युपीआय, रेल्वे प्रवासाशी संबंधित ‘या’ नियमांत आजपासून होणार बदल

आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात. त्यामुळे जाणून घेऊयात आजपासून तुम्हाला काय काय बदल घडणार आहेत. 
[gspeech type=button]

दर महिन्याच्या एक तारखेला सार्वजनिक कामकाजाशी संबंधित असलेल्या नियमांमध्ये, धोरणांमध्ये बदल घडत असतात. त्यानुसार आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात. त्यामुळे जाणून घेऊयात आजपासून तुम्हाला काय काय बदल घडणार आहेत. 

 युपीआयवर ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा होणार बंद

यापूर्वी युपीआयवर फोन पे, गुगल पे आणि पेटीएमच्या माध्यमातून कलेक्ट रिक्वेस्ट पाठवून पैसे गोळा केले जायचे. मात्र नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आता ही सुविधा बंद केली जाणार आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी होत आहे. या सुविधेमुळे काही ठिकाणी फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे थेट पैसे पाठवण्याचाच एकमेव पर्याय आता उपलब्ध असणार आहे. 

पुर्ण पेंशन शेअर बाजारमध्ये गुंतवणे शक्य

खासगी क्षेत्रातील कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या पेंशनची पूर्ण रक्कम ते आता शेअर बाजारातील इक्विटी शेअरमध्ये गुंतवू शकतात. यापूर्वी 75 टक्के रक्कम गुंतवण्याची मर्यादा होती. मात्र, आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे. 

रेल्वे तिकीट बुक करताना आधार प्रमाणीकरण अत्यावश्यक

लांब पल्ल्याचे रेल्वे तिकीट बुक करताना अनेकदा अडचणी येतात. तिकीट बुकींगची सुविधा सुरू होताच सगळे तिकीट बुक झाल्याचं नोटिफिकेशन येत. त्यामुळे एजंटच्या मदतीशिवाय तिकीट बुक होतच नाही. यावर पर्याय म्हणून रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकींगची सुविधा सुरू झाल्यावर आधार प्रमाणीकरण असलेल्यांसाठी पहिले 15 मिनीटे राखीव ठेवली आहेत. ज्याचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे अशा प्रवाशांना, नागरिकांना सगळ्यात पहिल्यांदा तिकीट बुक करता येईल. 

ऑनलाईन गेमिंगमध्ये वयोमर्यादा लागू

ऑनलाईन गेम्समध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आजपासून नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये गेम खेळणाऱ्या व्यक्तीचं वय, गेमिंग पार्लेर चालवणाऱ्या आणि गेम तयार करणाऱ्या कंपनीचे परवाने याविषयी बदल करण्यात आले आहेत. 

स्पीड पोस्ट महागलं

पोस्ट खात्याकडून स्पीड पोस्टचे चार्जेस वाढवण्यात आले आहेत. तसेच पोस्टाच्या कुरिअरची सेवा आता ओटीपीच्या आधारावर होणार आहे. तुमच्या मोबाईलवर ओटीपी आल्यावरच डिलीवर व्यक्तीकडून तुम्हाला पार्सल दिलं जाणार आहे. 

चेक पेमेंटसाठी आरबीआयचे नवीन नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 4 ऑक्टोबरपासून चेक पेमेंट सुविधांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. या नव्या बदलांमुळे चेकच्या माध्यमातून पेमेंट केल्यावर चेक क्लीअरन्स जलदगतीने होईल. 

आधारकार्डशी संबंधित अनेक नियमांत बदल

आधार कार्ड अपडेट्सच्या दरात वाढ – आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करायचे असतील तर त्यासाठी 75 रुपये मोजावे लागणार आहेत. तर फोटो आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी 125 रुपये मोजावे लागणार आहेत. तर नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी कोणतीची फी आकारली जाणार नाही. 

10 वर्ष जूनं आधार कार्ड अपडेट करणं अनिर्वाय – जर तुमचं आधारकार्ड 10 वर्षा जूनं असेल तर ते अपडेट करुन घेणं गरजेचं आहे. यासाठी अद्ययावत कागदपत्रांसह अधिकचे पैसे ही द्यावे लागणार आहेत. 

प्रौढ महिलेच्या नावामध्ये पिता / पती याचं नाव नसणार –  18 वयोवर्षे पूर्ण झालेल्या तरुणीच्या आणि महिलेच्या नावामागे तिच्या वडिलाचं वा पतीचं नाव आधारकार्डवर नमुद केलं जाणार नाही. तसेच पूर्ण जन्मदिना ऐवजी वर्ष जन्माच्या वर्षाची नोंद केली जाणार आहे. 

पत्ता बदलण्यासाठी वेगळी कागदपत्रे द्यावी लागणार – आधार कार्डवरचा पत्ता बदलण्यासाठी आता अर्जदारांना बँक स्टेटमेंट किंवा पाणी, लाईट बिल अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा
Foreign Travel : 2024 साली सगळ्यात जास्त भारतीयांनी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये प्रवास केला आहे. पश्चिम आशियाई देशानंतर सौदी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ