भारतातल्या पहिल्या महिला फॉरेन्सिक शास्त्रज्ञ डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती

Breaking Barriers : व्यावसायिक जगतातील काही क्षेत्रांमध्ये आजही पुरूषांची मक्तेदारी आहे. अशा क्षेत्रात महिलांनी प्रवेश करणं, टीका - टिपण्णींचा सामना करत स्वत:ची जागा निर्माण करणं खूप आव्हानात्मक आहे. हे आव्हान पेलून अनेक महिलांनी आपलं नाव उंचावलं आहे. आणि स्त्रीशक्तीचा प्रत्यय जगाला आणून दिलेला आहे. अशाच अतिशय जटिल अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि त्या क्षेत्राला आकार देणाऱ्या डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
[gspeech type=button]

डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती फॉरेन्सिक लॅब या क्षेत्रातल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ याहीपेक्षा क्रांतिकारक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. 1949 साली नागपूर इथं त्यांचा जन्म झाला. पारंपरिक रुढी परंपरा यांना छेद देत त्यांनी रसायनशास्त्र विषयात शिक्षण घेत फॉरेन्सिक – गुन्हेगारी तपास क्षेत्रात पाऊल ठेवलं. या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. या क्षेत्रात त्यांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. या क्षेत्रात महिला काय करणार? या उपहासात्मक प्रश्नाला त्यांच्या कामातून उत्तर देत त्यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये अतिशय वरचं स्थान पटकावलं आहे. 

पार्श्वभूमी आणि करिअरचा मार्ग

डॉ. कृष्णमूर्ती  त्यांच्या आई-वडिलांचं सहावं अपत्य. वडिल सरकारी अधिकारी होते तर आई गृहिणी होती. त्यांच्या घरात शिक्षण आणि करिअरला प्रोत्साहन देणारं वातावरण होतं. अॅनेलेटिकल केमिस्ट्री (विश्लेषणात्मक रसायनशास्त्र) या विषयात डॉ. कृष्णमूर्ती यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1974  मध्ये त्या  फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज संचालनालयात नोकरीसाठी रुजू झाल्या.

कारकिर्दीच्या सुरुवातीला, डॉ. कृष्णमूर्ती या डीएफएसएल प्रयोगशाळेत एकमेव महिला होत्या. त्यावेळी त्यांना अनेकदा पक्षपातीपणाचा सामना करावा लागला. पहिल्याच दिवशी काही सहकाऱ्यांनी प्रश्न विचारला, “एफएसएलमध्ये एक महिला काय करणार?” या सततच्या प्रश्नांना त्यांनी शब्दातून नाहीतर त्यांच्या कामातून उत्तर दिलं. 

हेही वाचा : आरदाळची ओळख बदलणाऱ्या पोलीस पाटील मनिषा गुरव

उल्लेखनीय कारकीर्द 

2002 मध्ये, डॉ. कृष्णमूर्ती डीएफएसएल महाराष्ट्रच्या संचालक झाल्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बनावट चलन तपासासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

1970 च्या दशकातील जोशी-अभ्यंकर मालिका हत्याकांड, 1976 मध्ये महाराष्ट्रामध्ये ट्रेनला लागलेली आग प्रकरण, 1993 मुंबई बॉम्बस्फोट अशी अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. मुंबई बॉम्बस्फोटांच्या तपासातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, त्यांना इंटरपोलने अहवालाच्या चर्चेसाठी आमंत्रित केले होतं. यावेळी त्याचं जागतिक फॉरेन्सिक शास्त्रज्ञांकडून विशेष कौतुक करण्यात आलं होतं. 

अनेक महिलांनी एफएसएलमध्ये प्रवेश केला

डॉ. कृष्णमूर्ती यांनी एफएसएलमध्ये कामाला सुरूवात केल्यानंतर या पुरूष मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात स्त्रियांनीही प्रवेश करण्यास सुरूवात केली. 2008 साली डॉ. कृष्णमूर्ती यांनी  एफएसएलमधली नोकरी सोडली. त्यावेळी एफएसएलमध्ये 20 टक्के महिला कर्मचारी कार्यरत होत्या. 

2009  ते 2012 पर्यंत, डॉ. कृष्णमूर्ती यांनी महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्समध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम केलं. या काळत त्यांनी मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद इथे तीन नवीन संस्था स्थापन करण्यासाठी मदत केली. ज्यामुळे फॉरेन्सिक सायन्स शिक्षणाची उपलब्धता वाढली.

महाराष्ट्र सरकारसाठी सहा जागतिक दर्जाच्या फॉरेन्सिक लॅब स्थापन करण्यात डॉ. कृष्णमूर्ती यांचे मोलाचे योगदान आहे. या सुविधांमध्ये खोटे शोधणे, टेप प्रमाणीकरण, सायबर फॉरेन्सिक्स, मेंदूचे फिंगरप्रिंटिंग आणि डीएनए विश्लेषण यासारख्या विस्तृत वैशिष्ट्यांचा समावेश होता.

2011 मध्ये, डॉ. कृष्णमूर्ती यांनी हेलिक अ‍ॅडव्हायझरी नावाची फॉरेन्सिक प्रयोगशाळा स्थापन केली. सध्या त्या या प्रयोगशाळेच्या अध्यक्षा आणि सीईओ म्हणून काम करतात.  त्या राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये शैक्षणिक परिषदेच्या सदस्य म्हणून देखील काम करतात. गंभीर कायदेशीर बाबींवर फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून माहिती देण्यासाठी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांशी नियमितपणे सल्लामसलत करतात.

प्रकाशने आणि मान्यता

एक कुशल लेखिका आणि संशोधक, डॉ. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या कार्यकाळावर, क्षेत्राशी संबंधित ‘इंट्रोडक्शन टू फॉरेन्सिक सायन्स इन क्राइम इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक बायोलॉजी’ ही दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 140 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. यामुळे या क्षेत्रातील एक अग्रगण्य अधिकारी म्हणून त्यांची प्रतिष्ठा आहे. फॉरेन्सिक सायन्समधील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि जीवनगौरव पुरस्कार’ यासह आठ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. कृष्णमूर्ती खरोखरच एक अपवादात्मक आणि अद्वितीय महिला आहेत. वयाच्या 77 वर्षीही महिला काय साध्य करू शकतात? या अपेक्षांना झुगारून देत, त्या स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान ठरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Aishwarya Pissay Indian motorsports athlete : पोर्तुगालमध्ये नुकताच FIM वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातल्या ऐश्वर्या पिसे
Tri-service sailing voyage : भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करातील महिला अधिकारी एकत्रितरित्या पहिल्या जागतिक प्रदक्षिणेला सुरूवात केली आहे. 'समुद्री
Saraswatibai Phalke : ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय सिनेसृष्टीला सुरूवात झाली. या सिनेमाची निर्मिती आणि निर्मितीकार दादासाहेब फाळके यांना

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ