ऊस हे नाव घेताच गोडवा देणारं पीक ही आर्थिक आणि चवीच्याही दृष्टीने हे एक समीकरण आपल्या डोक्यात येतं. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात पूर्वी पिकणारा ऊस हा चवीने जास्त गोड नव्हता. त्यामुळे बाहेरून ऊसाची आयात केली जायची. मग भारतात गोड ऊसाचं पीक कसं होऊ लागलं ? तर याचं श्रेय जातं जानकी अम्मल या महिला शास्त्रज्ञाला. जाणून घेऊयात कोण आहेत ऊसाला गोडवा देणाऱ्या जानकी अम्मल?
वनस्पतीच्या सहवासात वाढलेली जानकी
जानकी अम्मल यांचा जन्म 1897 साली केरळमध्ये झालेला. ज्या काळात महिलांसाठी चूल -मूल, रांधा – वाढा – उष्टी काढा अशी परिस्थिती होती त्या काळात जानकी यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडिल हे निसर्गमित्र होते त्यामुळे आपसूकच त्यांनासुद्धा निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड होती. निसर्गातील विविध वनस्पती, वृक्षांविषयी त्यांना कुतूहल होतं. त्यांनी क्वीन मेरी कॉलेज आणि प्रेसिडेन्सी कॉलेज ऑफ मद्रास इथून वनस्पतीशास्त्र विषयात उच्च शिक्षण पूर्ण केलं.
विज्ञान शाखेतील शिक्षणात प्रवेश करणारी धाडसी महिला
त्याकाळी शिक्षण क्षेत्रात अर्थातच पुरूषांची मक्तेदारी होती. खूपच कमी महिला घराबाहेर पडून शिक्षणाच्या दारात जात असत. मात्र, ज्या महिलांनी शिक्षणाची कास धरली त्या सगळ्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहेच. जानकी अम्मल यांनी केरळमध्ये उच्च शिक्षण घेतल्यावर त्यावरच त्या थांबल्या नाहीत. तर, 1920, साली त्या परदेशात शिक्षणासाठी गेल्या. मिशिगन विद्यापीठातून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात पीएचडीचं शिक्षण घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणामध्ये पीएचडी पर्यंतच शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
परदेशातही साडीत वावर
सन 1920 आणि 1930 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मिशिगन विद्यापीठाच्या बायोलॉजिकल स्टेशनमध्ये काम करु लागल्या. त्यावेळी त्यांनी त्यांचा पेहराव बदलला नाही. त्या परदेशात कायम साडीमध्ये वावरायच्या. कामाला सुरूवात केल्यावर सुद्धा साडी, गमबूट्स हाच त्यांचा पेहराव असे.
जागतिक युद्धाच्या वेळची परिस्थिती
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी त्या लंडनमध्ये कार्यरत होत्या. लंडन इथल्या जॉन इनस इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी लागवड केलेल्या वनस्पतीचे गुणसूत्र ( क्रोमोसोमस अॅटलास ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स ) या विषयावर प्रबंध ल%