध्यात्मिक मार्गदर्शन, सांस्कृतीक प्रतीक किंवा आनंददायी काहीही म्हणा, गणपती हा कालातीत आणि सार्वत्रिक आहे. विघ्नहर्ता म्हणजेच वाटेतल्या सर्व

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ