तुम्ही सलग 14 दिवस साखर खाल्ली नाही तर तुमच्या शरीरामध्ये काय घडतं तुम्हाला ठाऊक आहे का?

No Sugar Benefits : जेव्हा तुम्ही वजन कमी करायचं ठरवता तेव्हा आहारतज्ज्ञ नेहमी साखरेचं प्रमाण कमी करण्याचं किंवा साखर सोडण्याचा सल्ला देतात. तुम्ही कमीतकमी दोन आठवडे जरी साखरेचे पदार्थ खाण्याचं थांबवलं तरी तुमच्या शरीरात सकारात्मक बदल घडायला सुरूवात होते. पण आपण मात्र, दिवसातून एखाद्या वेळी गोड खाल्लं तर काय बिघडतं असं आपण सहज म्हणून जातो. तर जाणून घेऊयात दिवसातून एकदाच तेही थोडंस जरी गोड खाल्लं तर शरीरावर काय परिणाम होतो?
[gspeech type=button]

आपल्यापैकी बहुतांशी जणांना सकाळच्या नाश्तामध्ये गोड पदार्थ लागतो. एकतर शिरा, बिस्कीट किंवा साखरेचा गोड चहा लागतोच लागतो. त्यानंतर दुपारचं जेवणही पोटभर झालं तरी काहीन् काही गोड खाण्यासाठी पोटात थोडी जागा करतोच. रात्रीचंही तसंच आहे. जेवण झालं की काहीतरी गोड पदार्थ खाण्याची इच्छा होतेच.  तुम्ही दिवसभरातून किती प्रमाणात गोड खाता यावर कधी लक्ष दिलं आहे का? दिवसातून दोन वेळा जरी गोड पदार्थ खाल्ले तरी त्याचा शरीरावर मोठा परिणाम होतोच. पण याची आपल्याला कधी जाणिवच होत नाही. 

तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे की, जेव्हा तुम्ही वजन कमी करायचं ठरवता तेव्हा आहारतज्ज्ञ नेहमी साखरेचं प्रमाण कमी करण्याचं किंवा साखर सोडण्याचा सल्ला देतात. तुम्ही कमीतकमी दोन आठवडे जरी साखरेचे पदार्थ खाण्याचं थांबवलं तरी तुमच्या शरीरात सकारात्मक बदल घडायला सुरूवात होते. पण आपण मात्र, दिवसातून एखाद्या वेळी गोड खाल्लं तर काय बिघडतं असं आपण सहज म्हणून जातो. 

तर जाणून घेऊयात दिवसातून एकदाच तेही थोडंस जरी गोड खाल्लं तर शरीरावर काय परिणाम होतो?

आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा का होते? 

आपल्यापैकी अनेकांना अचानक गोड खाण्याची खूप तीव्र इच्छा होते. साहजिकच हे संकेत आपल्याला मेंदूकडूनच मिळतात. असं का घडतं? तर वैज्ञानिक आणि डॉक्टर्स सांगतात की, जेव्हा आपण साखरेचे गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरिरात डोपामाइन हार्मोन तयार होऊ लागतं. यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटू लागतं. यातून आपल्या मेंदूतला रिवार्ड सेंटर सक्रिय होऊ लागते. 

जेव्हा आपण एकसारखे गोड, साखरेचं पदार्थ खाऊ लागतो तेव्हा आपण नकळत आपल्या मेंदूला हे पदार्थ एकसारखं मागत राहण्याची सवय लावतो. कारण यातून आपल्याला मनाला प्रसन्नता आणि आनंद मिळत असतो. त्यामुळे मग आपल्याला एकसारखी गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण भूक नसतानाही चॉकलेटसारखे पदार्थ चघळत राहतो. 

महत्त्वाचं म्हणजे शरीराला पुरेशा साखरेची गरज असते ती पूर्ण करावीच लागते. मात्र, या साखरेचं प्रमाण जास्त झालं तर आजाराच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे साखर ही मर्यादित प्रमाणात खावी असं द अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटलं आहे. कारण जर शरीरात साखरेचं प्रमाण जास्त झालं तर, वजन वाढणे, जळजळ, टाइप 2 चा मधुमेहाचं प्रमाण वाढू शकते.

साखर खाण्याचं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतात?

कमीतकमी दोन आठवड्यासाठी आपल्या आहारातून साखर किंवा साखरेचे पदार्थ पूर्ण वगळणे याचा पहिला अर्थ असा होतो की, आपल्याला आपल्या शरीरावर मनावर ताबा मिळवण्यात यश मिळालं आहे. हे दोन आठवडे पूर्ण झाल्यावर आपल्याला शरीरामध्ये झालेले बदल जाणवू शकतात. 

जेव्हा आपण दोन आठवडे साखर सोडतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या चेहऱ्यावर, डोळ्याच्या आजूबाजुलची सूज कमी होईल. डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितल्यानुसार जेव्हा आपण साखर खाण्याचं टाळतो तेव्हा आपला चेहरा हा खऱ्या नैसर्गिक आकारामध्ये येतो. 

आपली झोपेची सायकल सुधरते आणि चांगली झोप लागते. आहारतज्ज्ञ साक्षी लालवानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी एक पोस्ट दिलेली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जेव्हा आपण साखर खाणं बंद करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण संतुलित होतं. यामुळे आपल्याला वेळेवर झोप येते, चांगली झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर आपल्याला थकवा किंवा कंटाळवाणं न वाटता आपल्या शरीरातील ऊर्जेची जाणिव होते. 

साखर खाणं बंद केल्यावर छातीत जळजळ होण्याचं प्रमाण कमी किंवा बंद होते. याशिवाय आपण कितीही काम करत राहिलो, खेळत राहिलो तरिही आपण थकत नाही, आपल्या शरीरातील ऊर्जा कायम राहते. साखरेचं सेवन कमी केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरातील चरबी कमी होत आहे. लालवाणी यांनी अलिकडच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये साखर सोडणं हे ‘गेम चेंजर’ असल्याचं म्हटलं आहे.  कारण या चॅलेंजमुळे तिला तिच्या शरीरातील चरबी तसेच यकृतातील चरबी कमी झाल्याचं आढळून आलं.  

साखरेला काय पर्याय आहेत?

साखर खायला बंद केली याचा अर्थ कोणतेच गोड चवीचे पदार्थ खायचे नाहीत असं नाही. पण एखाद्या पदार्थामध्ये गोडवा येण्यासाठी साखरे ऐवजी इतर पदार्थांचा वापर केला पाहिजे. जसं की, मिल्कशेक गोड करण्यासाठी भिजवलेले अंजीर वापरु शकतो किंवा गोड पदार्थ बनवण्यासाठी पिकलेलं केळं ओटमीलमध्ये मिसळू शकतो.

काही वेळेला साखरेला पर्याय म्हणून स्टीव्हिया आणि मोंक फ्रूटसारखे पर्याय सुचवले जातात. मात्र, हे पर्याय कितपत सुरक्षित आहेत त्याचा शरीरावर काय काय परिणाम होतो यावर वावविवाद आहेत. कारण काही तज्ज्ञांच्या मते स्टीव्हिया आणि मोंक फ्रूट मुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. तर काही तज्ज्ञ सांगतात की, या पर्यायांमुळे आतड्याच्या मायक्रोबायोमवर नकारात्मक परिणाम होतो. नेमकं हे स्टीव्हिया आणि मोंक फ्रूट कसं किती प्रमाणात वापरावं की ज्यामुळे योग्य परिणाम साधता येईल हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, साखर सोडल्यामुळे शरीराला किती फायदे होतात हे अनेक अभ्यासातू स्पष्ट झालं आहे. त्यामुळे निरोगी आयुष्य जगताना तुम्हीही साखर वर्ज्य करण्याचा निर्णय घेऊ शकता. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर
Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी
Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ