स्त्रियांना ऑफिसमध्ये जास्त थंडी का वाजते?

air-conditioned : बाहेर जरी कितीही ऊन आणि गरम होतं असलं तरी, बऱ्याचदा आपण पाहतो की ऑफिसमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते. घरातही तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा अनुभव आला असेल.
[gspeech type=button]

तुम्ही कधी ऑफिसमध्ये स्वेटर किंवा शाल घेऊन बसल्या आहात का? बाहेर जरी कितीही ऊन आणि गरम होतं असलं तरी, बऱ्याचदा आपण पाहतो की ऑफिसमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते. घरातही तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा अनुभव आला असेल. उन्हाळ्यातही ऑफिसमधल्या एसीचा थंड वारा महिलांसाठी एक मोठी समस्या बनतो. पण असं का होतं? तर, यामागे फक्त “थंड किंवा गरम वाटणं” हे कारण नसून, एक वैज्ञानिक आणि ऐतिहासिक कारण आहे.

आता ज्या तापमानावर एसी चालवला जातो, ते तापमान अनेक वर्षांपूर्वी ठरवलं गेलं होतं. त्यावेळी हे तापमान ठरवताना एका सरासरी पुरुषाचा विचार केला गेला. म्हणजे, साधारण 40 वर्ष वय आणि 70 किलो वजन असलेल्या पुरुषाच्या शरीरातून किती उष्णता बाहेर पडते, याचा अभ्यास करून हे तापमान निश्चित केलं गेलं. पुरुषांना आराम वाटेल असं तापमान ठरवण्यात आलं.

पण मग महिलांचं काय?

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा चयापचय (मेटाबॉलिझम) दर जवळपास 35% कमी असतो. मेटाबॉलिझम म्हणजे शरीरात ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत शरीरात उष्णताही तयार होते. महिलांचा मेटाबॉलिझम दर कमी असल्याने त्यांच्या शरीरात उष्णताही कमी तयार होते. त्यामुळे, पुरुषांसाठी 22°C तापमान चांगले असलं, तरी महिलांना ते खूप थंड वाटू शकतं. एका संशोधनानुसार, महिलांना आराम वाटण्यासाठी ऑफिसचं तापमान पुरुषांपेक्षा 5°C जास्त असावं लागतं.

थंडीमुळे कामावर होणारा परिणाम

एसीमुळे लागणारी थंडीचा कामावरही परिणाम होतो. खूप थंड वातावरणामुळे महिलांची काम करण्याची क्षमता कमी होते. त्यांना लवकर थकवा येतो आणि अंग आखडल्यासारखं वाटतं. काही संशोधनातून असंही समोर आलंय की थंड वातावरणामुळे महिलांची काम करण्याची उत्पादकता (productivity) घटते.

भारतात आणि जपानमध्ये सुरू असलेले उपाय

या समस्येवर आपल्या भारतातही विचार सुरू झाला आहे. भारत सरकारने लोकांना आराम मिळावा आणि ऊर्जा वाचवता यावी म्हणून एसीचं तापमान 24°C ते 25°C ठेवावं, असा सल्ला दिला आहे. 1 जानेवारी 2025 पासून जे नवीन एसी बाजारात आले आहेत, ते ‘बीईई स्टार लेबलिंग’ सोबत येतात. आणि त्यांचं डीफॉल्ट तापमान 24°C असतं.

शाळेत तुम्ही वाचलं असेलच की आपल्या शरीराचं सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असतं. पण जेव्हा आपल्याला गरम होतं, तेव्हा आपल्या त्वचेतील रक्तवाहिन्या उष्णता बाहेर टाकण्यासाठी पसरतात आणि आपल्याला घाम येतो. या उलट, जेव्हा आपल्याला थंड वाटतं, तेव्हा उष्णता वाचवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि शरीर गरम राहावं म्हणून आपले स्नायू थरथरतात.

महिलांना जास्त थंडी जाणवण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीरातील कमी असलेला मेटाबॉलिझम रेट. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात स्नायूंचं प्रमाण कमी असतं आणि मेटाबॉलिझम रेटही कमी असतो, त्यामुळे त्यांच्या शरीरात उष्णता कमी निर्माण होते. म्हणूनच त्यांना थंडी जास्त जाणवते.

योग्य तापमान किती असावं?

तज्ज्ञांच्या मते, ऑफिसचं तापमान 25°C च्या आसपास असेल तर सगळ्यांनाच काम करायला सोयीचं होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ