समैरा हुल्लूर:देशातली सगळ्यात लहान व्यावसायिक पायलट

एकट्याने विमान चालवण्याची संधी ही खूप आनंददायक वाटत असली तरीही प्रत्यक्षात यामध्ये अनेक अडथळे होते. अनेक आव्हानांना तोंड देत ती हा सराव करत होती. प्रत्येकवेळेला विमान धावपट्टीवर उतरवताना तिला खूप अडचणी यायच्या.
[gspeech type=button]

प्रवास करणं हे बहुदा सगळ्यांनाच खूप आवडतं. त्यातही खिडकीच्या बाजूला बसून बाहेरचं दृश्य पाहत प्रवास करणं खूपच छान वाटतं. मग ती बस असो, ट्रेनचा प्रवास असो की विमानाचा. पण हे असं मागे बसून प्रवास करण्यापेक्षा ते वाहन चालवून समोरून सगळं दृश्य पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर.. 

 

तामिळनाडूतल्या समैरा हुल्लूर हिनं साधारण 11 – 12 वर्षाची असताना विमान प्रवासादरम्यान विमान चालवण्याचं स्वप्न पाहिलं. आणि वयाच्या 18 वर्षी हे स्वप्न पूर्ण करुन देशातली सगळ्यात लहान व्यावसायिक पायलट म्हणून परवानाही मिळविला आहे. 

 

पायलटच्या गणवेशावरील प्रेम

कर्नाटकमधील बिजापूर इथली समैरा हुल्लूर हिला लहानपणापासूनच घोडेस्वारी, रॉक क्लाईम्बिंग, स्विमिंग अशा साहसपूर्ण खेळाची आवड होती. असं म्हणतात आई-वडिलांनी आपल्या इच्छा, आपली स्वप्ने मुलांवर लादू नयेत. पण समैराच्या बाबतीत असंच काहिसं घडलं. समैराच्या आईला पायलट, हा व्यवसाय आणि त्यांच्या गणवेशाचं खूप आकर्षण होतं. त्यामुळे समैरा ही या क्षेत्राकडे आकृष्ट झाली. 

 

समैरा ही इयत्ता पाचवीत होती तेव्हा तिने तिच्या कुटुंबियांसोबत बिजापूरच्या नवरसपूर उत्सवावेळी हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा अनुभव घेतला. त्यावेळी समैरा हिची आई कॉकपीटमध्ये बसली होती. “हेलिकॉप्टर मध्ये मागे बसून जो अनुभव येतो त्याहीपेक्षा पायटलच्या शेजारी बसून अनुभव घेणं हे खूपच अविस्मरणिय आहे, भारावून टाकणारं आहे. त्यात पायलटच्या गणवेशात ते वाहन चालवणं हे खूपच प्रभावित करणार आहे” अशा शब्दात तिच्या आईने हा अनुभव सांगितला. 

 

त्यानंतर काही वर्षांनी समैराची आई नाझिया हुल्लूर या दिल्ली विमानतळावरुन प्रवास करत होत्या.  त्यावेळी त्यांनी विमानतळावरुन पायलट आणि केबिन क्रूला जाताना पाहिलं. त्यावेळी सगळी लोक हे पायलटला आदराने अभिवादन करत होते. पायलटना मिळणाऱ्या या आदराने समैराची आई भारावून गेली. त्याचवेळी त्यांनी ठरवलं की आपल्याही मुलीनं असं क्षेत्र निवडावं की जिथे तिच्या कामाला आदरापूर्वक पाहिलं जाईल. समैराची आई या बिजापूर इथल्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या डायरेक्टर आहेत. 

 

हेही वाचा- भारतातल्या पहिल्या महिला फॉरेन्सिक शास्त्रज्ञ डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती

 

समैरा इयत्ता 9 मध्ये असताना तिनं कोणताही डेस्क जॉब किंवा जिथे खूप अभ्यास करावा लागेल अशा क्षेत्रात न जाण्याचा पक्का निर्धार केला होता. त्यावेळी तिच्या आईने तिला पायलट हे क्षेत्र निवडण्याचं सुचवलं. 

इयत्ता दहावीमध्ये असताना समैराने कॅप्टन थापेश कुमार यांच्याकडून या क्षेत्राची माहिती करुन घेतली. या क्षेत्राचा अभ्यासक्रम, लागणारा वेळ, संस्था, खर्च अशी सगळी माहिती तिने कॅप्टन थापेश कुमार यांच्याकडून मिळवली. त्याचवेळी समैराची आईही तिला या क्षेत्रासंबंधित इतर माहिती, अभ्यास करुन सांगत असे. 

कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असताना एकदा समैराच्या मैत्रणीने तिला सांगितलं की, आपल्यापैकी किती जणांचे पालक त्यांच्या मुलांना पायलट हो म्हणून सांगतात? तुझे आई- वडिल तुला समोरून पायलट होण्याबद्दल सांगत आहेत, तू खूप नशीबवान आहेस असं तिची मैत्रिण म्हणाली. त्यानंतर समैराने आपल्याला पायलटचं व्हायचं आहे हा निर्णय पक्का केला. आणि तिचा वास्तवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 

व्यावसायिक वैमानिकसाठी 18 महिन्याचं प्रशिक्षण

बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा झाल्यानंतर समैराने दिल्लीला स्थलांतर केलं. दिल्लीमधल्या विनोद यादव एविएशन अकादमीमध्ये तिने प्रवेश घेतला. इथे पहिल्या टप्प्यामध्ये सहा विषयाचा अभ्यास करायचा होता. यामध्ये एविऐशन एअर रेग्युलेशन, एविएशन मेटओरोलॉजी (हवामानशास्त्र), एअर नेव्हिगेशन, टेक्निकल जनरल, टेक्निकल स्पेसिफिक आणि रेडिओ टेलिफोनी या विषयांचा अभ्यास करावा लागतो. या परिक्षेत साधारण 70 टक्के गुण मिळवावे लागतात. ही परिक्षा पास होण्यासाठी अभ्यासात सर्वसाधारण असलेल्या विद्यार्थ्यांला निदान दोनदा तरी परिक्षेला बसावं लागतं. मात्र, समैराने या परिक्षेसाठी अफाट मेहनत घेत पहिल्या प्रयत्नात ही परिक्षा पास केली. पण या परिक्षेतला सहावा पेपर रेडिओ टेलिफोनी या पेरसाठी वयाची मर्यादा असते. समैरा ही वयाने लहान असल्यामुळे हा पेपर मात्र तिला देता आला नाही. त्यानंतर तिने तीन वेळा यासाठी प्रयत्न केले पण तिला परिक्षेमध्ये बसू दिलं गेलं नाही. 

ती डगमगली नाही. तिची हिम्मत खचली नाही. तिने वेगळा पर्याय स्विकारला. या परिक्षेऐवजी तिने ग्राऊंड प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. यासाठी तिने पुण्यातील बारामती इथल्या कारवर एविऐशन मध्ये प्रवेश घेतला. इथे तिला 200 तास विमान चालवण्याचं प्रशिक्षण पूर्ण करायचं होतं. कारण हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरच तिला व्यावसायिक वैमानिक परवाना मिळणार होता. जानेवारी 2023  ते 2024 सालच्या मध्यापर्यंत समैराने हे प्रशिक्षण पूर्ण केलं. हा संपूर्ण कालावधी 18 महिन्याचा होता.  

एकट्याने विमान चालवण्याची संधी

या प्रशिक्षण काळामध्ये सुरूवातीला विद्यार्थ्यांना कॉकपिट मुख्य पायलट – प्रशिक्षण देणाऱ्यांच्या बाजूला बसवून शिकवलं जातं. विद्यार्थी आता विमान चालवू शकतो हा विश्वास जर प्रशिक्षण देणाऱ्यांना वाटला तरच ते त्यांना एकट्याने विमान चालवण्याची संधी देतात. यासाठी साधारण 36 तासाचा प्रवास कालावधी लागतो. मात्र, समैराने 28 तासाच्या प्रशिक्षण कालावधीनंतर ही संधी मिळवली. 

एकट्याने विमान चालवण्याची संधी ही खूप आनंददायक वाटत असली तरीही प्रत्यक्षात यामध्ये अनेक अडथळे होते. अनेक आव्हानांना तोंड देत ती हा सराव करत होती. प्रत्येकवेळेला विमान धावपट्टीवर उतरवताना तिला खूप अडचणी यायच्या. मात्र, तिच्या प्रशिक्षकांनी तिला लँडिगच्या वेळी खोलवर श्वास घेऊन लक्ष केंद्रीत करुन विमान लँड करण्याचा सल्ला दिला. हा खूप छोटा सल्ला वाटत असला तरी समैराला त्याचा खूप उपयोग झाला. त्यानंतर तिचं प्रत्येक लँडिग हे खूप व्यवस्थितपणे होऊ लागलं.  या सरावानंतर कारवर संस्थेत समैराला तिच्या पायलट गणवेशाच्या खांद्यावर ती व्यावसायिक पायलट आहे हे दर्शवणाऱ्या तीन पट्ट्या लावून तिला व्यावसायिक पायलटचा परवाना दिला गेला. 

वयाच्या अठराव्या वर्षी व्यावसायिक पायलटचा परवाना मिळवणं हे समैरा आणि तिच्या कुटुंबियांसाठी अतिशय आनंदाची बाब होती. मात्र, समैराला तिच्या आजीची शाबासकी जास्त महत्त्वाची होती. कारण समैराच्या आजीची इच्छा होती की तिने पहिलं तिच शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. पण आपली नात आज इतक्या लहान वयात पायलट झालेली आहे हे पाहून तिच्या आजीलाही आनंदाश्रू आवरता आले नव्हते. तर ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आल्यावर समैरालाही अत्यानंद झाला. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Aishwarya Pissay Indian motorsports athlete : पोर्तुगालमध्ये नुकताच FIM वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातल्या ऐश्वर्या पिसे
Tri-service sailing voyage : भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करातील महिला अधिकारी एकत्रितरित्या पहिल्या जागतिक प्रदक्षिणेला सुरूवात केली आहे. 'समुद्री
Saraswatibai Phalke : ‘राजा हरिश्चंद्र’ या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय सिनेसृष्टीला सुरूवात झाली. या सिनेमाची निर्मिती आणि निर्मितीकार दादासाहेब फाळके यांना

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ