मादोगावा झोकू: जपानी कंपन्यांमधील ‘निराश’ कर्मचारी

MADOGIWA ZOKU: 'मादोगावा झोकू' हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. 'मादोगावा' म्हणजे 'खिडकीजवळ' आणि 'झोकू' म्हणजे 'जमात' किंवा 'लोक'. ही संज्ञा अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरली जाते ज्यांना कंपनीत कामावरून काढलं जात नाही, पण त्यांच्याकडून कामही करून घेतलं जात नाही. त्यांना एकप्रकारे बाजूला केलं जातं.
[gspeech type=button]

जपान, एक असा देश जो आपल्या कामाच्या पद्धती, शिस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखला जातो. पण या प्रगतशील जपानमध्ये अनेक कंपन्यांमध्ये एक विचित्र प्रथा दिसून येते. तिथे काही कर्मचारी असे आहेत, जे ऑफिसमध्ये येतात, त्यांच्यासाठी डेस्क-खुर्ची असते, पण काम मात्र काहीच करत नाहीत. ते फक्त दिवसभर शांतपणे बसून राहतात आणि तरीही त्यांना पूर्ण पगार मिळतो. जपानी भाषेत या कर्मचाऱ्यांना ‘मादोगावा झोकू’ म्हणतात, याचा अर्थ ‘खिडकीजवळ बसणारी जमात.’

‘मादोगावा झोकू’ म्हणजे नेमकं काय?

‘मादोगावा झोकू’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. ‘मादोगावा’ म्हणजे ‘खिडकीजवळ’ आणि ‘झोकू’ म्हणजे ‘जमात’ किंवा ‘लोक’. ही संज्ञा अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरली जाते ज्यांना कंपनीत कामावरून काढलं जात नाही, पण त्यांच्याकडून कामही करून घेतलं जात नाही. त्यांना एकप्रकारे बाजूला केलं जातं.

यामागचं मुख्य कारण म्हणजे जपानी संस्कृती आणि त्यांची कामाची पद्धत. जपानमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणं हे खूप चुकीचं मानलं जातं. एखाद्या कर्मचाऱ्याची कामगिरी खूप खराब असली तरी, त्याला नोकरीवरून काढणं हे त्या कंपनीसाठी अपमानास्पद मानलं जातं. कारण कंपनीला असं वाटतं की, कर्मचारी चांगला काम करत नसेल तर ती कंपनीचीच चूक आहे. कंपनी त्याला योग्य पद्धतीने शिकवू शकली नाही. म्हणून, नोकरीतून काढण्याऐवजी, त्यांना शांतपणे ‘मादोगावा झोकू’ बनवलं जातं.

कामावरून काढण्याऐवजी बाजूला का ठेवलं जातं?

ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटेल, पण यामागे जपानी कार्यसंस्कृतीमधील काही महत्त्वाच्या मूल्यांचा प्रभाव आहे.

निष्ठा (Loyalty): जपानमध्ये कर्मचाऱ्यांची कंपनीशी असलेली निष्ठा खूप महत्त्वाची मानली जाते. अनेक कर्मचारी आपलं अख्खं आयुष्य एकाच कंपनीत घालवतात. ज्या व्यक्तीने अनेक वर्षं कंपनीसाठी काम केलं, त्याला अचानक कामावरून काढणं हे तिथे अनैतिक मानलं जातं.

सामाजिक मान : जपानी समाजात नोकरी गमावणे हा एक मोठा मानहानीचा विषय असतो. एखाद्याला नोकरीवरून काढल्यास, त्याचा केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक दर्जाही कमी होतो. हे टाळण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्याला ‘मादोगावा झोकू’ म्हणून सांभाळून घेतात.

परंपरा जपण्याचा आग्रह: जपानमध्ये जुन्या परंपरांना खूप महत्त्व दिलं जातं. यात ‘आयुष्यभराची नोकरी’ ही संकल्पना अजूनही अनेक कंपन्यांमध्ये पाळली जाते. मादोगावा झोकू ही त्याच परंपरेचा एक भाग आहे.

‘मादोगावा झोकू’चं आयुष्य कसं असतं?

हे कर्मचारी दिवसभर काय करतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्खरंतर, यांच्याकडे करण्यासाठी काहीच काम नसतं. त्यांना फक्त एक डेस्क, खुर्ची आणि कधीकधी लॅपटॉप दिला जातो. ते दिवसभर बातम्या वाचतात, पेपर बघतात, डुलक्या काढतात,किंवा ऑफिसमधील इकडे-तिकडेच्या गप्पा ऐकत वेळ घालवतात. अनेकदा त्यांना खिडकीजवळची जागा दिली जाते.

वरवर पाहता हे खूप सोपं आणि आरामदायक वाटतं, पण या कर्मचाऱ्यांसाठी हे जीवन खूप निराशाजनक असतं. अनेक ‘मादोगावा झोकू’ म्हणतात, “हा एक प्रकारचा कंटाळ्यामुळे होणारा मृत्यू आहे.” कामाचा उद्देश नसल्यामुळे त्यांची ओळख हरवून जाते. कामातून मिळणारं समाधान मिळत नाही आणि ते हळूहळू एकाकी आणि निराश बनतात. तरुण सहकाऱ्यांना पाहताना त्यांना आपली परिस्थिती जाणवते आणि त्यांना याची लाज वाटते.

वाढती समस्या आणि बदल

2023  मधील एका सर्वेक्षणातून ही समस्या किती गंभीर आहे, हे लक्षात येतं. जपानमधील जवळपास 49% कंपन्यांमध्ये ‘मादोगावा झोकू’ कर्मचारी आहेत. जपानची वाढती वृद्ध लोकसंख्या आणि कामाच्या ठिकाणी होणारी पद वाढ खूप हळू होते. एकदा तुम्ही या स्पर्धेत मागे पडलात की परत स्पर्धेत येणं जवळपास अशक्य होतं.
यामुळे जपानी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. कारण हे कर्मचारी काम करत नसतानाही त्यांना पूर्ण पगार, बोनस, आणि इतर सुविधा दिल्या जातात. हा परंपरा जपण्याचा खर्च खूप मोठा आहे.

पण आता या परिस्थितीत थोडा बदल दिसून येत आहे. काही ‘मादोगावा झोकू’ कर्मचाऱ्यांनी स्वतःला पुन्हा घडवायला सुरुवात केली आहे. ते रिकाम्या वेळेचा उपयोग करून नवीन कौशल्ये शिकत आहेत किंवा आपल्या तरुण सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

मादोगावा झोकू आणि इतर देशांमधील फरक

जपानमध्ये ‘मादोगावा झोकू’ ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथा बनली आहे, पण इतर अनेक देशांमध्ये ही कल्पनाच वेगळी आहे. अमेरिकेसारख्या देशात एखाद्याची कामगिरी चांगली नसेल तर त्याला लगेच नोकरीवरून काढलं जातं. तिथे at-will employment ही संकल्पना आहे, जिथे कंपनी कोणत्याही वेळी कर्मचाऱ्याला कामावरून काढू शकते. जपानसारखी ‘मादोगावा झोकू’ची पद्धत भारतात किंवा इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही.

‘मादोगावा झोकू’ ही संकल्पना जपानच्या संस्कृतीला आणि तिच्या कामाच्या पद्धतीला उत्तम प्रकारे दाखवते. यामुळे नोकरीची सुरक्षितता मिळते, पण त्याचबरोबर कंपनीच्या कामातील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ