उत्तर आंध्र प्रदेशातील गणेश पूजा: प्राचीन कलिंगचा वारसा

Ganeshotsav : उत्तर आंध्र प्रदेशातील, विशेषतः श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावातील गणेश पूजेचा प्राचीन इतिहास आपण जाणुन घेणार आहोत. इथे एकेकाळी कलिंग साम्राज्याची राजधानी होती. हजारो वर्षांपासून इथे बाप्पाची पूजा भक्तिभावाने केली जाते. ही परंपरा आजच्या मंदिरांना दोन हजार वर्षांहून अधिक जुन्या आध्यात्मिक वारशाशी जोडते.
[gspeech type=button]

देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह आहे. घरोघरी, सार्वजनिक मंडळात बाप्पा विराजमान झाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की गणपतीची पूजा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर अन्य राज्यातही हजारो वर्षांपासून होत असते. विशेषतः उत्तर आंध्र प्रदेशात, जिथे एकेकाळी प्राचीन कलिंग साम्राज्य होतं, तिथे गणपतीच्या पूजेची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जाते.

याच उत्तर आंध्र प्रदेशातील, विशेषतः श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावातील गणेश पूजेचा प्राचीन इतिहास आपण जाणुन घेणार आहोत. इथे एकेकाळी कलिंग साम्राज्याची राजधानी होती. हजारो वर्षांपासून इथे बाप्पाची पूजा भक्तिभावाने केली जाते. ही परंपरा आजच्या मंदिरांना दोन हजार वर्षांहून अधिक जुन्या आध्यात्मिक वारशाशी जोडते.

इतिहासाशी जोडणारा वारसा

गणपतीच्या पूजेची सुरुवात ही कलिंगचा प्रसिद्ध राजा खारवेल याच्या काळापासून सुरू झाल्याची माहिती इतिहासकार सांगतात. हा काळ म्हणजे साधारण इसवी सन पूर्व पहिले शतक. शिलालेखतज्ज्ञ बिष्णू मोहन अधिकारी यांच्या मते, कलिंगच्या खडकांमध्ये कोरलेल्या गुहांमध्ये गणपतीची चित्रे सापडली आहेत. या चित्रांवरून असे दिसते की, अडथळे दूर करणारा आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी ज्याची सर्वप्रथम पूजा केली जाते, त्या गजमुखाची पूजा तेव्हापासूनच केली जात आहे.

माठर आणि पूर्व गंगा राजघराण्यांचा हातभार

इसवी सन चौथ्या ते सहाव्या शतकात, माठर राजघराण्याने गणपती पूजेची ही परंपरा पुढे वाढवली. या राजघराण्याने आजच्या श्रीकाकुलमपासून पिठापुरमपर्यंत राज्य केलं. आजही महेंद्रगिरीच्या जवळ असलेल्या मंदसा (श्रीकाकुलम) भागात माठर काळातल्या गणपतीच्या अनेक मूर्ती सापडतात. या मूर्ती परंपरेच्या वाढीची साक्ष देतात.

त्यानंतर, सहाव्या शतकात जेव्हा पूर्व गंगा राजघराणे सत्तेत आले, तेव्हा गणपतीची पूजा आणखी मोठ्या उत्साहात होऊ लागली. त्यांनी आपली राजधानी कलिंगनगर इथे अनेक मंदिरे बांधली. या मंदिरांमध्ये गणपतीला महत्त्वाचे स्थान मिळाले.

श्रीमुखलिंगमची गणपती मंदिरे

श्रीमुखलिंगममध्ये असलेल्या मधुकेश्वर मंदिरांचा समूह विशेष महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला आजही सिद्ध विनायक, नृत्य गणेश आणि वरद गणेश यांच्या वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतात. या प्रत्येक मूर्तीची स्वतःची अशी खास ओळख आहे.

या परंपरेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, आठव्या शतकात बांधलेले दंडी गणपतीचे मंदिर. हे मंदिर खखरा कलिंग स्थापत्यशैलीमध्ये निर्माण केलं आहे. ही शैली खूप दुर्मिळ मानली जाते. त्याचप्रमाणे, मधुकेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील सीमेवर गणपतीसाठी एक लहान देऊळ आहे. हे देऊळ पिधा देऊळ शैलीमध्ये आहे. ही सर्व मंदिरे गणपतीच्या सन्मानाचे महत्त्वाचे प्रतीकं आहेत.

याच ठिकाणी, वराही दुर्गा मंदिरात असलेल्या सप्तमातृका शिल्पांमध्ये गणपतीची मूर्ती दिसते. यामुळे हे कळते की शाक्त परंपरेतही गणपतीला संरक्षक देव म्हणून महत्त्वाचे स्थान होते.

मुखलिंगमच्या पलीकडेही गणपतीची परंपरा

गणपतीची ही परंपरा फक्त मुखलिंगमपुरती मर्यादित नाही. ती श्रीकाकुलमच्या इतरही अनेक मंदिरांमध्ये पसरलेली आहे. वैद्यनाथ, पोटेश्वर, सोमेश्वर, आणि भीमेस्वर यासारख्या जुन्या मंदिरांमध्येही गणपतीच्या मूर्ती ‘पार्श्व देवता’ म्हणून पाहायला मिळतात.

अशीच परंपरा पार्वतीपुरम आणि विजयनगरम जिल्ह्यांमध्येही दिसून येते. इथल्या अनेक मंदिरांमध्ये कलिंग शैलीतल्या गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या परंपरेची हीच सातत्यता आपल्याला शेजारच्या ओडिशामधील पुरीमध्येही दिसते. तिथे वार्षिक पूजेसाठी ज्या मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात, त्या मूर्ती उत्तर आंध्र प्रदेशातील प्राचीन मंदिरांमधील मूर्तींसारख्याच दिसतात.

जेव्हा पूर्व गंगा राजांनी आपली राजधानी कलिंगनगरमधून कटक इथे हलवली, तेव्हा ते आपल्यासोबत या धार्मिक आणि कलात्मक परंपराही घेऊन गेले. त्यांच्या धार्मिक आणि कलात्मक परंपरा त्यांनी जपल्या.

वैष्णव मंदिरांमध्येही गणपतीला स्थान

श्रीकूर्मा आणि सिंहाचलमसारख्या प्रसिद्ध वैष्णव मंदिरांमध्येही गणपतीला स्थान मिळाले आहे. सिंहाचलम येथील वराह लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या बेडा मंडपात एक सुंदर, कोरलेली, कलिंग शैलीतील गणपतीची मूर्ती आहे.

यावरून हे स्पष्ट होतं की, गणपतीची पूजा फक्त एका विशिष्ट पंथापुरती मर्यादित नव्हती, तर ती सर्व पंथांमध्ये सामावली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

शतकानुशतकं इंडोनेशियात गणपतीची पूजा केली जाते. 1998 मध्ये तर इथल्या वीस हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचं चित्र छापण्यात आलं. जावामधल्या दिआंग
काही जणांकडे केवळ एकच गौर असते. तर काहींकडे ज्येष्ठा, कनिष्ठा अशा दोघी बहिणी येतात. तर काहींकडे त्यांची बाळंपण सोबत असतात.
Ganeshotsav : बंगालमधील लोककथांमध्ये गणपती केवळ शिव आणि पार्वतीचा लाडका पुत्र नसून, तो शेती आणि कला परंपरांचा संरक्षकही आहे. तिथे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ