नवरात्रीच्या नऊ रात्री म्हणजे आनंद, उत्साह आणि खूप साऱ्या ताणाचाही काळ असतो! घाईघाईत तयारी करायची असते, ड्रेसिंग, मेकअप, hairstyle…. एक ना दोन. पण हा काळ जागरणांचासुद्धा असतो. त्याचा थेट परिणाम स्किनवर आणि केसांवरही होत असतो. आपण सणांमध्ये तितक्याच तरतरीत आणि सुंदर दिसावं यासाठी स्किनची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही काळजी घेण्यासाठी आहार, सलोनमधील सुविधा आणि घरगुती उपायांची वेगवेगळी भूमिका असते. तर मग पाहू या, तुम्ही स्किनची काळजी कशी घेऊ शकता सणांच्या आधी…
सर्वांनी छान दिसुयात
नवरात्री म्हणजे रंग, नृत्य, आणि जल्लोषाचा सण! नऊ दिवसांची धावपळ, घाम, मेकअप, आणि रात्रीच्या जागरणानंतर आपली त्वचा दमलेली वाटणं साहजिक आहे. पण काळजी करू नका! तुमची त्वचा नवरात्रीतही ताजीतवानी राहण्यासाठी काही खास टिप्स आणि उपाय आहेत, जे तुम्ही सलोनमध्ये जाऊन किंवा घरीच करून करू शकता. नवरात्रीत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे नवरात्र सुरू होण्याआधी गरबा दांडिया नाचून दमल्यानंतरची सकाळ आणि पुन्हा रात्री नाचायला तयार व्हायचं हे महत्वाचे टप्पे आहेत.
शॉर्ट टर्म वेट लॉस!
बऱ्याचजणी चनीया चोली, innovative designed कपडे घालण्यासाठी डाएट वगैरे सुरु करतात. पण संसारी बायकांना गरब्याची हौस आणि सकाळचं पूजा, स्वयंपाक, ऑफिस वगैरे रूटीन संभाळायचं असतं. तसंच अनेकांना ऑफिस, परीक्षा वगैरे व्यवधानं असतात. अशावेळी आहारावर लक्ष देणं सगळ्यात सोप्पं आहे. आजकाल उपास करणाऱ्यांची संख्या वाढलीये. तर एक नियम घालून घेऊया. उपासाला बटाटे, साबुदाणा, तळण, गोड पदार्थ टाळावेत. त्या पेक्षा भोपळा, दही ताक, लिंबू सरबत, शहाळ्याचं पाणी, संत्री, सफरचंदासारखी फळं घ्यावीत. उपास नसणाऱ्यांनी फक्त साखर आणि साखरेचे पदार्थ टाळले तरी ऊर्जेचं भांडार उपलब्ध होईल. थोडं डाएट आणि गरबा हा शॉर्ट टर्म weight loss program असू शकतो.
त्वचेची काळजी महत्त्वाची
या डाएटचा फक्त वजनावर नाही तर स्किनवरही छान परिणाम दिसतो. आता गरज आहे topical उपचाराची. नवरात्रीपूर्वी मला खात्री आहे waxing, facial च्या appointment बुक झाल्याचं असतील. पण तयारीसाठी बाजारात फिरताना त्वचा सूर्याच्या किरणांपासून जळू नये म्हणून सनस्क्रीन वापरणं महत्त्वाचं आहे हे विसरू नका. डान्स, नाच, आणि उर्जा जपण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी लिंबूपाणी, नारळपाणी, ज्यूसी फळांवर भर द्या. त्याचबरोबर काही प्रोडक्ट्स जसे फेस सीरम, केळ्याचे काप चेहऱ्यावर ठेवा ज्याने रंग उजळेल, moisturizer वगैरेंचा वापर करा. ह्यावेळी पाऊस अजून सुरु आहे आणि त्यामुळे हवेत कमालीचा दमटपणा. तर घामाला प्रतिबंध करणं खूप गरजेचं आहे. कारण नाचताना घाम तर येणार आणि काळजी नसेल घेतली तर दुर्गंधी. तर antiperspirant वापरायला विसरू नका.
हे नक्की कराच
- तयारी सुरू करण्याआधी Anti perspirant …. हे शक्यतो रोल ऑन प्रकारात असतात. बाजारात अनेक ब्रँड्स आणि सुगंध उपलब्ध आहेत. खूप घाम येणाऱ्या जागा जसं काख, मानेचा मागचा भाग येथे लावावे. १ मिनिटात वाळते. त्यानंतर हातांना, मान, मानेचा खालचा भाग, पोट, पाठ, मांड्यांना पावडर लावावी. जेणेकरून त्वचा कोरडी राहील. फार घाम येत नसेल तर deodorant वापरावा.
- Makeup करताना शक्यतो पाउडर बेस products वापरा. क्रीम बेस प्रॉडक्ट्सनी स्किन अजून तेलकट किंवा चिकट होऊ शकते. Makeupला सुरुवात करण्याआधी water base moisturiser ने स्किन चांगली कोट करावी म्हणजे पावडर बेस मेकअप चांगला दिसतो आणि टिकतो.
- गरबा खेळून आल्यावर अंघोळ तर मस्ट आहे पण मेकअप संपूर्ण काढणं अतिआवश्यक आहे. नंतर पावलांना एखादं क्रीम लावणं गरजेचं आहे. कारण बरेच जण चप्पल शूज काढून नाचंतात. यामुळे पावलं कोमल राहतात. चेहऱ्याला हायड्रेटींग क्रीम किंवा नाइट क्रीम भरपूर प्रमाणात लावावे.
नियमित काळजी आणि निगा
सणाच्या आधी स्किन काळजी घेणं म्हणजे जणू एकच युद्ध असतं! घरचं फेशियल करायचं की संध्याकाळी सलोनमध्ये जाऊन एक्सपर्ट्स कडून टिप्स घ्यायच्या. स्वतःच स्वतःचा मेकअप करायचा की सलोंची अपॉइंटमेंट घ्यायची…. रात्री जागायचंय सकाळी प्रेजेंटेशन द्यायचंय आणि घरी येऊन संध्याकाळी तयार व्हायचंय….. एक ना दोन. पण शेवटी जेव्हा तुम्ही सणाच्या दिवशी फोटोसाठी पोझ देता, तेव्हा वाटतं की ही सगळी मेहनत वर्थ होती आणि हो ….. जात जात लक्षात असू दे, नवरात्रीनंतर कोजागिरी येते आणि चंद्राला full complex देता आला पाहिजे !!!