बंगालचा गणेश: शेताचा राखणदार आणि कलेचा सोबती

Ganeshotsav : बंगालमधील लोककथांमध्ये गणपती केवळ शिव आणि पार्वतीचा लाडका पुत्र नसून, तो शेती आणि कला परंपरांचा संरक्षकही आहे. तिथे गणपती बाप्पाला केवळ घरातील पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यासाठीच पुजले जात नाही. तर त्याचा संबंध प्राचीन काळापासून 'राखणदार' म्हणजेच शेती आणि गावाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या देवतेशीही जोडला गेला आहे. त्यामुळेच बंगालमध्ये गणपतीची मूर्ती फक्त घरांमध्येच नव्हे, तर शेतांच्या जवळही स्थापित केलेली दिसते.
[gspeech type=button]

आपल्या भारतात हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला विघ्नहर्ता, बुद्धीचा देवता आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणारा देव असं मानले जाते. संपूर्ण देशभरात गणपतीची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, बंगालमध्ये गणपतीची ओळख थोडी वेगळी आहे? तिथे तो फक्त देवघरातला देव नाही, तर शेताचा आणि घराचा राखणदार म्हणूनही ओळखला जातो.

बंगालमधील लोककथांमध्ये गणपती केवळ शिव आणि पार्वतीचा लाडका पुत्र नसून, तो शेती आणि कला परंपरांचा संरक्षकही आहे. तिथे गणपती बाप्पाला केवळ घरातील पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यासाठीच पुजले जात नाही. तर त्याचा संबंध प्राचीन काळापासून ‘राखणदार’ म्हणजेच शेती आणि गावाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या देवतेशीही जोडला गेला आहे. त्यामुळेच बंगालमध्ये गणपतीची मूर्ती फक्त घरांमध्येच नव्हे, तर शेतांच्या जवळही स्थापित केलेली दिसते.

शेतीचा राखणदार: क्षेत्रपाल गणेश

ग्रामीण बंगालमध्ये, शेताच्या सीमेवर ‘क्षेत्रपाल’ नावाची एक संरक्षक देवता असायची. ही देवता गावाच्या आणि शेतीवाडीच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायची. ती गावकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. शेतकऱ्यांचा असा विश्वास होता की क्षेत्रपाल त्यांच्या पिकांचे जंगली जनावरांपासून, रोगांपासून आणि इतर संकटांपासून रक्षण करतो.

गेल्या अनेक शतकांपासून गणपतीने या संरक्षक देवतेची जागा घेतली. ‘गणपती’ हे समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक असल्यामुळे, तो नैसर्गिकरित्या बंगालमधील शेतांचा आणि घरांचा रक्षक झाला. यामुळेच, बंगालमध्ये गणपतीला विघ्नहर्ता म्हणून नाही, तर शेतीचा आणि शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही पूजले जाते. भातशेती करण्याआधी किंवा कोणतंही नवीन काम सुरू करण्याआधी गणपतीचे स्मरण केले जाते. या भूमिकेमुळे, गणपतीला बंगालच्या संस्कृतीमध्ये ‘क्षेत्रपाल’ प्रमाणेच खास स्थान मिळालं आहे.

लोककथांमध्ये गणपतीला केवळ शिव-पार्वतीचा प्रिय पुत्र म्हणून नव्हे, तर शेतांचा रक्षक म्हणूनही पाहिले जाते. ही परंपरा बंगालमधील लोकांचे निसर्गाशी असलेले नाते आणि त्यांच्या जीवनाशी देवाला जोडण्याची अनोखी कला दर्शवते.

कलाकृतींमध्ये गणपतीचे अनोखे रूप

बंगालच्या या खास गणपतीचे दर्शन आपल्याला तिथल्या लोककलांमध्येही दिसते. ‘पट्टचित्र’ ही एक खास चित्रकला आहे. बिरभूम, मेदिनीपूर आणि बांकुरा जिल्ह्यांमधील पटुआ समुदायाचे कलाकार ही चित्रे तयार करतात. पट्टचित्र बनवणारे कलाकार, गाणी गात ही चित्रे सादर करतात. या चित्रांमध्ये गणपतीला स्थानिक चिन्हांसोबत दर्शवले जाते, जसे की नाग, जीवनवृक्ष किंवा शेतीशी संबंधित चिन्हे. यामुळे गणपतीचा संबंध क्षेत्रपालाशी जोडलेला दिसून येतो.

शहरांमधील गणेशोत्सवातील चकचकीत मूर्तींपेक्षा या कलाकृतींमधील गणपतीचे रूप वेगळे आहे. पट्टचित्रामध्ये गणपती कधी साध्या कमळावर बसलेला दिसतो, तर कधी इतर देवी-देवतांसोबत उभा असतो. त्याच्या गोल पोटावर खास नक्षीकाम असतं आणि त्याच्या हातात नेहमीच्या मोदकासोबत शेतीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूही दिसतात.

पट्टचित्रांव्यतिरिक्त, गणपतीचे हे रूप बिष्णुपूरच्या टेराकोटा कलाकृती, कृष्णनगरच्या मातीच्या मूर्ती आणि बंगाली घरांमध्ये लक्ष्मी-गणेश पूजेच्या वेळी काढल्या जाणाऱ्या रांगोळी मध्येही दिसून येते. गणपती बाप्पाला वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि प्रदेशांमध्ये विविध रूपांत पुजले जाते.

शहरात आपण गणपतीची मूर्ती पाहतो ती वेगळी असते. पण पट्टचित्रांमध्ये गणपती खूप वेगळा आणि मातीशी जोडलेला दिसतो. तो कधी साध्या कमळाच्या फुलावर बसलेला असतो, तर कधी इतर देवी-देवतांसोबत उभा असतो.

बंगालमध्ये अजूनही जुनी परंपरा जिवंत

आज जरी बंगालमध्ये शहरी भागात गणपती अखिल भारतीय पद्धतीने साजरे केले जात असले, तरी ग्रामीण भागात अजूनही त्याची क्षेत्रपालाशी असलेली लोककथांची नाळ जपली जाते. पटुआ लोकांच्या गाण्यांमध्ये आणि चित्रांमध्ये, कारागिरांच्या मातीच्या आणि टेराकोटाच्या कलाकृतींमध्ये. तसंच , घरांच्या जमिनीवर काढलेल्या रांगोळ्यांमध्ये, गणपती बाप्पा आजही मर्यादा आणि रक्षक म्हणून जिवंत आहे.

बंगालमधील गणपतीची गोष्ट फक्त बुद्धी आणि चांगल्या कामाची सुरुवात एवढीच नाही, तर ती मातीशी, शेतीशी आणि लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Ganeshotsav : उत्तर आंध्र प्रदेशातील, विशेषतः श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावातील गणेश पूजेचा प्राचीन इतिहास आपण जाणुन घेणार आहोत. इथे एकेकाळी
शतकानुशतकं इंडोनेशियात गणपतीची पूजा केली जाते. 1998 मध्ये तर इथल्या वीस हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचं चित्र छापण्यात आलं. जावामधल्या दिआंग
काही जणांकडे केवळ एकच गौर असते. तर काहींकडे ज्येष्ठा, कनिष्ठा अशा दोघी बहिणी येतात. तर काहींकडे त्यांची बाळंपण सोबत असतात.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ