शेतकऱ्यांसाठी नवीन योजना : ताडपत्री अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा?

tarpaulin : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'ताडपत्री अनुदान योजना' सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करता येणार आहे.
[gspeech type=button]

ताडपत्री.. पावसाळ्यातील एक महत्त्वाची गरजेची वस्तू आहे. घरात छत गळत असेल, खिडकीतून पाण्याची झड येत असेल, शेतात पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून ते झाकण्यासाठी, ताडपत्रीचा वापर केला जातो. याच गरजेसाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ताडपत्री अनुदान योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करता येणार आहे. चला तर मग, या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ताडपत्री अनुदान योजना काय आहे?

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींपासून वाचवणे आहे. अनेकदा अवकाळी पाऊस किंवा वादळ आल्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे आणि काढणी केलेल्या धान्याचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी ताडपत्री खूप उपयुक्त ठरते. पण, चांगल्या दर्जाची ताडपत्री खूप महाग असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ती खरेदी करणे शक्य होत नाही.

याच अडचणीवर तोडगा म्हणून राज्य सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेत सरकार शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देते. यामुळे ताडपत्रीच्या एकूण किंमतीपैकी फक्त अर्धी रक्कम शेतकऱ्याला भरावी लागेल. आणि उरलेली अर्धी रक्कम थेट शेतकऱ्याच्या आधार-जोडणी केलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च खूप कमी होतो आणि त्यांना कमी पैशांत पिकांचं संरक्षण करता येते.

योजनेचे फायदे काय आहेत?

ताडपत्री फक्त पिकांच्या संरक्षणासाठीच नाही, तर इतर अनेक कामांसाठीही वापरली जाते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

पिकांचे संरक्षण : अवकाळी पाऊस, गारपीट किंवा जोरदार वाऱ्यापासून पिकांचे मोठे नुकसान होते. ताडपत्रीमुळे हे नुकसान टाळता येते.

आर्थिक बचत: अनुदानामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात ताडपत्री मिळते, त्यामुळे त्यांचे पैसे वाचतात.

मानसिक स्थिरता: पिकांचे नुकसान होणार नाही, याची खात्री मिळाल्याने शेतकऱ्यांना मानसिक समाधान मिळते आणि त्यांचा तणाव कमी होतो.

बहुउपयोगी साधन: ताडपत्रीचा उपयोग शेतीव्यतिरिक्त इतर अनेक कामांसाठी होतो, जसे की घरगुती कार्यक्रमांसाठी तात्पुरते शेड उभारणे, शेतीत गोदाम म्हणून वापरणे किंवा बाजारपेठेत स्टॉलसाठी वापर करणे.

या योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत.

फक्त महाराष्ट्रातील शेतकरीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल, त्यामुळे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल.

ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

शेतकऱ्यांनी ताडपत्री अधिकृत किंवा नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी आणि त्याचे पक्के बिल सोबत ठेवावे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता योग्य माहिती मिळवून अर्ज करणे महत्त्वाचे आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ही योजना ‘महाडीबीटी शेतकरी योजना’ पोर्टलवर उपलब्ध आहे, अशा चुकीच्या बातम्या पसरत होत्या. यामुळे अनेक शेतकरी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना कोणताही अर्ज मिळाला नाही. कृषी विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, ताडपत्री अनुदान योजना सध्या तरी महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध नाही.
या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळी आहे. काही जिल्ह्यांमध्ये, जसे की पुणे आणि यवतमाळ, ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावे लागतात.

अर्ज कुठे करायचा?

शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा. तिथे त्यांना अर्जाची नेमकी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची अचूक माहिती मिळेल.

आवश्यक कागदपत्रे:

  • शेतकऱ्याचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र (SC/ST असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (अपंग असल्यास)
  • बँक पासबुकची झेरॉक्स प्रतउत्पन्नाचा दाखला

शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. चुकीची माहिती तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवू शकते. योग्य आणि अधिकृत माहितीसाठी नेहमी सरकारी कार्यालयांशी संपर्क साधा. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करणारी ही योजना आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ