मोबाईलच्या अतिवापरामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम

Infertility due to extreme mobile use : आपण सगळेच मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. उठता-बसता, चालता-फिरता तो आपल्यासोबत असतो. बऱ्याचदा आपण तो पॅन्टच्या खिशात ठेवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः तुमच्या प्रजनन क्षमतेसाठी धोकादायक असू शकते? संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की मोबाईल फोनमधून निघणारी उष्णता आणि रेडिएशन तुमच्या शुक्राणूंना (sperm) हळूहळू नुकसान पोहोचवू शकतात.
[gspeech type=button]

आपण सगळेच मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. उठता-बसता, चालता-फिरता तो आपल्यासोबत असतो. बऱ्याचदा आपण तो पॅन्टच्या खिशात ठेवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः तुमच्या प्रजनन क्षमतेसाठी धोकादायक असू शकते?

अनेकजण या विषयाकडे  गांभीर्याने पाहत नाहीत. पण अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की मोबाईल फोनमधून निघणारी उष्णता आणि रेडिएशन तुमच्या शुक्राणूंना (sperm) हळूहळू नुकसान पोहोचवू शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

उष्णता की रेडिएशन: कशाचा धोका जास्त?

मोबाईलचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो, तर याला दोन्ह गोष्टी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. जेव्हा तुम्ही मोबाईल जास्त वेळ वापरता किंवा तो पॅन्टच्या खिशात ठेवता, तेव्हा तो गरम होतो. ही उष्णता तुमच्या अंडकोषांचे (testes) तापमान वाढवते. आपल्या शरीरात शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असते. हे तापमान शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा थोडे कमी असावे लागते. मोबाईलमुळे जेव्हा अंडकोषांचे तापमान वाढते, तेव्हा शुक्राणूंची निर्मिती आणि त्यांची गुणवत्ता दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतो.  जास्त तापमान शुक्राणूंच्या निर्मितीसाठी चांगलं नसतं. याला ‘थर्मल इफेक्ट’ (Thermal effect) म्हणतात.

रेडिएशनचा धोका

मोबाईल फोनमधून अदृश्य लहरी (radiofrequency electromagnetic fields) सतत बाहेर पडतात. जरी या लहरींचा धोका उष्णतेएवढा सिद्ध झाला नसला तरी, काही अभ्यासांनुसार या लहरींमुळे शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल (motility) आणि त्यांच्या DNA वर परिणाम होऊ शकतो. या लहरी शरीरात ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ वाढवतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे शरीरातील पेशींवर होणारा ताण, यामुळे पेशींचे नुकसान होतं.

हे ही वाचा : एंड्रोपॉज(Andropause):पुरुषांमधील वाढत्या वयातील बदल

मोबाईलच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने शुक्राणूंवर होणारे परिणाम

  • शुक्राणूंची संख्या घटते
  • शुक्राणूंची हालचाल कमी होते
  • DNA चे नुकसान होते

हे बदल लगेच दिसत नाहीत. पण जर तुम्ही अनेक वर्षे मोबाईल खिशात ठेवत असाल, तर त्याचा हळूहळू तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

पण मोबाईल खिशात ठेवणे खरंच इतके धोकादायक आहे का?

हे सगळं एका रात्रीत होणार नाही. हा परिणाम दीर्घकाळ चालणाऱ्या सवयीमुळे होतो. जर तुम्ही तुमचा फोन अनेक वर्षे पॅन्टच्या खिशात ठेवत असाल, तर हळूहळू शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ शकते.

सिगारेट ओढणे, दारू पिणे किंवा जास्त वजन असणे या सवयींचाही प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. फोनचा धोका यापेक्षा कमी आहे. जर तुम्ही या सगळ्या वाईट सवयी एकत्र करत असाल, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर जास्त नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तरुणांनी जास्त काळजी का घ्यावी?

आजकाल तरुण पिढी मोबाईलचा वापर जास्त करते आणि मोबाईल सारखा जवळ असतो. त्यामुळे त्यांना जास्त रेडिएशन मिळू शकते. म्हणून त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आतापासूनच योग्य सवयी लावल्या, तर भविष्यात त्याचे चांगले फायदे मिळतील.

काही सोपे उपाय…

डॉक्टरांनी अजून तरी मोबाईल खिशात ठेवणे पूर्णपणे बंद करायला सांगितले नाही, पण काही सोप्या गोष्टी करून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.

खिशात फोन ठेवू नका, शक्य असल्यास फोन पॅन्टच्या खिशात ठेवण्याऐवजी बॅगमध्ये, जॅकेटच्या खिशात किंवा डेस्कवर ठेवा.

फोनला शरीरापासून दूर ठेवा, फोन आणि तुमच्या शरीरामध्ये काही सेंटीमीटरचे अंतर जरी असले तरी खूप फरक पडतो. त्यामुळे बोलताना फोन कानाला लावण्याऐवजी स्पीकरवर किंवा हेडफोन वापरून बोला.

जर तुम्ही फोन खिशात ठेवणार असाल, तर तो ‘एरोप्लेन मोड’वर ठेवा. यामुळे रेडिएशन खूप कमी होते.

रात्री झोपताना फोन बेडच्या जवळ ठेवण्याऐवजी तुमच्यापासून लांब ठेवा.

प्रजनन क्षमतेची काळजी घेण्यासाठी फक्त फोनचा वापर कमी करणे पुरेसे नाही. सिगारेट आणि दारू सोडून द्या, पौष्टिक आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.

तुमच्या आरोग्याची आणि प्रजनन क्षमतेची काळजी घेण्यासाठी या लहान सवयी खूप मदत करू शकतात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर
Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी
Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ